जुईनगर येथील गुरुकुलाचे स्थानमहात्म्य
दिनांक ४ ऑक्टोबर १९९८ रोजी या स्थानाचे भूमीपूजन झाले. दिनांक २८ आणि २९ एप्रिल १९९९ रोजी वैशाख पौर्णिमेच्या अत्यंत पवित्र दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी या तीर्थक्षेत्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, श्री मंगेश आणि श्री शांतादुर्गा यांच्या मूर्तींची गर्भगृहात स्थापना केली. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात अत्यंत पवित्र मंत्रांचे अखंड पठण करण्यात आले. गंगा नदीची पवित्र उपनदी असणार्या गंडकी नदीच्या पात्रातील पवित्र काळ्या पाषाणापासून देवतांच्या मूर्ती बनविल्या गेल्या आहेत. दररोज पहाटे हे गर्भगृह उघडले जाते आणि या तीनही मूर्तींचे षोडशोपचारे पूजन केले जाते. त्यानंतर मूर्तींना उत्तम वस्त्रांलकारांनी सजवले जाते.
येथील गर्भगृहात स्थापित पंचपुरुषार्थ देवतांमधील 'महाकाली' ही 'काम' (इच्छा) या पुरुषार्थाचे म्हणजेच इच्छाशक्तीचे प्रतिनिधित्व करते, ती असुरांना भयभीत करते आणि भक्तांचे रक्षण करते; 'महालक्ष्मी' ही 'अर्थ' या पुरुषार्थाचे प्रतिनिधित्व करते, ती सर्व संकटांचा नाश करते; आणि 'महासरस्वती' ही धर्म (धार्मिकता) या पुरुषार्थाचे प्रतिनिधित्व करते, ती विविध रोग, आजारांना भक्तांपासून दूर ठेवते आणि भक्तांना निरोगी बनवते. तसेच शांतादुर्गा ही 'मोक्ष' या पुरुषार्थाचे प्रतिनिधित्व करते आणि मंगेश हा पाचवा पुरुषार्थ म्हणजेच 'भक्ति' या पुरुषार्थाचे प्रतिनिधित्व करतो.
या तीन मूर्तींच्या समोर पंचधातूंपासून बनवलेले दोन सिंह स्थापित केले आहेत. या सिंहांची नावे 'आल्हाद' (आनंददायक हर्ष) आणि 'संतोष' (समाधान) अशी आहेत.

भारतीय प्राचीन बलविद्या प्रशिक्षण
याच वास्तूमध्ये परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी पहिले बलआचार्य श्री.रवींद्र मांजरेकर यांना दीक्षा देऊन भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रात्यक्षिकांसह शिक्षण दिले होते. तसेच त्यांच्या बरोबर इतर चार शिष्यांनाही प्रशिक्षण दिले होते.
महायोगपीठ स्वरूपाध्यास
श्री शांतादुर्गेच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडील स्तंभात एक कलश आहे. या कलशामध्ये संपूर्ण भारतातील ३० शक्तिपीठे आणि धर्मपीठांची मृत्तिका (माती) आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे 'गुरुकुल' हे एक अत्यंत पवित्र स्थान आहे.
धर्मचक्र
दिनांक २९ एप्रिल १९९९ रोजी सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या नित्यगुरुंच्या उपस्थितीत या स्थानी धर्मचक्राची स्थापना झाली. हे चक्र धातूचे बनलेले असून त्याला २४ आरे आहेत. हे धर्मचक्राची सिद्धता बावन्न भक्तांच्या घरी करण्यात आली. यासाठी प्रत्येक भक्ताच्या घरी तीन दिवस ‘ॐ साई श्री साई, जय जय साईराम’ या पवित्र मंत्राचा अखंड जप करून या चक्राची सिध्दता करण्यात आली.

श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये अध्ययन कक्ष
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे पणजोबा ‘श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये’ हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे व सर्व वेदशास्त्रांत पारंगत होते म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ येथे एक अध्ययन कक्ष उभारण्यात आला होता व ह्या कक्षाला त्यांचे नाव देण्यात आले होते.
ते साईनाथांचे आणि विठ्ठलाचे परम भक्त होते व म्हणूनच ह्या अध्ययन कक्षात भक्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले. सुरुवातीच्या काळात हा कक्ष मंत्रपठण, नामस्मरण, पवित्र ग्रंथांचे वाचन आणि ध्यानधारणेसाठी उभारण्यात आला होता. परंतु कालांतराने या वास्तूमध्ये इतर अनेक भक्ती उपक्रम सुरू झाल्यामुळे अशा प्रकारच्या साधना-उपासनेसाठीची व्यवस्था आता विविध ठिकाणी स्थापन झालेल्या त्रिविक्रम मठ (त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर) येथे करण्यात आली आहे. तेथे श्रद्धावान मंत्रपठण, नामस्मरण, पवित्र ग्रंथांचे वाचन तसेच ध्यानधारणा करू शकतात.
विश्वलोचन चक्रराज
'विश्वलोचन चक्रराज' हे एक अभूतपूर्व असे यंत्र आहे, ज्याची रचना व स्थापना स्वत: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ह्या वास्तूमध्ये केली. हे 'विश्वलोचन चक्रराज' म्हणजे महाप्राणाचे स्थान आहे.
पवित्र अग्नी (धुनी)
दिनांक २८ सप्टेंबर २००० रोजी सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी या स्थानी प्रथम धुनीची स्थापन करून पवित्र अग्नी प्रज्वलित केला होता व त्यातून निर्माण होणारी उदी श्रद्धावानांना विनामूल्य वाटली जात होती. त्यानंतर कालांतराने सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्याच संकल्पाने ही धुनी गोविद्यापीठम्, कर्जत येथे स्थानांतरित करण्यात आली.
पंचपुरुषार्थ उपासना
गुरुकुलाच्या वास्तूमध्ये ही उपासना श्रद्धावानांकडून करून घेतली जाते, ज्यामध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंची एक विशिष्ट तसबीर समोर असते.
पहिली उपासना ही ह्याच वास्तूमध्ये करणे आवश्यक आहे व त्यानंतर उपासनेमध्ये मांडलेल्या मोठ्या तसबीरीची छोटी प्रतिकृती व उपासना पुस्तिका विकत घेऊन प्रत्येक श्रद्धावान ही उपासना घरी तसबीर मांडून त्यासमोर करू शकतो.
ह्या उपासनेच्या योगे दशेंद्रिये, अकरावे मन आणि सप्तचक्र ह्यांमध्ये उत्पन्न झालेले दोष दूर होतात आणि म्हणूनच त्या दोषांपासून उत्पन्न होणार्या अडचणी दूर होऊ शकतात ही श्रद्धावानांची भावना आहे.
आद्यपिपा (पूज्य सुरेशचंद्र वैद्य) समाधी
सद्गुरु अनिरुद्धांच्या संकल्पानुसार दिनांक १९ एप्रिल २००७ रोजी येथे आद्यपिपांची समाधी स्थापन करण्यात आली. स्वतः सद्गुरु श्रीसाईनाथांनी दिलेली उदी आणि आद्यपिपांच्या पार्थिवाची रक्षा असलेला कलश समाधीस्थानी ठेवण्यात आला आहे.
समाधीला ६ पायर्या आहेत. ज्यातील पहिल्या पाच पायर्या पाच पुरुषार्थांचे म्हणजेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि भक्ती यांचे प्रतिनिधित्व करतात आणि सर्वात वरची सहावी पायरी 'मर्यादा पुरुषार्था'चे प्रतिनिधित्व करते, जो स्वतः बापूंनी सिद्ध केला आहे. सहा पायर्यांच्या वर श्रीसाईसच्चरित्राची ती प्रत ठेवलेली आहे, जी आद्यपिपा नियमितपणे वाचत असत.
दरवर्षी श्रावण महिन्यातील शनिवारी या गुरुकुलमध्ये 'अश्वत्थ मारुती पूजन' केले जाते. तसेच आश्विन नवरात्रात 'ललिता पंचमी उत्सव' आणि मार्गशीर्ष महिन्यात 'वैभवलक्ष्मी' उत्सव साजरा केला जातो.

पत्ता
सद्गुरु निवास, गुरुकुल, सेक्टर २३, जुईनगर, नवी मुंबई, महाराष्ट्र – ४००७०६
View on Mapवेळ
सकाळी ८ वाजल्यापासून












