साईबाबांचे मूळ नाव ’हरि’ व वडिलांचे नाव ’परशुराम’ | Saibaba Shirdi | 12th June 2025

Wed Jun 18 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday. 12th June 2025)

साईबाबांचे मूळ नाव ’हरि’ व वडिलांचे नाव ’परशुराम’ | Saibaba Shirdi | 12th June 2025

 

सर्वसामान्य माणसांमध्ये थोड्याफार प्रमाणात क्रोध आदि षड्रिपु हे असायचेच, जे अनेकदा भक्तिमार्गात अडसर निर्माण करतात. सर्वसामान्य भक्तांना प्रेरणादायी ठरणार्‍या श्रेष्ठभक्तांच्या कथांच्या मालिकेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात 'अनंत वामन पंडित' ह्या साईभक्तांची कथा सांगितली. कोपिष्ट स्वभावाच्या अनंत पंडितांनी पत्नीसमवेत शिरडीला साईबाबांच्या दर्शनाला गेल्यावर बाबांच्या अनुग्रहाने कसा क्रोधावर विजय मिळवला, ह्यासंबंधीची ही कथा सर्वसामान्य भक्तांसाठी खूपच आश्वासक आहे.