वर्तमानात जगा; त्यासाठी मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह अवतार | Aniruddha Bapu Pravachan | 14th August 2025

Wed Aug 20 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 14th August 2025)

वर्तमानात जगा; त्यासाठी मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह अवतार | Aniruddha Bapu Pravachan | 14th August 2025

 

आम्ही एकतर भूतकाळात रमत असतो किंवा भविष्याच्या चिंतेत गुरफटलेले असतो. ह्या गडबडीत वर्तमानकाळाकडे आमचे दुर्लक्ष होते. खरं तर माणसाच्या हातात फक्त वर्तमानकाळ असतो, 'आज' असतो. गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी मानवाच्या जीवनातील 'आज' चे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
आपल्यातील अनेक जण 'उद्या'बद्दल जाणून घेण्याच्या इच्छेने ज्योतिष्याकडे जन्मकुंडली घेऊन जातात. सद्गुरु आपल्या जीवनात आल्यानंतर आपला दुसरा जन्म होतो. त्याची कुंडली खरं तर आम्हाला मांडायला हवी. म्हणजे त्या सद्गुरुला 'माझा' म्हणायला हवे. जेव्हा आम्ही सद्गुरुला 'माझा' म्हणतो तेव्हा, आम्ही जीवनात कुठल्याही स्थितीत असलो तरी सद्गुरु त्या-त्या पातळीवर येऊन आमचे रक्षण करतो, हे सद्गुरु बापूंनी भगवंताच्या 'मत्स्य', 'कूर्म', 'वराह'आणि 'नरसिंह' ह्या अवतारांची उदाहरणे देऊन समजावून सांगितले.


एकदा का सद्गुरु जीवनात आला की त्याच्यापासून 'विभक्ती' नकोच; आणि ह्या अनुषंगाने सद्गुरु बापूंनी, अक्कलकोट स्वामी समर्थांची कुंडली मांडू इच्छिणाऱ्या, ज्योतिषी 'नाना रेखी' ह्यांची कथाही सांगितली की कसे त्यांनी स्वामींपासून दूर (विभक्त) करणारे मानसन्मान धुडकावून लावले.