धनत्रयोदशी - धन्वंतरी पूजन, अर्चन, उपासना - महती आणि माहिती | Aniruddha Bapu
Aniruddha Bapu Pravachan
(Thursday 25th September 2025)
धनत्रयोदशी - धन्वंतरी पूजन, अर्चन, उपासना - महती आणि माहिती | Aniruddha Bapu Pravachan | Dhanvantari | 25th September 2025
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे व दूषित वातावरणामुळे मानवाचे शारीरिक, मानसिक, प्राणिक असे सर्व प्रकारचे आरोग्य बिघडत चालले आहे. मानवाचे सर्व प्रकारचे आरोग्य ठीक राखण्यामध्ये देवांचा आदिवैद्य भगवान धन्वंतरीची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
मानवी आरोग्याकरिता अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या अशा ह्या भगवान धन्वंतरीचे पूजन करण्याचा संकल्प सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी काही आठवड्यांपूर्वी सोडला होता. गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात सद्गुरु बापूंनी, आधी सूचित केल्यानुसार, दिवाळीतील 'श्री धनलक्ष्मी व श्रीयंत्र पूजन' उत्सवाच्या वेळेस योजलेल्या 'भगवान धन्वंतरी पूजना'चे माहात्म्य समजावून सांगितले.
ह्या वेळेस सद्गुरु बापूंनी, साक्षात महाविष्णूचाच अवतार मानला गेलेल्या भगवान धन्वंतरीच्या प्रकटनाची विलक्षण कथाही सांगितली व धन्वंतरीच्या मूर्तीचे दर्शन करविले. तसेच ह्या पूजनाच्या वेळेस केल्या जाणाऱ्या जपाच्या मंत्रांची विस्तृतपणे माहिती सांगून, श्रद्धावानांकडून ते जप म्हणूनही घेतले.