देवर्षि नारदाच्या साक्षीने श्रीधन्वंतरि-स्वरूप हरिहराचे केलेले प्रथम पूजन | Aniruddha Bapu
Aniruddha Bapu Pravachan
(Thursday 9th October 2025)
देवर्षि नारदाच्या साक्षीने श्रीधन्वंतरि-स्वरूप हरिहराचे केलेले प्रथम पूजन | Aniruddha Bapu Pravachan | 9th October 2025
आयुष्यात आपल्याला नेहमी 'परंतु' शब्दाचा सामना करावा लागतो. आम्ही देवाची भक्ती करायला बघतो, ‘परंतु’ नीट जमतच नाही. कारण देवाचे नाव घ्यायचीसुद्धा आमची ताकद नसते. मानवाच्या अल्प ताकदीची जाणीव असणारा तो देवच त्याच्या अकारण कारुण्याने त्याची भक्ती आमच्याकडून करून घेतो. कारण आम्ही देवाला अतिशय प्रिय असतो. आम्ही जेव्हा एकदा देवाचं नाव घेतो तेव्हा देव आमचं नाव १०८ वेळा घेतो.
विठ्ठलापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला चंद्रभागा ओलांडावीच लागते. ‘परंतु’ भक्ताला हे नीटपणे माहीत असते की त्याची तेवढी क्षमता नाही. त्यामुळेच तो विठ्ठलालाच विनवतो की तूच माझ्याकडे ये आणि मला पलीकडे म्हणजेच तुझ्याकडे घेऊन जा. पण त्यासाठी आमचा दृढनिश्चय मात्र हवा की 'तू मला मरे-मरेस्तोवर मार, पण मी तुझे पाय सोडणार नाही.' हाच भक्ताचा दृढनिश्चय अधोरेखित करणारी, ‘भक्त माहेश्वरप्रसाद व त्याची पत्नी रत्नप्रभा’ ह्यांची कथा सद्गुरु बापूंनी गुरुवार दि. ०९ ऑक्टोबर २०२५ च्या पितृवचनात सांगितली. हाच दृढनिश्चय ह्या माहेश्वरप्रसादाच्या पत्नीने - रत्नप्रभेने दाखवला व आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणले.
ह्या भक्तदांपत्यामुळेच जगाला धन्वन्तरि-पूजनाचा लाभ मिळाला कारण ह्याच माहेश्वरप्रसाद व रत्नप्रभा जोडप्याने जगात पहिल्यांदा धन्वन्तरि-पूजन केले व तेदेखील देवर्षि नारदांच्या साक्षीने. ही कथा सांगतानाच सद्गुरु बापूंनी -
‘धन्वन्तरिदेवा तूचि आरोग्याचा स्वामी रे । (२)
कृपा करि माझ्यावरी, देह शुद्ध करि रे ॥ (२)
जय जय धन्वन्तरिदेवा, जय जय सुदर्शनदेवा । (२)
जय जय महाविष्णुदेवा, जय जय नारायणदेवा ॥ (२)
हा गजर सर्वांकडून करून घेतला.