देव-भक्ताचे निस्सीम प्रेम उलगडणारी दत्तलीलेची व दोन दत्तमंत्रांची उत्पत्ती कथा | Aniruddha Bapu

Wed Dec 17 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 4th December 2025)

देव-भक्ताचे निस्सीम प्रेम उलगडणारी दत्तलीलेची व दोन दत्तमंत्रांची उत्पत्ती कथा | Aniruddha Bapu Pravachan | 4th December 2025

 

गुरुवार दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी झालेल्या सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या पितृवचनात बापूंनी भगवान दत्तात्रेयांची लीला वर्णन केली व त्या अनुषंगाने, श्रद्धावानांना प्रिय असणाऱ्या 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' आणि 'अवधूतचिन्तन श्री गुरुदेवदत्त' ह्या मंत्रांच्या उत्पत्तीची कथा सांगितली व श्रद्धावानांकडून त्याचे पठणही करून घेतले.

 

कलियुगाच्या प्रभावामुळे दयनीय अवस्था प्राप्त झालेल्या मानवाला तारण्याकरिता कलियुगात भगवान दत्तात्रेयांची उपासना (कलौ श्रीपाद वल्लभः ।।), तसेच आई जगदंबा व श्रीगणपती ह्यांची उपासना ((कलौ चण्डि विनायकौ ।।) सांगितली गेली आहे. त्याविषयी समजावून सांगताना सद्‌गुरु अनिरुद्धांनी, हल्ली जसे कुठल्याही ॲपशी जोडून घेताना 'लॉगिन'ची आवश्यकता असते, तसे ह्या दत्तमहाराजांशी जोडून घेण्यासाठीही जणू एका 'लॉगिन'ची आवश्यकता असते, असे सांगितले व हे 'लॉगिन' कुठले तेही बापूंनी समजावून सांगितले.

 

तसेच बोलताना, 'तो श्रीराम परमात्मा कोणालाही टाकत नाही' हा मुद्दा ठसविण्यासाठी सद्गुरु बापूंनी किन्नरांचे उदाहरण दिले व त्या अनुषंगाने त्यांनी समजावून सांगितले की 'समाजामध्ये किन्नर तिरस्काराचा व हेटाळणीचा विषय बनलेले असतात. किन्नरांना त्यांच्या काही वाईट पूर्वप्रारब्धामुळे अशी स्थिती प्राप्त झालेली असते, परंतु तीदेखील माणसेच आहेत. त्यामुळे त्यांचा तिरस्कार करू नका.' त्यानंतर त्या अनुषंगाने बापूंनी, किन्नरांशी संबंधित असलेली रामचरित्रातील एक कथादेखील सांगितली व त्यांना साक्षात प्रभु रामचंद्रांचे वरदान कसे प्राप्त आहे तेदेखील सांगितले.