विजयादशमी - मायेच्या प्रदेशातून सीमोल्लंघन हरिच्या प्रदेशात | Aniruddha Bapu

Fri Oct 03 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 2nd October 2025)

विजयादशमी - मायेच्या प्रदेशातून सीमोल्लंघन हरिच्या प्रदेशात | Aniruddha Bapu Pravachan | 2nd October 2025

 

प्रभु श्रीरामांनी, सर्व जगाला 'त्राहि भगवान' करून सोडणाऱ्या रावणाचा वध केला, तो दिवस म्हणजेच विजयादशमी अर्थात दसरा. तेव्हापासून दसर्‍याच्या ह्या दिवशी 'चांगल्याचा वाईटावर विजय' साजरा केला जातो. 

 

पण हे 'चांगले' आणि 'वाईट' जसे बाहेर असतात, तसेच ते आपल्या आतमध्येही असतात. गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात सद्गुरु बापूंनी हाच धागा पकडून 'भक्त हरिदास' ह्याची कथा सांगितली. आम्ही जरासे संकट आले की देवाला जबाबदार धरतो. ह्या भक्त हरिदासावर भयंकर अतिवृष्टीचे संकट कोसळूनही व त्याचे संपूर्ण पीक वाया जाऊनही त्याने कधी देवाला 'का?' हा प्रश्न विचारला नाही की देवाला दोष दिला नाही. कुठल्याही परिस्थितीत आपण देवाला दोष देऊ नये कारण 'भक्ताला पावणे' हाच देवाचा 'स्व-भाव' आहे, हीच शिकवण ही कथा आम्हाला देते.

 

तसेच, आपल्याला जगामध्ये चांगली व वाईट दोन्ही प्रकारची माणसे व मते सगळीकडेच पहायला मिळतात.  अनेकदा हे जग - 'चांगले' काय व 'वाईट' काय, हे स्वतःच्या सोयीने ठरवते. अशा वेळेस ह्या परस्परविरोधी मते असणाऱ्या जगात आपण कसे वागायचे हा संभ्रम श्रद्धावानांच्या मनात निर्माण होतो. परंतु अशा संभ्रमित अवस्थेत आपल्याला समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' उचित मार्गदर्शन करतात व सर्व प्रश्नांची उत्तरे भक्तिपंथावरच मिळतात,असे सद्‌गुरु अनिरुद्धांनी सांगितले. त्याचबरोबर, मायेच्या प्रांतातून श्रीहरीच्या प्रांतात येणे, हे प्रत्येक श्रद्धावानासाठी आवश्यक असणारे 'सीमोल्लंघन' भक्तिमार्गावरच शक्य आहे,  हे सद्गुरु बापूंनी मनाच्या श्लोकांच्या आधारेच ठामपणे पटवून दिले.