हा त्रिविक्रम सर्व कारणांचा कारण - सुयशावीरा बापर्डेकर

अनिरुद्ध प्रेमसागरा श्रद्धावान नेटवर्क मधील श्रद्धावानाची फिचर्ड ठरलेली पोस्ट

हा त्रिविक्रम सर्व कारणांचा कारण – श्रध्दावान सुयशावीरा बापर्डेकर

 


सगळी कामापुरती नाती,
सोडूनी जाती सखे सोबती,
हात घट्ट पकडसी "तू" एकलाच,
कधी न टाकतोस बालकास ।।

श्रम करिता इवलेसेही,
"तू" प्रचंड आनंदी होसी,
चढता आम्ही अंबज्ञतेची शिडी,
देसी आम्हा "तू" भरभरूनी ।।

नाथसंविध् आम्हा शिदोरी,
दिली त्रि-नाथांनी धाडता भू-लोकी,
सक्रिय बाळांच्या आयुष्यात करूनी,
श्रीश्वास हा चाले संगे हात बाळांचा धरूनी ।।

पोहोचण्या भक्तिभाव चैतन्याचा मोठा खजिना,
दिलीस अंबज्ञतेची गुरूकिल्ली आणि नाथसंविध्- रूपी नकाशा,
प्रेमाची दावितो आम्हा सोपी वाट,
म्हणूनच हा त्रिविक्रम सर्व कारणांचा कारण असणारी सुंदर वहिवाट ||

लव्ह यु बाबा ❤️

- श्रध्दावान सुयशावीरा बापर्डेकर