जे जे मला आवश्यक ते भगवंत देतोच - म्हणजेच रामराज्य | Aniruddha Bapu

Fri Nov 14 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 13th November 2025)

जे जे मला आवश्यक ते भगवंत देतोच - म्हणजेच रामराज्य | Aniruddha Bapu Pravachan | 13th November 2025

 

आज कलियुगात मानवाची भक्ती कमी-कमी होत जाऊन, त्याचा पुरुषार्थ लोप पावत चाललेला दिसत आहे. अशा कालखंडात, मर्यादायुक्त भक्तीच्या माध्यमातून पुरुषार्थाला पुन्हा समर्थ बनवणे, हे सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कार्याचे प्रमुख व महत्त्वाचे उद्दिष्ट आहे व ह्याकरिता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे - 'पुरुषार्थ धाम'!

सद्गुरु बापूंनी काही वर्षांपूर्वी आपल्या प्रवचनातून 'पुरुषार्थ धामा'ची संकल्पना स्पष्ट केली होती. ते आता आळंदीजवळ साकार होत आहे व त्याच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सध्या आपल्याला अनुभवावयास मिळत आहे. त्यासंदर्भात ह्या पुरुषार्थधामासंबंधी अधिक माहिती सद्गुरु बापूंनी दिली.

त्या अनुषंगाने सद्गुरु बापू आपल्याला, 'पुरुषार्थ म्हणजे नक्की काय, तसेच 'रामराज्य' म्हणजे नक्की काय व ते कोणाच्या जीवनात येते, ते समजावून सांगतात आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मनाचे कार्य कसे चालते ते विशद करून, त्या संदर्भात आपण काय काळजी घेतली पाहिजे व मुख्य म्हणजे, देवाकडे मागताना काय व कसे मागितले पाहिजे ते स्पष्ट करतात. 

हे महत्त्वाचे आहे कारण तुम्ही तुमच्या जीवनातला प्रॉब्लेम सोडवता म्हणजे तुम्ही देवाच्या जीवनातला प्रॉब्लेम सोडवता, हे तत्त्व सांगून बापूंनी शेवटी, हे तत्त्व अधोरेखित करणारी, रामायणातील, रामराज्य स्थापित झाल्यानंतरची प्रभु श्रीरामांची व अयोध्यावासियांची एक कथा सांगितली.