परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापू श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराज द्वितीय खण्ड प्रेमप्रवास मध्ये अतुलित बलधाम असणार्‍या श्रीरामदूत हनुमंताच्या अद्‍भुत सामर्थ्याबद्दल म्हणतात -

‘मर्यादित ते अमर्याद अनंतत्व', ‘भक्त ते ईश्वरत्व', हा प्रवास करणारा एकमेव, अद्वितीय मर्यादारक्षक" अर्थात्‌ माझा (सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांचा) ‘रक्षकगुरु' श्री हनुमंत.

ग्रंथराजात बापू हेदेखील सांगतात की

‘महाप्राण हनुमंत (महारुद्र) हा आज्ञाचक्राचा स्वामी आहे. आज्ञाचक्रास ‘भक्तिचक्र' असेही म्हणतात. ज्या प्रमाणात भक्ती, त्या प्रमाणात भक्तिचक्राची कार्यावस्था.’

प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनात हे भक्तिचक्र सक्रिय होऊन त्याला आवश्यक ते बल प्राप्त व्हावे ह्यासाठी हनुमंताच्या भक्तीचे, उपासनेचे विविध पर्याय सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी उपलब्ध करून दिले आहेत.

भक्तिमार्गावरील श्रद्धावानांचा आधार, मार्गदर्शक व आदर्श असणार्‍या व अतुलित बलाने संपन्न असलेल्या या हनुमंताच्या भक्तांसाठी एक श्रद्धास्थान म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार स्थापित झालेले रत्नागिरी (महाराष्ट्र) येथील ‘अतुलितबलधाम’.

भगवान श्रीपरशुरामांच्या पावन भूमीत, अर्थात कोकणात रत्नागिरी येथे ६ जानेवारी २००२ रोजी, या वास्तूच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दीड वर्षाच्या कालावधीत या वास्तूचे बांधकाम पूर्णही झाले व दि. ८ ते १० जुलै २००३ या काळात ’अतुलित बलधाम’ या आध्यात्मिक स्थानाची (शक्तिपीठाची) विधिवत् स्थापना करण्यात आली.

येथे सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार समीरदादांच्या हस्ते १८ जून २००९ रोजी श्रीपंचमुख हनुमंताच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही मूर्ती आधी सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या निवासस्थानी स्थानापन्न होती. तसेच सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने रत्नागिरी स्थित श्री. विजयसिंह भिंगार्डे यांना प्राप्त झालेल्या 'दिग्विजय पादुकांची' स्थापनाही अतुलितबलधाममध्येच करण्यात आली आहे.

११ डिसेंबर २०११ रोजी रात्री ८.०० वाजता सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी भगवान श्रीकिरातरुद्रांची तसेच मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०११ रोजी माता शिवगंगागौरीची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये केली. त्यानंतर सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्याच संकल्पाने १४ वर्षांनंतर भगवान किरातरुद्र व माता शिवगंगागौरी यांचे श्रीअतुलित बलधाम, रत्नागिरी येथे प्रतिष्ठापूर्वक स्थानांतर करून बुधवार, दि. २६ मार्च २०२५ रोजी तेथे स्थापना करण्यात आली.

अतुलितबलधामास दर्शनाकरिता येणारे श्रद्धावान श्रीपंचमुख हनुमंताच्या समोर प्राकारात बसून स्तोत्रपठण, जप, वाचन करू शकतात, तसेच 'अन्नपूर्णा प्रसादम्' अंतर्गत धवलदान - पांढर्‍या रंगाचे धान्य म्हणजेच तांदूळ दान करू शकतात. तसेच या ठिकाणी सुदीप लावण्याची आणि अग्रिहोत्रात ऊद अर्पण करण्याची सुविधाही श्रद्धावानांकरिता उपलब्ध आहे.

भगवान किरातरुद्रांना श्रद्धावान धोतर, शुभ्र वस्त्र आणि श्रीफळ अर्पण करू शकतात तसेच माता शिवगंगागौरीला पिवळी साडी आणि श्रीफळ अर्पण करू शकतात. तसेच गाभार्‍यासमोर प्राकारातील भागात भगवान किरातरुद्रांच्या समोर पीडानाशक सुदीप लावू शकतात व माता शिवगंगागौरी समोर बाधानिवारक सुदीप लावू शकतात.

या कलियुगात येणा‍र्‍या भीषण काळाला समर्थपणे तोंड देण्यासाठी श्रीहनुमंताच्या उपासनेचे महत्त्व आपल्याला सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितलेलेच आहे. आपापल्या नित्य उपासनांबरोबरच 'श्रीपंचमुख हनुमत्कवच'चे जास्तीतजास्त पठण करण्यासही बापूंनी श्रद्धावानांना सांगितले आहे.

Shree Atulit Baldham
श्रीअतुलितबलधाम

अतुलितबलधाममध्ये होणारे दैनंदिन विधी

  1. १) सकाळी ६.३० ते ८:०० ह्या दरम्यान श्रीपंचमुख हनुमंताचे विधीवत पूजन केले जाते. त्यावेळी ३ वेळा श्रीपंचमुखहनुमत्कवचाचे पठण होते व त्याचबरोबर श्रीहनुमंताच्या चरणांना शेंदूरचर्चन केले जाते. याचबरोबर भगवान किरातरुद्र व माता शिवगगंगागौरी यांचेही यथासांग पूजन केले जाते व सर्व दैवतांना नैवेद्य अर्पण केला जातो.
  2. २) दुपारी १.०० वाजता श्रीहनुमंत, भगवान किरातरुद्र व माता शिवगंगागौरी यांना नैवेद्य अर्पण केला जातो व त्यानंतर आरती होते, ज्यामध्ये श्रद्धावान सहभागी होऊ शकतात.
  3. ३) याचप्रमाणे रात्रौ ७.४५ वाजताही श्रीहनुमंत, भगवान किरातरुद्र व माता शिवगंगागौरी यांना नैवेद्य अर्पण केला जातो व त्यानंतर सायंआरती होते. आरतीनंतर श्रीहनुमानचलीसा, श्रीअनिरुद्धचलीसा व श्रीगुरुक्षेत्रम् मंत्राचे प्रत्येकी एकदा पठण केले जाते, ज्यामध्ये सर्व श्रद्धावान सहभागी होऊ शकतात.
  4. ४) रोज संध्याकाळी ४:०० ते ६:०० या वेळेत ’दिग्विजय पांदुकां’चे समंत्रक पूजन संपन्न होते.

अतुलितबलधाममध्ये होणारे विशेष साप्ताहिक, वार्षिक कार्यक्रम/उत्सव

दररोजच्या पूजनाबरोबरच अतुलितबलधाममध्ये खाली नमूद केलेले विशेष साप्ताहिक, वार्षिक कार्यक्रम/उत्सवही साजरे केले जातात.

  1. १) दर रविवारी सकाळी ९.३० वाजता १०८ वेळा घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण केले जाते.
  2. २) वर्षातून ३ वेळा, म्हणजे अनुक्रमे आषाढी एकादशी, श्रीरामनवमी व श्रीविजयादशमी ह्या दिवशी श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्राचे १०८ वेळा पठण केले जाते.
  3. ३) त्याचबरोबर प्रतिवर्षी आषाढी एकादशी (वर्धापनदिन), गुरुपौर्णिमा, अनिरुद्धपौर्णिमा, तसेच चैत्र महिन्यात हनुमानपौर्णिमा असे उत्सव साजरे केले जातात.

दरवर्षी चैत्र शुध्द पौर्णिमेस अतुलितबलधाम येथे ’श्रीहनुमान पौर्णिमा उत्सव’ भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. विशेष म्हणजे ह्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात श्रीपंचमुखहनुमंताच्या मूर्तीवर ‘पंचकुंभाभिषेक’ केला जातो. या उत्सवाच्या वेळी, सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी स्वहस्ते साकारलेली (घडवलेली) श्रीहनुमंताची शिळा गुरुकुल (जुईनगरहून) खास आणली जाते. ऊसाच्या मखराच्या सजावटीमध्ये त्या शिळेची स्थापना केली जाते व पूजन केले जाते. इच्छुक श्रद्धावानांसाठीही ’पंचकुंभाभिषेक’ करण्याची सोय येथे केलेली असते. ह्या 'श्रीपंचकुंभाभिषेकाकरिता' एका महिना आधी आगाऊ नोंदणी करण्याची संधीही श्रद्धावानांना एका लिंकद्वारे दिली जाते. ज्या श्रद्धावानांना स्वतः येणे शक्य नाही अशा श्रद्धावानांसाठी हा पंचकुंभाभिषेक श्रद्धावान पूजनांतर्गत करण्याची सोयही उपलब्ध आहे.

ह्या उत्सवाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर

'ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः'

ह्या श्रीहनुमंताच्या महामंत्राचा अखंड जप सुरू असतो. तसेच 'संकटमोचन श्रीहनुमान स्तोत्र' आणि 'पंचमुखहनुमत्कवचम्' ह्या स्तोत्रांचेही विशिष्ठ अंतराने दिवसभर पठण केले जाते. रात्री १०.०० वाजता पूर्णाहूती दिली जाते व कार्यक्रम संपन्न होतो.

Shree Hanumanta Pournima celebrations ate Shree Atulitabaladham
श्री अतुलितबलधाम येथील श्री हनुमान पौर्णिमा उत्सव

अतुलितबलधाम येथील श्री त्रिविक्रम मठ

दि. १६ मे २०१६ रोजी अतुलितबलधामाच्या वास्तूमधील पहिल्या मजल्यावर सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार ’त्रिविक्रम स्पिरिच्युअल सेंटर’ (श्रीत्रिविक्रम मठाची) सुरूवात झाली. जीवनात स्थैर्य व शांति प्राप्त करण्याकरिता श्रद्धावान ह्या मठात बसून कुठलाही जप, स्तोत्र पठण वा अध्यात्मिक वाचन करू शकतात. बापूंच्या संकल्पानुसार मठात एक वेळा उपासना किंवा स्तोत्र पठण / मंत्र पठण केले की ५४ वेळा पठण केल्याचे फळ मिळते असे मठाचे स्थानमहात्म्य आहे.

सकाळी ८:०० वाजता श्रीत्रिविक्रम मठ उघडला जातो व सकाळचे नित्य पूजन केले जाते. श्रीत्रिविक्रम मठात श्रद्धावाना पुष्पसेवा करू शकतात. या मठाला सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या सिद्ध पादुकाही प्रदान करण्यात आल्या आहेत ज्यावर श्रद्धावान सुगंधित जलाने अभिषेक करू शकतात. संध्याकाळी आरती झाल्यावर साधारण ८.०० वाजता मठ बंद केला जातो. सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे दररोज रात्री होणार्‍या श्रीरामरसायन पठण सेवेप्रमाणेच श्रद्धावान श्रीत्रिविक्रम मठामध्येही शुभंकरा व अशुभनाशिनी नवरात्रमध्ये रात्रौ पठण करू शकतात.

आपला रक्षणकर्ता श्रीहनुमंत

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीहनुमंताच्या उपासनेसाठी ‘श्रीहनुमानचलिसा’ स्तोत्राचे महत्त्व सर्व श्रद्धावानांना सांगितले आहे. अनेक श्रद्धावान श्रीगुरुचरणमासामध्ये (वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या काळात) हनुमानचलिसाचे अधिकाधिक पठण करतात. शनीच्या साडेसातीचा त्रास होऊ नये यासाठी हनुमंताची उपासना करण्याचा प्रघात अनेक ठिकाणी पाळला जातो.

’भूत पिशाच निकट नही आवै । महावीर जब नाम सुनावै ॥

जिथे महावीर श्रीहनुमंताच्या नामाचे स्मरण केले जाते, तिथे भूत-पिशाच्च आणि दुष्ट शक्ती फिरकतही नाहीत. अशी महती असणारा हा हनुमंत भगवद्‍भक्तांचे जीवन सहज, सुंदर व आनंदी करणारा आहे.

महान संत श्रीतुलसीदासविरचीत श्रीरामचरितमानस या ग्रंथात श्रीहनुमंतांचा पराक्रम ज्या भागात वर्णन केलेला आहे, त्या सुंदरकांडावर सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘दैनिक प्रत्यक्ष’ मध्ये १६४४ अग्रलेखांची मालिका लिहिली आहे. तसेच सुंदरकांड पठणाचे महत्व त्यांच्या प्रवचनाद्वारे, लेखनाद्वारे अनेक वेळा सांगितले आहे.

Atulitbaladham as a Place for Strengthening Bhakti and Maryada
श्री अतुलितबलधाम येथे श्रद्धावान सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे पूजन करताना

Photo Gallery

Hanumanta, who is the support, guide, and ideal for Shraddhavans on the path of Bhakti and is endowed with incomparable strength, is 'Atulitbaladham' in Ratnagiri (Maharashtra), established according to the Sankalpa of Sadguru Shree Aniruddha.