भारतवर्ष ही भूमी नेहमीच तपश्चर्येने पावन झालेली भूमी आहे. परमात्म्याच्या दिव्य अवतारांपासून ते महान ऋषींपर्यंत असंख्य विभूतींनी येथे दिव्य साधनेचा मार्ग अनुसरला आहे. देवयान पथावरून चालणाऱ्या या दैवी विभूतिंकडून केली जाणारी उपासना ही 'पावित्र्य हेच प्रमाण' या अधिष्ठानावर होत असते आणि ती विश्व कल्याणाच्या हेतूनेच केली जाते.

तपश्चर्येच्या काळात आणि आजही आपण दररोज पाहतो की, बापूंचे जीवन स्वयमेव एक तपश्चर्याच आहे. बापुंचा व्यस्त दिनक्रम आणि आपल्या श्रद्धावान मित्रांसाठी अहोरात्र झटण्याचे त्यांचे अव्याहत चालत असलेले परिश्रम पाहिले तर नक्कीच खात्री पटते की ही तर एका तपस्व्याचीच दिनचर्या आहे.

रात्री सारं जग झोपलेले असताना बापू मात्र त्यांच्या अध्ययनकक्षात आपले कार्य करत असतात. ते केवळ अल्पकाळ विश्रांती घेतात आणि पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागलेले असतात. ते कायम उत्साही आणि ताजेतवाने असतात. त्यांची निद्रा ही एखाद्या योग्याच्या निद्रेसारखी आहे.

येथे आपल्याला भगवद्गीतेतील एका श्लोकाची आठवण होते :

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:॥

--- श्रीमद्भगवद्गीता २/६९

जी सर्व प्राणिमात्रांची रात्र असते, तिच्या ठिकाणी संयमी मनुष्य जागा असतो आणि ज्या अवस्थेत सर्व प्राणीमात्र जागे असतात ती डोळे उघडून पाहणाऱ्या महामानवाची रात्र असते. (भावार्थ : आम्हा सामान्य माणसांची इंद्रिये ज्या विषयांप्रति जागृत असतात, त्या विषयांप्रति तपस्वी अनासक्त असतो आणि ज्या परमेश्वर भक्तीविषयी आम्ही उदासीन असतो त्याविषयी तपस्वी जागृत असतो.)

या श्लोकाचे जिवंत प्रत्यंतर सद्‍गुरु अनिरुद्ध बापूंच्या जीवनातून येते.

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌‍येथील सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंची श्री स्वस्तिक्षेम तपश्चर्या

कठोर स्वस्तिक्षेम तपश्चर्येचा त्रिविध मार्ग

बापूंची तपश्चर्या तीन टप्प्यांत झाली :

  1. बापूंनी आदिमाता चण्डिकेची ब्रह्मत्रिपुरसुंदरी या स्वरूपात उपासना केली.
  2. बापूंनी बला-अतिबला उपासना केली.
  3. सावित्री विद्या उपासना केल्यानंतर बापूंनी श्रीविद्या उपासना केली.

ह्यासाठी बापूंनी त्रिमितीय श्रीयंत्र तयार करून घेतले आणि त्याची विधिवत प्रतिष्ठापना केली (ते सिद्ध केले).

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌‍येथील सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंची श्री स्वस्तीक्षेम तपश्चर्या

सर्वांग- ब्रह्मास्त्र

मन, प्राण आणि शरीर या मानवी जीवनातील त्रिवेणी आहेत. ती दोन अवस्थांपैकी एका अवस्थेत असू शकते:

युक्त त्रिवेणी

या अवस्थेत मन आणि प्राण शरीराशी बांधलेले असतात अशी स्थिती असते. अशा स्थितीत मानवाची आसक्ती, आध्यात्मिक दुर्बलता आणि पापाकडे प्रवृत्त होण्याची शक्यता निर्माण होते.

मुक्त त्रिवेणी

या अवस्थेत मन आणि प्राण प्रज्ञेशी (उच्च ज्ञानाशी) बांधलेले असतात आणि प्रज्ञेद्वारे ते महाप्रज्ञा व आदिमातेशीही जुळलेले असतात, यामुळे ख‍र्‍या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. बहुतेक लोक युक्त त्रिवेणी अवस्थेत अडकून राहतात.

सर्वांग-करुणाश्रय

विश्वामध्ये दोन प्रकारच्या शक्ती असतात --- जीवन विघातक (जीवनाचा क्षय करणार्‍या शक्ती) आणि जीवनसंवर्धक (जीवनाचे पोषण करणार्‍या शक्ती). सर्वांग-करुणाश्रयाचा उद्देश मनुष्याच्या जीवनातील जीवनविघातक शक्तींचा नाश करून जीवनसंवर्धक शक्तींची जोपासना करणे व त्यांना बळकटी देणे हा आहे.

मुळात बरेचदा मानवाला जीवनविघातक आणि जीवनसंवर्धक या दोन शक्तींमधील फरक ओळखता येत नाही, त्याची गफलत होते आणि त्याची फसवणूक होते. पण ज्याने सर्वांग-करुणाश्रयाचा आश्रय घेतला, त्याच्या जीवनात मात्र जीवनविघातक शक्तींचा प्रवेशच होऊ शकत नाही व आध्यात्मिक प्रगतीला पोषक असलेल्या शक्तींची वृद्धी होत राहते.

Sadguru Aniruddha Bapu performing the Swastikshem Tapascharya

सनातन अग्नीचे - वैश्वानराचे - आवाहन

अश्वो न क्रन्दञ्जनिभिः समिध्यते वैश्वानरः कुशिकेभिर्युगे युगे ।
स नो अग्निः सुवीर्यं स्वश्व्यं दधातु रत्नममृतेषु जागृविः ।।

— ऋग्वेद ३-२६-३
ज्याप्रमाणे मूळ प्राणशक्तीद्वारे प्राणाग्नी प्रज्वलित केला जातो, त्याचप्रमाणे कुशिक वंशातील महान विभूतींद्वारे अपवित्रता नाश करणारा पवित्र यज्ञाग्नी वैश्वानर हा युगानुयुगे पुन: पुन: प्रज्वलित केला जातो.

कौशिक वंश (कुळ) म्हणजे ऋषी विश्वामित्रांचा वंश (कुळ). विश्वामित्रांद्वारे उपदेशिलेल्या पवित्र विद्यांचा साधक जो कोणी बनतो, तो स्वाभाविकपणे कुशिक कुळाचा होऊन जातो. सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या यज्ञातील एक मंत्र हा प्रत्यक्षात ऋषी विश्वामित्रांनी श्रीरामांना दिलेला दीक्षामंत्र आहे. सद्‍गुरु बापू हे गायत्रीचे निस्सीम उपासक आहेत आणि या तपश्चर्येदरम्यान त्यांनी बला-अतिबला उपासना केली. त्यामुळे सद्‍गुरु बापू हे साहजिकच ऋषी विश्वामित्रांच्या कुशिक कुळातील महान विभूती बनले आहेत.

स्वस्तिक्षेम तपश्चर्या या बापूंच्या कठोर तपश्चर्येच्या संपूर्ण कालावधीत सद्‍गुरु बापूंचे हृदय दिव्य मातेशी अखंड आणि अविच्छिन्न अनुसंधानात राहिले. या अंतर्गत स्पंदनाला विविध अनुष्ठाने, पारायणे, ध्यान आदि अनेक तप:साधनांची साथ लाभली आणि त्यामुळे एक सामर्थ्यशाली आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

कुण्डपाय्य यज्ञ

सद्‍गुरु बापूंनी आपल्या तपश्चर्येदरम्यान केलेला यज्ञ ‘कुण्डपाय्य यज्ञ’ म्हणून ओळखला जातो. त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

  1. कुण्डपाय्य यज्ञ हा विषम-अष्टास्त्रम्‌‍कुंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशेष यज्ञकुंडात केला जातो.
  2. कुण्डपाय्य यज्ञात ‌ मुख्यत: ‘अहं‌’चे (‌‘स्व‌’ चे) यज्ञाग्नीमध्ये हवन करणे हाच मूळ गाभा आहे.
  3. या यज्ञामध्ये अध्वर्यु, ऋत्विक, होता, उद्गाता, यजमान आदि सर्व ऋत्विजांच्या भूमिका एकच व्यक्ती पार पाडते.
  4. व्यष्टि तसेच समष्टि दोन्हीच्या कल्याणासाठी हा यज्ञ केला जातो.
  5. यज्ञकर्ता (यज्ञ करणारी व्यक्ती) अखिल विश्वाचे प्रतिनिधित्व करीत असतो.

यस्ते शृङ्गवृषो नपात् प्रणपात् कुण्डपाय्यः ।
न्यस्मिन् दन आ मनः ।।

— ऋग्वेद ८-१७-१३
‌‘शृंग‌’ या शब्दाचा अर्थ ऋषी व सूर्यकिरण. जीवनदायी किरणांचा वर्षाव करणार्‍या सूर्याला खाली पडू न देता अंतरिक्षात स्थिर ठेवणार्‍या भगवंता, अर्थात ज्ञानदान करणार्‍या ऋषींना च्युत होऊ न देता आचार्यपदी स्थित ठेवणार्‍या भगवंता, हा ‌‘कुण्डपाय्य‌’ यज्ञ केवळ आपल्यालाच समर्पित आहे. आमच्या या यज्ञात तुला आम्ही खाली पडू देणार नाही अर्थात तुला आमची लाज वाटेल असे कोणतेही आचरण आम्ही कधीही करणार नाही.

ही अत्यंत सुंदर प्रार्थनाच कुण्डपाय्य यज्ञाचा निर्धार आहे.

कुण्डपाय्य यज्ञात स्वत: सद्‍गुरु बापूंनी वेदोक्त मंत्रांसह पवित्र अग्नीमध्ये आहुती अर्पण केल्या.

‌मदर्थ झटतो किती बापू माझा‌!

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ही कठोर तपश्चर्या केवळ आपल्या श्रद्धावान मित्रांच्या कल्याणासाठी केली. मानवाची असहायता आणि या जगात त्यांना सामोरे जावे लागणारे असंख्य संघर्ष यांची त्यांना सखोल जाणीव होती. त्यामुळे त्यांना बळ देण्यासाठी, त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचे उत्थान करण्यासाठी एक दिव्य माध्यम म्हणून त्यांनी या पवित्र तपश्चर्येची संकल्पना केली.

स्वस्तिक्षेम तपश्चर्येला अश्विन (अशुभनाशिनी) नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये सुरुवात झाली - हा उत्सव आपल्या दिव्य आदिमातेने सर्व अनिष्ट आणि अशुभांवर मिळविलेल्या विजयाचा उत्सव आहे. आमच्या जीवनातील अशुभत्वाचा म्हणेजच राक्षसचमूचा नाश करून श्रद्धावानांच्या जीवनात सदैव धर्म, विजय आणि निर्मळ आनंदाचे प्रतीक असलेला रामनवमीचा सूर्य तळपत रहावा, हा या तपश्चर्येचा उद्देश होता.

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या तपश्चर्येची गहनता (खोली), त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि प्रत्येक श्रद्धावानाच्या कल्याणासाठी त्यांना असलेली अपार तळमळ यावर जेव्हा आपण थांबून मनन करतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात केवळ एकच गहन जाणीव होते :

Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya
Aniruddha Bapu performing Swastikshem Tapascharya