पुरुषार्थ अनिरुद्धधाम प्रतिष्ठापना सोहळा (पूर्वरंग-द्वितीय सत्र), रूपरेषा - महती व माहिती
Aniruddha Bapu Pravachan
(Thursday 20th November 2025)
पुरुषार्थ अनिरुद्धधाम प्रतिष्ठापना सोहळा (पूर्वरंग-द्वितीय सत्र), रूपरेषा - महती व माहिती | Aniruddha Bapu Pravachan | 20th November 2025
मागील पितृवचनामध्ये पुरुषार्थधामाविषयी अधिक माहिती दिल्यानंतर सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दिनांक २० नोव्हेंबर २०२५ च्या पितृवचनामध्ये, सध्या सुरू असलेल्या पुरुषार्थधामाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वरंगामधील पुढील काही विधींविषयी सांगितले.
ही वर्षअखेर व नववर्षाची सुरुवात अशा दोन्हींच्या 'संधिकालात' संपन्न होणाऱ्या ह्या विधींमध्ये 'महारुद्र', 'महामृत्युंजय जप' आणि 'श्रीसप्तशतिपाठ' असे अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम असतील हे सांगून सद्गुरु बापूंनी त्या अनुषंगाने 'रुद्र' ह्या दैवताची माहिती सांगितली, तसेच 'महामृत्युंजय मंत्र' ह्या अत्यंत प्रभावशाली वैदिक मंत्राचे महत्त्व विशद केले. मुख्य म्हणजे ह्या विधींदरम्यान श्रद्धावानांनी काय करणे अपेक्षित आहे, ते स्पष्ट केले.
सगुणाची भक्ती प्रतिपादित करणार्या आपल्या भारतीय अध्यात्माने आपल्यावर हे किती उपकार केले आहेत की आपण सगुणरूपातल्या देवाचे लाड करू शकतो, त्याच्यावर प्रेम करीत भक्तीच्या पायर्या चढू शकतो. हेच सूत्र अधोरेखित करून सद्गुरु बापूंनी शेवटी श्रद्धावानांना, देवावर प्रेम करण्यास व देवाचा अभिमान बाळगण्यास सांगितले.