श्रीगुरुभक्त भानुदास कथा | Shreeguru Bhakti | श्रवणभक्ती | 17th July 2025

Sat Jul 19 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 17th July 2025)

श्रीगुरुभक्त भानुदास कथा | Shreeguru Bhakti | श्रवणभक्ती | 17th July 2025

 

नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्वसामान्य भक्तांना प्रेरणादायी ठरणार्‍या श्रेष्ठभक्तांच्या कथांच्या मालिकेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गुरुवार दि. १७ जुलै २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात, केवळ श्रवणभक्ती आणि श्रीगुरुंवरील ठाम विश्वासाच्या बळावर सामान्याचा असामान्य बनलेल्या, एकोणिसाव्या शतकातील श्रीगुरुंचा भक्त भानुदास व त्याच्या पत्नीची कथा सांगितली. घरी अठराविश्वे दारिद्र्य असूनही वृत्तीने नित्यसमाधानी असलेल्या ह्या पतीपत्नींना, केवळ दृढविश्वासाच्या जोरावर श्रीगुरु नृसिंह सरस्वतींची कृपा कशी प्राप्त झाली, त्यासंबंधी ही कथा आहे, जिच्याद्वारे श्रवणभक्तीचे माहात्म्यही स्पष्ट होते.