श्रीगुरु चरण दर्शन महिमा आणि करुणात्रिपदी | Aniruddha Bapu Pravachan | 7th August 2025

Fri Aug 08 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 7th August 2025)

श्रीगुरु चरण दर्शन महिमा आणि करुणात्रिपदी | Aniruddha Bapu Pravachan | 7th August 2025

 

भक्तिमार्गावर चालणार्‍या श्रद्धावानांकरिता सद्गुरुचरणांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात, गुरुचरणदर्शनाचा महिमा अधोरेखित करणारी कथा सांगितली. एक सर्वसामान्य, साधीसुधी, मुलेबाळे असलेली संसारी भक्त स्त्री जेव्हा दत्तावतारी सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वतींची भक्ती करू लागते, तेव्हा ती कशी केवळ त्यांच्या चरणांचे ध्यान करत राहते, त्यांची कशी सेवा करता येईल त्याचेच चिंतन करत राहते व शेवटी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन तिला कसे प्राप्त होते, त्यासंबंधीची कथा सांगितली. त्याचबरोबर, आजच्या अशांत काळात श्रद्धावानाच्या जीवनात असीम शांती आणू शकेल अशा, वासुदेवानंद सरस्वतीकृत 'करुणात्रिपदी' ह्या भक्तिरचनेविषयी सांगून तिचे दररोज एकदातरी  पठण करण्यास सांगितले.