भक्ति हाच स्वभाव बनलेल्या व स्वामी समर्थांचे भक्त असलेल्या सीताराम महाराज ह्यांची कथा | Aniruddha Bapu
Aniruddha Bapu Pravachan
(Thursday 11th September 2025)
भक्ति हाच स्वभाव बनलेल्या व स्वामी समर्थांचे भक्त असलेल्या सीताराम महाराज ह्यांची कथा|Aniruddha Bapu| 11th September 2025
सर्वसामान्यांना प्रेरणादायी ठरतील अशा श्रेष्ठ भक्तांच्या कथांच्या शृंखलेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात, भक्त वामन (सीताराम) ह्या स्वामीभक्ताची कथा सांगितली.
ज्याला सांगितलेले काहीही लक्षात राहात नाही, त्याला अनेकदा उपहासाने 'नर्मदेतला गोटा' म्हटले जाते. पण 'नर्मदेतला गोटा' शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, ते सांगून, तो अर्थ मनावर बिंबवणारी ही वामन (सीताराम महाराज) भक्ताची कथा सद्गुरु बापूंनी सांगितली. गुरुसेवा कशी असली पाहिजे आणि भक्ती हाच स्वभाव कसा बनला पाहिजे, त्याचे एकदम चपखल उदाहरण म्हणजे ही कथा होय.
त्याचबरोबर स्वामींचा एक गजर बापूंनी करून घेतला.
त्यानंतर बापूंनी 'आधी रचिली पंढरी, मग वैकुंठनगरी' हा अभंगही लावण्यास सांगितला व त्यामधून - 'देव आधी भक्ताचे घर बांधतो, मग स्वतःसाठी घर बांधतो' हे तत्त्व कसे प्रतिपादित होते हे समजावून सांगितले.