पूजनासाठी अंबज्ञ इष्टीका कशी बनवावी?
अंबज्ञ इष्टिका बनविण्याची कृती -
साहित्य-
(एक अंबज्ञ इष्टिका बनविण्यासाठी लागणारे साहित्य)
1) दैनिक प्रत्यक्ष वर्तमानपत्र (पूर्ण 12 पाने) - टोटल 18 पेपर
2) लगदा - 300 ग्रॅम
3) विटेचा चुरा - 150 ग्रॅम ( गव्हाच्या पिठाच्या चाळणीने चाळून घेणे.)
4) गेरू - 50 ग्रॅम ( बारीक पावडर असावी.)
5) दोरा - हाराच्या पुडीचा दोरा असावा.(बंडल बांधण्यासाठी)
6) कात्री किंवा कटर आणि पल्टी पत्रा.
7) पाणी
8) छोटे बकेट/ बादली
9) लगदा मळण्यासाठी ताट किंवा प्लास्टिक पेपर / गोणी.
कृती -
1) वर्तमानपत्र एकावर एक व्यवस्थित लावून घ्यावेत.
2) प्रथम त्याची उभी घडी घालावी. दोन्ही टोके व्यवस्थित जुळवून घ्यावी.
3) वरच्या बाजूने 2।। (अडीच) इंचावर पहिली घडी (Fold) घालावी.
4) त्यानंतर सलग चार घड्या (Fold) घालून घेणे.
5) शेवटची घडी (Fold) आधीच्या घडीच्या (Fold) आत घालावी.
6) अशा रीतीने 18 प्रत्यक्ष पेपरच्या घड्या घालून घ्याव्या.
7) सर्व पेपरच्या घड्या घालून झाल्यावर त्याची घडी एकावर एक ठेवताना alternate ( बंद बाजूवर ओपन बाजू व ओपन बाजूवर बंद बाजू ) ठेवावी.
8) असे 18 पेपर एकावर एक ठेवून त्याचे बंडल बांधताना आडव्या व उभ्या बाजूने दोऱ्याने घट्ट बांधून घ्यावे.
9) बंडल बांधून झाल्यावर तीन ते चार मिनिटे ते पाण्यात ठेवावे. जेणेकरून लगद्याचा लेप त्यावर व्यवस्थित लागेल. (कोरड्या पेपरवर लगद्याचा लेप चिटकून राहणार नाही.)
10) ताटात / प्लास्टिक पेपर /गोणी - वर 300 ग्रॅम लगदा घ्यावा. ( लगदा चिकट वाटत नसेल तरच एक ते दीड चमचा कॅमल ब्राऊन गम घालावा.)
11) लगद्यामध्ये 150 ग्रॅम विटेचा चुरा थोडा घालून चांगले मळून एकजीव करणे. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी वापरावे.
12) सर्वात शेवटी लगद्यामध्ये गेरू घालावा व पुन्हा सर्व एकजीव करून थोडे सैलसर मळावे.
13) पेपरच्या बंडलला लगद्याचा लेप सर्व बाजूने लावावा लेप लावताना बंडलला सर्व बाजूने ( सहा बाजू ) एकसमान लावा व पल्टी पत्र्याने प्लेन करून घ्यावे.
इथे आपली अंबज्ञ इष्टिका तयार झाली.
ही इष्टिका पूजनासाठी तयार आहे. (शेंदूर लावण्याची गरज नाही .)
अंबज्ञ इष्टिकेसाठी लागणारा लगद्याचा गोळा तयार करण्याची कृती -
साहित्य -
1) रामनाम वही चा एकदम बारीक केलेला लगदा 300 ग्रॅम
( रामनाम वही उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष पेपर घ्यावा.)
2) डिंक - 50ml कॅमल ब्राऊन गम मध्ये 50ml पाणी घालून गम (डिंक) तयार करणे अशा रीतीने तयार केलेला गम वापरणे.
3) व्हाइटनिंग पावडर -- 700 ग्रॅम
कृती -
1) रामनाम वहीचा किंवा प्रत्यक्ष पेपरचा लगदा 300 ग्रॅम घ्यावा. (लगदा एकदम बारीक असावा)
2) लगद्यामध्ये थोडा थोडा डिंक (गम) घालून चांगले मळून घ्यावे. लगदा व डिंक पूर्ण एकजीव करावे.
3) या लगद्यात व्हाइटनिंग पावडर थोडी थोडी करून घालावी. व सर्व मिश्रण चांगले एकजीव करून, मळून त्याचा गोळा बनवावा.
इष्टिका बनविण्यासाठी यातील 300 ग्रॅम लगदा काढून घ्यावा.
वरील प्रमाणे तयार केलेल्या गोळ्या मधून तीन इष्टिका बनवता येतात.