
वर्तमानात जगा; त्यासाठी मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह अवतार | Aniruddha Bapu Pravachan | 14th August 2025
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी मानवाच्या जीवनातील 'आज' चे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. आम्ही एकतर भूतकाळात रमत असतो किंवा भविष्याच्या चिंतेत गुरफटलेले असतो. ह्या गडबडीत वर्तमानकाळाकडे आमचे दुर्लक्ष होते. खरं तर माणसाच्या हातात फक्त वर्तमानकाळ असतो, 'आज' असतो.