श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्सतील भक्तीचा अनुभव
श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे तसेच श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्स येथे श्रद्धावान नवस करू शकतात. ’यज्ञेन दानेन तपसा’ या उक्तीप्रमाणे श्रद्धावान आपापल्या इच्छेनुसार व क्षमतेनुसार ‘क्षेमदक्षिणा‘ देऊन तो नवस फेडतात. ज्या श्रद्धावानांना सेवा करणे शक्य नसेल तर ते संस्थेच्या कार्याकरीता रामनाम वही लिहीतात किंवा उपासना करणे, सुदीप लावणे, याग व पूजन करणे अशा अध्यात्मिक सेवा करतात. श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्स येथे अनेक श्रद्धावान आपल्या लहान बाळांनाही घेऊन येतात. लहान वयातच या क्षेत्री आणल्यामुळे त्यांची नाळ या पवित्र क्षेत्राशी सहजपणे बांधली जाईल असा त्यांचा विश्वास असतो.

श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्सतील सिद्ध पादुका
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्सला तीन वर्ष पूर्ण झाल्यावर तो स्पिरिच्युअल सेन्टर ’सिध्द पादुका’ प्राप्त करण्यास पात्र ठरतो. या पादुकांची स्थापना स्पिरिच्युअल सेन्टरमध्ये श्रीत्रिविक्रमाच्या तसबीरीजवळ केली जाते. श्रद्धावान श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्स येथे उपलब्ध असणार्या सुगंधी जलाने या पादुकांवर अभिषेक करू शकतात. सध्या पुणे, वडोदरा, रत्नागिरी, मिरज-सांगली आणि मुंबई पश्चिम उपनगर - बोरिवली येथे सिद्ध पादुका देण्यात आल्या आहेत.
येणार्या काळानुसार खालील ठिकाणी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार व मार्गदर्शनानुसार चढत्या क्रमाने गोष्टी बदलत राहू शकतील:
- श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् - सर्वोच्च तीर्थक्षेत्र
- श्रीपुरुषार्थ अनिरुद्ध धाम - डुडुळगाव, पुणे
- श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्स / श्रीअनिरुद्ध उपासना केंद्र
त्रिविक्रम स्पिरिच्युअल क्लब
या श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्सच्या संदर्भात बापूंनी एक अनोखी संकल्पना मांडली ती म्हणजे श्रीत्रिविक्रम अध्यात्मिक क्लब (Shree Trivikram Spiritual Club). समविचारांच्या चांगल्या व्यक्तींसाठी (श्रद्धावानांसाठी) आनंद व्यक्त करण्यासाठी एकत्र येण्यासाठी एक जागा म्हणजे स्पिरीच्युअल क्लब. सतत उपासना करत रहाणे सामन्य मानवाला कठिण पडू शकते. त्यांना चांगल्या प्रकारे एन्जॉय करण्यासाठी बापूंनी दिलेला पर्याय म्हणजे स्पिरीच्युअल क्लब.
त्रिविक्रम स्पिरिच्युअल क्लबमध्ये पुढील सुविधांचा समावेश करण्याची संकल्पना आहे:
- ऑडिओ-विज्युअल रूम - Audio-Visual Room: प्रवचन, अभंग, अनुभव, अनुभवसंकिर्तन, काही विशेष कार्यक्रमाच्या Clippings.
- भजन आणि गजर करण्यासाठी (ऐकण्यासाठी) एक रूम (रिक्रिएशन रूम - Recreation Room) : या रूममध्ये श्रद्धावान कानात Earphone घालून भजन किंवा गजर ऐकत नाचू शकतील.
श्री त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर्सच्या बाहेरील मोकळ्या जागेत श्रद्धावानांना बसण्यासाठी बेंचेस असतील, ज्यावर श्रद्धावान बसून गप्पा मारू शकतील किंवा मोकळ्या जागी पठण/जप करत चालू शकतील.
बापू या क्लबबद्दल आपल्या प्रवचनात म्हणाले होते की:
“येथे पण गजरावर नाचायचे आहे, सुमिरन करायचे आहे, पठण करायचे आहे, आरामात बसायचे आहे. हळूहळू हा स्पिरिच्युअल क्लब इतका डेव्हलप होईल की विविध वयोगटातील अनेक श्रद्धावानांना तेथे यावेसे वाटेल आणि ते तेथे येत राहतील.”







