आपल्या अग्रलेखांमधून आणि प्रवचनांमधून सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू आपल्यासमोर धुळे येथील निमगाव येथे वसलेल्या श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्चे म्हणजेच पवित्र दत्तपर्ण क्षेत्राचे गहन महत्त्व सातत्याने उलगडून सांगत आले आहेत.

श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्ची संकल्पना समजावताना बापू म्हणाले होते,

"श्रीसद्‌गुरु पुण्यक्षेत्रम् हे आध्यात्मिक उपासनेचे, साधनेचे, ध्यानाचे, प्रसन्न शांती आणि समाधान प्राप्त करून देणारे एक मह‌‌त्‌क्षेत्र (महान क्षेत्र) आहे."

या स्थानाचे महत्त्व विशद करताना सद्गुरु बापूंनी लिहिले आहे:

श्रीसद्‌गुरु पुण्यक्षेत्रम् मधील पांझरा नदीकडील म्हणजेच टेकडीकडील स्थान हे ’दत्तपंचायतन भूमी’ तर तापी नदीकडील म्हणजेच शिळेकडील स्थान हे ’दत्तमंगलचण्डिका क्षेत्र’ जे सर्वोच्च साधना क्षेत्र आहे असेही बापूनी सांगितले आहे.

ज्याप्रमाणे गाणगापूर हे भीमा नदीच्या व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे त्याचप्रमाणे तापी व पांझरा या पवित्र नद्यांच्या संगमाच्या मध्यभागी हे पवित्र क्षेत्र वसले आहे.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
श्री वर्धमान व्रताधिराजादरम्यान श्रद्धावानांना श्री सद्गुरु पुण्यक्षेत्र येथे भेट देता यावी यासाठी करण्यात आलेली व्यवस्था

श्री सद्गुरु पुण्यक्षेत्राची निर्मिती

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार श्रीसद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌च्या उभारणीचे काम २०१७ साली मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती उत्सवापासून सुरु झाले. दिनाक २९-११-२०१७ रोजी मुंबईहून पूजनातील श्रीदत्तपंचायतन तसबीरी म्हणजेच

  1. श्रीदत्तात्रेय
  2. श्रीपादश्रीवल्लभ
  3. श्रीनृसिंहसरस्वती
  4. श्रीअक्कलकोट स्वामी
  5. श्रीसाईनाथ,

यांच्या तसबीरी व श्रीदत्तात्रेय उदी कुंभ अमळनेर येथे नेण्यात आले. या श्रीदत्तात्रेय उदी कुंभात सद्‌गुरु बापूंच्या संकल्पानुसार झालेल्या याग व हवनातील उदी ठेवली गेली आहे. हा उत्सव आता दरवर्षी येथे साजरा केला जातो तसेच वर्धमान व्रताधिराजाच्या काळात येथे दत्तयागही केले जात होते. आता हे दत्तयाग फक्त वर्धमान व्रताधिराजाच्या काळापुरता मर्यादित न राहता इतर दिवशीही पूजकांच्या बुकींगनुसार केले जातात.

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे पणजोबा, श्री विद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये, यांनी याच पवित्र स्थळी सलग तीन वर्षे रामनवमी १९०६ ते रामनवमी १९०९ तपश्चर्या केली. या कालावधीत त्यांना दृष्टान्तामध्ये ‘श्री वर्धमान व्रताधिराज’ प्राप्त झाला. श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाच्या तिसऱ्या खंडातील ‘आनंदसाधना’ या ग्रंथात श्री वर्धमान व्रताधिराजाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. श्री वर्धमान व्रताधिराजाच्या कालावधीत अनेक श्रद्धावान किमान एकदा तरी या श्री पुण्यक्षेत्रम् येथे येतात आणि येथे व्रतपुष्पाचे पठण करतात.

गुरुभक्ती दृढ करण्यात श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्‌ची भूमिका

मातृवात्सल्यविन्दानम् अध्याय ३१ मध्ये आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या 'दतमंगलचण्डिका' या आठव्या अवताराचे वर्णन बापूंनी केले आहे. 'ही दत्तमंगलचण्डिका अष्टादशभुजाच होती परंतु हिच्या एकाही हस्तात कुठलेही शस्त्र नसून तिच्या दक्षिण अर्थात उजव्या नऊ हातांत नऊ मंगल आशीर्वाद व वाम अर्थात डाव्या नऊ हातांत नऊ शाप होते.

दत्तमंगलचण्डिकेचे हे नऊ आशीर्वादहस्त श्रद्धावानाना अभय देणारे व श्रीगुरुभक्तांना वर देणारे आणि नऊ शापदहस्त श्रद्धाहीनांना भय देणारे व श्रीगुरुभक्तिद्रोहयांना अपयश देणारे होते. हिच्या दोन्ही नयनांत एकाच वेळेस वीररस व वात्सल्यभाव जागृत होते. कलियुगातील मानवास तारक ठरणारी श्रीगुरुभक्ती अर्थात दत्तात्रेयभक्ती हेच हृदय असणारी अशी ही महिषासुरमर्दिनी 'दत्तमंगलचण्डिका'.

मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी म्हटल्याप्रमाणे कलियुगात श्रीगुरुभक्ती तारक आहे. श्रीगुरुभक्ती दृढ करण्यासाठी, श्रीगुरु दत्तात्रेय आणि आदिमाता दत्तमंगलचंडिकेची कृपा प्राप्त व्हावी, तसेच सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या संकल्प आणि इच्छाशक्तीतून स्थापन झालेल्या श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् या पवित्र स्थळातून प्राप्त होणारे अथांग आध्यात्मिक लाभ मिळावेत, या अत्यंत मनःपूर्वक श्रद्धेने श्रद्धावान या पावन पुण्यक्षेत्रम् ला भेट देतात.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
श्री दत्तपंचायतनाच्या पूजनीय प्रतिमांचे पूजन

Photo Gallery

Vardhaman Vratadhiraj at Shree Sadguru Punyakshetram

Shraddhavans worship Sadguru Aniuruddha during Vardhaman Vratadhiraj at Shree Sadguru Punyakshetram

Tapashcharya Sheela at Shree Sadguru Punyakshetram, Amalner