शुभं करोति -श्रीराम कृपेने प्राप्त झालेल्या, सकळ अभीष्ट करणार्या सनातन संजीवनी मंत्राची उत्पत्तीकथा
Aniruddha Bapu Pravachan
(Thursday 11th December 2025)
शुभं करोति -श्रीराम कृपेने प्राप्त झालेल्या, सकळ अभीष्ट करणार्या सनातन संजीवनी मंत्राची उत्पत्तीकथा | Aniruddha Bapu Pravachan | 11th December 2025
मनुष्याला जीवनात अनेक प्रकारच्या बाधांना तोंड द्यावे लागते. ह्या बाधांपैकी काही काही प्रारब्धानुसार, तर काही परिस्थितीनुसार असतात. आपल्या सनातनी पूर्वजांनी खरं तर अशा प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून त्यावर आध्यात्मिक उपायही सांगितले होते. सायंकाळी दिवेलागणीनंतर म्हणावयाचा मंत्र - 'शुभं करोति कल्याणम्', हे असेच एक पॉवरफुल साधन होते. ही सायंकाळची प्रार्थना पूर्वी घराघरातून म्हटली जायची. पुढे बदलत्या काळात इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढल्यानंतर ही प्रथा बंद पडली.
सध्याच्या कलियुगाच्या घोर प्रभावाने बेजार झालेल्या मानवाला असलेली तिची गरज ओळखून सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात, ह्या प्रभावशाली प्रार्थनेची आठवण करून दिली व तिचा अर्थही सांगितला; तसेच ती श्रद्धावानांकडून म्हणूनही घेतली. त्या अनुषंगाने त्यांनी देवर्षि नारद व 'साकेतलोक'स्थ रामभद्र ह्यांची कथा सांगितली.
त्याचबरोबर सद्गुरु बापूंनी सर्वांना हा मंत्र दररोज संध्याकाळी घरी देवासमोर दीप प्रज्वलित करून म्हणण्यास सांगितला आहे.
शुभं करोति कल्याणमं आरोग्यं सुखसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।।
दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।।
तसेच ह्या प्रार्थनेचे रामपंचायतनाशी असणारे नाते उलगडून दाखवणारी कथाही सद्गुरु बापूंनी सांगितली.
ह्याच्या जोडीला, श्रद्धावानांनी 'बाधानिवारक सुदीप' प्रज्वलित केल्यास अधिक श्रेयस्कर, असेही सद्गुरु बापूंनी पुढे सुचविले.