तूच माझा सांगाती सदैव आहेस त्रिविक्रमा - सिद्धांतसिंह जयवंत

अनिरुद्ध प्रेमसागरा श्रद्धावान नेटवर्क मधील श्रद्धावानाची फिचर्ड ठरलेली पोस्ट

तूच माझा सांगाती सदैव आहेस त्रिविक्रमा - श्रद्धावान सिद्धांतसिंह जयवंत

 

हृदयाची गाथा, मी सांगू कुणास आत्ता
तूच माझा सांगाती हो ना रे त्रिविक्रमा..
तुझे बोल जरी मनास कळले
तरी ते ना वळले, ते तूच वळव ना रे त्रिविक्रमा
तुझे ते बोल करती मनास शांत
तरी ते मन चंचल, ते तूच शांत कर ना रे त्रिविक्रमा
सदैव मनात उठती प्रश्‍नाची असंख्य वादळे
अश्या ह्या प्रसंगी उत्तरांची वर्षा कर ना रे त्रिविक्रमा
तुला मी जे सर्व सांगितले, तू ते सर्व केले
मग मला समजले माझे उत्तर हे तूच त्रिविक्रमा
माझे उत्तरही तूच प्रश्न ही तूच रे नाथसंविध्
मन ही ना माझे ते पण तुझे मग का मी घाबरू
तूच माझा सांगाती सदैव आहेस त्रिविक्रमा
तूच माझा सांगाती सदैव आहेस त्रिविक्रमा...

-सिद्धांतसिंह जयवंत, चेंबूर उपासना केंद्र