श्रद्धावानांसाठी उदी हा एक रामबाण उपाय आहे; श्रद्धावानांसाठी उदी म्हणजे अडचणीच्या प्रसंगी सर्वात आधी आठवणारा आश्वासक आधार आहे. समस्या शारीरिक असो, भौतिक असो किंवा आध्यात्मिक असो, उदी कपाळाला (आज्ञा चक्रस्थानी) व गळ्याला (विशुद्ध चक्रस्थानी) लावावी व उदीचे सेवन करावे आणि आपले सद्गुरु सर्व काही सांभाळून घेतील, हा श्रद्धावानांचा दृढ विश्वास असतो.

२००९ मध्ये श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रद्धावानांना केलेले उदी वाटप

उदीचे अगणित अनुभव

कोणत्याही समस्येचे मानवी पातळीवर निराकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना उदी लावल्याने आध्यात्मिक बळ मिळते, हा श्रद्धावानांचा दृढ विश्वास आणि अनुभव आहे.

अनेक श्रद्धावानांनी या पवित्र उदीवर अढळ श्रद्धा ठेवून ती लावल्याने किंवा ग्रहण केल्याने आजारातून आराम मिळाल्याचा, संकटापासून संरक्षण झाल्याचा, मनातील संभ्रम दूर झाल्याचा आणि दुःखाच्या प्रसंगी आधार मिळाल्याचा अनुभव घेतला आहे. उदी कपाळावर आणि गळ्याला कंठकूपाजवळ लावण्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू श्रद्धावानांना घराबाहेर पडताना किंवा प्रवासात सोबत उदी बाळगण्यास नेहमीच सांगतात. हीच उदी आपली आध्यात्मिक सोबती बनते आणि आपले रक्षण करते.

अनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथे उदी उदीकुंडात ठेवलेली असते आणि कोणीही श्रद्धावान कोणत्याही वेळी स्वतःच्या हाताने उदी घेऊ शकतो. त्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत, कोणतेही औपचारिक सोपस्कार किंवा कर्मकांड नाहीत आणि किती उदी घ्यावी यावरही कोणतीही मर्यादा नाही. श्रद्धावानांना उदी घरी घेऊन जाण्याचे, ती जपून ठेवण्याचे, ती कधीही कपाळाला व गळ्याला लावण्याचे आणि आपल्या प्रियजनांसोबत वाटून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

“ पवित्र उदी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे सर्वांसाठी सदैव उपलब्ध असते - उदीसाठी कोणताही श्रद्धावान रिकाम्या हाताने परत जात नाही आणि कोणालाही उदी घेण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावयास लागत नाही.”

ज्याप्रमाणे श्रद्धावानांसोबत सद्गुरुंचे अस्तित्व सदैव असते, त्याचप्रमाणे त्यांची कृपा सर्वांसाठी निरंतर उपलब्ध आहे, याचे उदीकुंड हे एक प्रत्यक्ष उदाहरण आहे.

बापूंच्या कृपेने कोविडच्या काळात आमच्या कुटुंबाचे रक्षण कसे झाले.

पवित्र उदी ही एक जिवंत अनुभूती आहे

श्री साईसच्चरित्रात पवित्र उदीच्या दैवी प्रभावाचे अनेक अनुभव आढळतात. जामनेर येथे नानासाहेब चांदोरकर यांच्या कन्येची प्रसूती बराच वेळ लांबली होती आणि परिस्थिती अत्यंत गंभीर व जीवघेणी बनली होती. त्यावेळेस तेथे उपलब्ध असलेले सर्व उपाय निष्फळ ठरले होते. त्या निर्णायक वेळी श्री साईनाथांनी शिर्डीहून शंभर मैलांहून अधिक अंतरावर असलेल्या जामनेरला उदीसोबत आपली आरती पाठवली. पूर्ण विश्वासाने ती उदी पाण्यात मिसळून चांदोरकरांच्या कन्येला देण्यात आली आणि त्याच वेळी बाबांची आरती म्हटली गेली. काही मिनिटांतच ते गंभीर संकट दूर झाले आणि तिची सुखरूप प्रसूती झाली. उदीद्वारे भयावह परिस्थिती सुसह्य होते आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते. कारण उदी ही श्री साईबाबांच्या कृपेचे एक जिवंत माध्यम आहे. हा प्रसंग अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित करतो की उदी ही केवळ पवित्र भस्म नाही.

श्रद्धावानांचा विश्वास आहे की उदीमध्ये सद्‍गुरुंचा आशीर्वाद आणि कृपा सामावलेली आहे.

श्री साईसच्चरित्रातील आणखी एक प्रसंग उदीचे सामर्थ्य आणि प्रभाव सुंदररीत्या स्पष्ट करतो. बाळाजी नेवासकर यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांपेक्षा कितीतरी अधिक पाहुणे येतात आणि तयार केलेले अन्न अपुरे पडेल असे वाटू लागते. त्यामुळे होणार्‍या मानहानीच्या शक्यतेने नेवासकरांची पत्नी व्यथित होते. त्यावेळी त्यांच्या सासूबाई त्यांना भांड्यांमधील अन्नामध्ये उदी मिसळून ती भांडी झाकून ठेवण्याचा आणि साईबाबांचे स्मरण करत श्रद्धेने अन्न वाढण्याचा सल्ला देतात. पूर्ण विश्वासाने त्यांनी तसे करताच ते अन्न सर्वांसाठी पुरतेच आणि वर पुन्हा शिल्लकही राहते.

उदी म्हणजे केवळ पवित्र भस्म नाही.

हे अनुभव एका महत्त्वाच्या तत्त्वाची जाणीव करून देतात ते म्हणजे “जशी आपली श्रद्धा, तसे उदीचे कार्य.”

श्रद्धेने उदी लावल्याने अशांत मनाला शांती आणि दिलासा मिळतो. समर्पणाच्या भावनेने उदीचे ग्रहण केले असता, ती मनाचे सामर्थ्य आणि धैर्य वाढवते. नेहमी उदी सोबत बाळगली असता, ती संरक्षक कवचाप्रमाणे कार्य करते आणि कृतज्ञतेने उदी स्वीकारली असता ती भक्ती अधिक दृढ करते.

काही वर्षांपूर्वी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी स्वतः श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथे हीच उदी आपल्या हातांनी श्रद्धावानांना दिली होती. ज्यांना बापूंकडून उदी मिळाली, त्यांच्यासाठी तो क्षण खरोखरच पावित्र्याची परमावधी होती. प्रत्यक्ष सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंकडून उदी प्राप्त होणे म्हणजे त्यांचा आशीर्वाद, करुणामय स्पर्श आणि संरक्षणाचे मूक आश्वासन प्राप्त होणे अशीच श्रद्धावानांची भावना होती.

सद्गुरु अनिरुद्ध बापूंना प्रत्येक श्रद्धावानाला स्वतःच्या हाताने उदी देणे शक्य नसल्यामुळे, त्यांच्या संकल्पानुसार आणि आशीर्वादाने ही पवित्र उदी उदीकुंडामार्फत सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बापू स्वतः उदी देताना श्रद्धावान त्या पवित्र क्षणाची अधिरतेने वाट पाहत असत आणि जेव्हा त्यांच्या ओंजळीत उदी दिली जात असे, तेव्हा जणू काही बापूंची कृपाच त्यांच्या हातात उतरली आहे, असे त्यांना वाटत असे. त्या साध्या कृतीत अफाट आध्यात्मिक सामर्थ्य होते. त्याने उपस्थितांच्या मनात श्रद्धा बळकट केली, शरणागतीची भावना अधिक दृढ केली आणि उपस्थितांच्या हृदयात एक अमिट क्षण कोरला.

अखेरीस उदी आपल्याला हेच शिकवते की सद्गुरुकृपा नेहमीच साध्या, विनम्र आणि सामर्थ्यशाली रूपात आपल्या सोबत असते.

उदी म्हणजे आशीर्वाद. उदी म्हणजे संरक्षण. उदी म्हणजे आश्वासन. उदी म्हणजे सद्‍गुरुंच्या अविरत वाहणार्‍या कृपेचे मूर्तिमंत स्वरूप आहे.

Shraddhavans taking Udi from Udikund in Shree Aniruddha Gurukshetram
श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मधील उदीकुंडातून उदी घेणारे श्रद्धावान
Shraddhavans taking Udi prasad
Shraddhavans taking Udi prasad
Shraddhavans taking Udi prasad
Shraddhavans taking Udi prasad
Sadguru Shree Aniruddha Bapu offers His sacred touch to the Udi, blessing it with divine grace.
Sadguru Shree Aniruddha Bapu offers His sacred touch to the Udi, blessing it with divine grace.
Shraddhavans, filled with reverence and gratitude, receive the sacred Udi from the hands of Sadguru Shree Aniruddha Bapu at Shree Gurukshetram.
Shraddhavans, filled with reverence and gratitude, receive the sacred Udi from the hands of Sadguru Shree Aniruddha Bapu at Shree Gurukshetram.