सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या सर्वांगीण आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आशीर्वादाने, श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन, भारतीय भाषा संगम आणि श्री अनिरुद्धाज हाऊस ऑफ फ्रेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पवित्र माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा पवित्र उत्सव हिंदू पंचांगातील पवित्र माघ महिन्यातील शुद्ध (शुक्ल) चतुर्थीला, म्हणजे अमावास्येनंतरच्या चौथ्या दिवशी येतो.

मानवजातीला भौतिक यशाबरोबरच आध्यात्मिक प्रगती साधता यावी आणि या पृथ्वीवरील जीवनात सर्वांगीण विकास साधता यावा, यासाठी पार्वतीमातेने या दिवशी विश्वाचा घनप्राण, म्हणजेच स्थूल स्तरावरील जीवनशक्ती, श्रीगणपतीला आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट केले. ही सुंदर आणि गहन कथा सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी लिहिलेल्या पवित्र ‘श्रीमातृवात्सल्यविंदानम्’ या ग्रंथात अत्यंत प्रेमपूर्वक आणि सविस्तरपणे विशद केली आहे.

चला, ही कथा ऐकूया आणि तसेच माघी गणपती जन्मोत्सव आणि भाद्रपद महिन्यात साजरी होणारी श्रीगणेश चतुर्थी यांमधील आध्यात्मिक फरकही सद्गुरु अनिरुद्ध बापूंकडून जाणून घेऊया:

माघ चतुर्थी आणि भाद्रपद चतुर्थीच्या महत्त्वातील फरक – सद्गुरु अनिरुद्ध बापू

हा उत्सव भक्तांकडून केवळ या जन्मातील कल्याणासाठीच नव्हे, तर पूर्वजन्मांपेक्षाही अधिक प्रगती साधता यावी, या उद्देशाने साजरा केला जातो. मानवी जीवनाचे हे ध्येय तसेच माघी गणपती जन्मोत्सवाच्या दिवशी श्रीगणपतीच्या दर्शनाचे महत्त्व सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंकडून जाणून घेऊया :

माघी गणपतीच्या दिवशी श्रीगणेशाचे दर्शन घेण्याचे महत्त्व – सद्गुरु अनिरुद्ध बापू

उत्सवातील पवित्र उपासना

ध्वजारोहण समारंभ

सूर्योदयाच्या वेळी ‘वैदिक राष्ट्रगीत’च्या पठणामध्ये ध्वजारोहण समारंभ संपन्न होतो. या समारंभात स्कंदध्वज फडकविला जातो.

ध्वजारोहण – श्रीमाघी गणेश जन्मोत्सवाची मंगलमय सुरुवात

श्रीगणेश प्रतिष्ठा याग

श्री माघी गणपती जन्मोत्सवाच्या या पावन दिवशी, प्राचीन वैदिक परंपरेनुसार ‘एकदिन साध्य श्रीगणेश प्रतिष्ठा याग’ अत्यंत विधिपूर्वक आयोजित केला जातो. या यागामध्ये श्रीगणपतीच्या ‘श्रीब्रह्मणस्पती’ स्वरूपाचे पूजन केले जाते.

या यागामध्ये वैदिक मंत्रोच्चारांसह श्रीगणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते. वैदिक मंत्रपठण, हवन, संकल्प आणि अन्य विहित धार्मिक विधींसह हा याग भक्तांच्या जीवनातील विघ्ने दूर व्हावीत तसेच त्यांच्या जीवनात कल्याण, मांगल्य आणि सौहार्द नांदावे, या उद्देशाने संपन्न केला जातो.

दुपारच्या सुमारास श्रीगणेश जन्माचा पवित्र विधी संपन्न होतो.

एकदिन साध्य श्रीगणेश प्रतिष्ठा याग

श्रीब्रह्मणस्पती पूजन आणि अभिषेक

या पावन प्रसंगी, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या निवासस्थानी नित्य पूजनात असलेली ‘श्रीब्रह्मणस्पती’ स्वरूपातील श्रीगणपतीची दिव्य मूर्ती उत्सवाच्या पवित्र स्थळी विधिपूर्वक आणून तिचे पूजन केले जाते.

श्रीब्रह्मणस्पतीच्या पूजनामध्ये ‘नगर परिक्रमा’ या पवित्र विधीचाही समावेश असतो. या विधीमध्ये देवतेची पूजनीय मूर्ती वैदिक मंत्रोच्चार आणि भक्तिगीतांच्या गजरात निर्धारित परिसरातून विधिपूर्वक मिरवणुकीने नेली जाते आणि अशा प्रकारे त्या संपूर्ण परिसराची परिक्रमा केली जाते.

श्रीब्रह्मणस्पतीच्या मूर्तीवर अत्यंत भक्तिभावाने पवित्र अभिषेक केला जातो. या मंगल विधीदरम्यान मंत्रसामर्थ्याने युक्त अश्या ‘श्रीब्रह्मणस्पती सूक्ताचे’ पठण केले जाते.

पूजनीय ऋषी गृत्समद शौनक यांनी मानवजातीला प्रदान केलेले कालातीत ‘श्रीब्रह्मणस्पती सूक्त’ हे ऋग्वेदातील अत्यंत पवित्र सूक्तांपैकी एक मानले जाते. या सूक्ताचे आध्यात्मिक सामर्थ्य केवळ व्यक्ती आणि समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रासाठीही कल्याणकारी मानले जाते आणि त्याचबरोबर प्रत्येक श्रद्धावान आणि राष्ट्रप्रेमी नागरिकामध्ये निर्भयता आणि सक्षमता यांची भावनाही जोपासते.

नगर परिक्रमा | माघी गणेशोत्सव २०२४

श्रीगणपती अथर्वशीर्ष पुरश्चरण आणि अभिषेक

श्रीब्रह्मणस्पती पूजनानंतर श्रीब्रह्मणस्पतीच्या मूर्तीवर आठ पवित्र नद्यांमधून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक केला जातो आणि त्याच वेळी गणपती अथर्वशीर्षाचे श्रद्धेने पठण केले जाते.

श्रीगणपती अथर्वशीर्ष पुरश्चरण आणि अभिषेक

विघ्नविनाशक पूजन

जीवनातील विघ्ने आणि अडचणी दूर होऊन निर्विघ्न प्रगती व कल्याण साधता यावे, यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या पवित्र संकल्पानुसार माघी गणपती जन्मोत्सवामध्ये ‘श्रीविघ्नविनाशक गणपती पूजन’ केले जाते. मोठ्या संख्येने श्रद्धावान या पवित्र पूजनामध्ये सहभागी होऊन अत्यंत भक्तिभावाने आणि प्रेमपूर्वक हे पूजन करतात.

विघ्नविनाशक पूजन

श्रीअष्टविनायक पूजन आणि दर्शन

सद्गुरु श्री अनिरुद्ध एक अत्यंत गहन आध्यात्मिक सत्य विशद करतात :

“मन, प्राण आणि बुद्धी या मानवी त्रिविध देहाचे तसेच भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्यांच्याशी निगडित प्रक्रियांचे नियमन श्रीगणपती करतो.”

या अंतर्गत व्यवस्थेतील आठ अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक केंद्रे श्रीअष्टविनायकांच्या (श्रीगणेशाच्या आठ स्वरूपांच्या ) प्रत्यक्ष आणि कृपामय नियंत्रणाखाली असतात. भगवंताची कृपा प्राप्त करण्याच्या साधकाच्या मार्गात येणारे अडथळे व अडचणी—जे अनेकदा चुकीचे निर्णय किंवा प्रज्ञापराध यांमुळे निर्माण होतात—श्रीअष्टविनायकांच्या चरणी नम्रतापूर्वक प्रार्थना केल्याने प्रेमपूर्वक दूर केले जातात.

या उत्सवामध्ये, अष्टविनायकांच्या मूळ तीर्थक्षेत्री असलेल्या त्यांच्या दिव्य स्वरूपांशी साधर्म्य असलेल्या श्रीअष्टविनायकांच्या सर्व मूर्तींचे वैदिक पद्धतीने पूजन केले जाते. त्यानंतर श्रद्धावान श्रीअष्टविनायकांचे दर्शन घेतात. तसेच प्रत्येक श्रद्धावानाला श्रीब्रह्मणस्पती आणि श्रीअष्टविनायकांना पवित्र दूर्वा , लाल आणि सुगंधी लाल फुले अर्पण करण्याची मंगल संधी प्राप्त होते.

भक्तीचे अर्पण म्हणून उत्सवादरम्यान ‘श्रीगणपती अथर्वशीर्षाचे’ अखंड पठण केले जाते. श्रद्धावानांनाही श्रीब्रह्मणस्पतीच्या मंत्राच्या आणि अथर्वशीर्षाच्या भावपूर्ण पठणात सक्रियपणे सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाते. या पठणामुळे श्रद्धावानांना श्रीगणेशाच्या दिव्य ऊर्जाप्रवाहाशी जोडले गेल्याची अनुभूती प्राप्त होते.

श्रद्धावानांवरील आपल्या निरपेक्ष प्रेमातून, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी सर्व श्रद्धावानांना पुढील ‘श्रीब्रह्मणस्पती मंत्र’ प्रदान केला आहे. हा मंत्र कल्याणकारी असून जीवनातील विघ्ने दूर करणारा आहे :

ॐ श्रीब्रह्मणस्पतये पार्वतीपुत्राय। मंगलमूर्तये गणपतये विश्वघनप्राणाय। सर्वविघ्ननिवारकाय नमो नमः॥

रीब्रह्मणस्पती आणि श्रीअष्टविनायकांच्या पवित्र दर्शनामुळे श्रद्धावानांच्या जीवनातील संकटे आणि विघ्ने बघता बघता दूर होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर सद्गुरुंच्या सर्वव्यापी प्रेममय कृपाछत्राखाली त्यांचे जीवन अधिक समृद्ध आणि मंगलमय होत जाते. अशा दृढ भक्तीने आणि श्रद्धाभावाने श्रद्धावान दरवर्षी ‘श्री माघी गणेशोत्सव’ भक्तिपूर्वक साजरा करतात.

श्रीअष्टविनायक पूजन आणि दर्शन

माता शिवगंगागौरी पूजन

श्रीब्रह्मणस्पती हे माता पार्वती आणि गंगामाता यांचे संयुक्त स्वरूप असलेल्या माता शिवगंगागौरीचे दिव्य पुत्र असल्यामुळे, श्रीगणेश प्रतिष्ठा यागासोबतच विहित पवित्र विधींनुसार आणि वैदिक मंत्रोच्चारांसह माता शिवगंगागौरीचे यथासांग पूजन व अर्चन अत्यंत भक्तिभावाने केले जाते.

पूजनविधी पूर्ण झाल्यानंतर, अमंगलापासून संरक्षण करणारे कवच मानली जाणारी मंगलमय ‘हरिद्रा’ (पवित्र हळद) आणि पिवळी पुष्पे माता शिवगंगागौरीला श्रद्धापूर्वक अर्पण केली जातात. उत्सवाची सांगता होईपर्यंत शिवगंगागौरी मातेच्या अष्टोत्तरशतनामावलीतील १०८ पवित्र नामांचे पठण केले जाते. या नामपठणामुळे सर्व प्रकारचे अमंगल दूर होते, अशी श्रद्धा आहे.

याच दरम्यान श्रीब्रह्मणस्पती मंत्राचे पठण करत श्रीब्रह्मणस्पतीला अखंड दूर्वा अर्पण करून त्यांचे पूजन केले जाते.

माता शिवगंगागौरी आणि श्रीब्रह्मणस्पती दर्शन

श्रीब्रह्मणस्पतीविषयी अधिक माहिती : जीवनाच्या प्रवासासाठी मार्गदर्शन

पवित्र धर्मग्रंथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, श्रीब्रह्मणस्पतीच्या चार दिव्य आयुधांचा आपल्या प्राणमय देहातील मूलाधार चक्राच्या चार पाकळ्यांशी—आहार, विहार, आचार आणि विचार—अत्यंत गहन संबंध आहे. मूलाधार चक्राच्या या चार पाकळ्या आपल्या ऐहिक आणि आध्यात्मिक वाटचालीला दिशा देतात.

या चार दिव्य आयुधांचे महत्त्व आणि आपल्या चेतनेशी असलेला त्यांचा सूक्ष्म संबंध समजून घेऊया:

परशु (कुऱ्हाड)

श्रीब्रह्मणस्पतीच्या परशुचे दिव्य कार्य म्हणजे आपल्या विचारांना योग्य दिशा देणे. मानवी देहातील विचारकेंद्रावर असलेल्या श्रीगणपतीच्या प्रभावाचे प्रतीक म्हणजे परशु. योग्य-अयोग्य तसेच चांगले-वाईट यांतील भेद ओळखण्याची विवेकबुद्धी जागृत करून, भ्रमाचे आवरण दूर करत सत्याचे आकलन घडविणारे हे दिव्य आयुध आहे.

पाश (फास)

पाश हे श्रीब्रह्मणस्पतीचे दिव्य आयुध असून ते आपल्या आचाराला योग्य मर्यादा घालून त्याचे शुद्धीकरण व नियमन करण्याचे कार्य करते. अशा प्रकारे पाश हे मानवी देहातील आचारकेंद्रावर असलेल्या श्रीब्रह्मणस्पतीच्या मार्गदर्शक प्रभावाचे प्रतीक आहे. ते आपल्याला ‘मर्यादेचे’—म्हणजेच योग्य आणि हितकारक सीमांचे—महत्त्व जाणवून देते.

दंत (सोंडदंत)

दंत हे मानवी देहातील विहारकेंद्रावर असलेल्या श्रीब्रह्मणस्पतीच्या करुणामय प्रभावाचे प्रतीक आहे. मनाची अखंड भटकंती, बुद्धीचा प्रवास तसेच काळाच्या आणि अवकाशाच्या विविध स्तरांतून होणारा स्थूल देह व प्राण यांचा संचार, यांमधून सुख-दुःखाचे द्वंद्व निर्माण होते. त्यागाचे प्रतीक असलेला भग्नदंत आपल्याला अनावश्यक आणि ‘चित्त विचलित’ करणारे विचार सोडून देण्याची तसेच मनाची अस्थिर भटकंती कमी करण्याची शिकवण देतो आणि वर्तमान क्षणात स्थिर राहण्यास मार्गदर्शन करतो.

मोदक (मिष्टान्न)

मोदक हे मानवी देहातील आहारकेंद्रावर असलेल्या श्रीब्रह्मणस्पतीच्या मंगलमय प्रभावाचे प्रतीक आहे. आपल्यापर्यंत केवळ चांगले, हितकारक आणि ईश्वरी तत्त्वाशी सुसंगत असेच पोहोचावे, यासाठी कार्यरत असलेल्या व्यवस्थेचे ते प्रतीक आहे. येथे ‘आहार’ म्हणजे केवळ अन्नग्रहण नव्हे; तर मन आणि पाचही ज्ञानेंद्रियांद्वारे आपण ग्रहण करत असलेले विचार, कल्पना, संस्कार आणि अनुभूती यांचाही त्यात समावेश होतो. आपण जे काही ग्रहण करतो ते सजगपणे आणि विवेकपूर्वक ग्रहण करण्यातील माधुर्य मोदक आपल्याला शिकवतो.

अशा प्रकारे, माघी गणपती जन्मोत्सव हा केवळ एक उत्सव न राहता, मानवी जीवनावर असलेल्या श्रीगणपतीच्या अखंड कृपामय संरक्षणाची जाणीव करून देणारा एक पवित्र सोहळा ठरतो. ब्रह्मणस्पती रूपात श्रीगणपती साधकाला अस्तित्वाच्या मुळाशी स्थिर करतो आणि त्याचे विचार, आचार, आहार आणि विहार यांमध्ये सुसंवाद साधून, संभ्रम निर्माण झालेल्या ठिकाणी समतोल प्रस्थापित करतो.

या उत्सवातील गहन आध्यात्मिक उपासना-विधींमधून म्हणजेच वैदिक मंत्रपठण, अभिषेक, श्रीअष्टविनायक दर्शन तसेच सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रेममय मार्गदर्शनाद्वारे, जीवनातील विघ्ने केवळ दूर होत नाहीत, तर तीच विघ्ने आध्यात्मिक उन्नतीच्या पायऱ्यांत रूपांतरित होतात.

अखेरीस या सर्व अनुभूतींतून श्रद्धावानाच्या मनात एक दृढ आणि शांत विश्वास रुजतो: जेव्हा जीवन भक्तीशी एकरूप होते आणि प्रेम व पवित्र भावाने भगवंताच्या चरणी समर्पित केले जाते, तेव्हा श्रीगणपती स्वतः अंतर्यामी मार्गदर्शक बनून साधकाला आनंद, विवेक आणि चिरंतन मांगल्याच्या दिशेने निरंतर पुढे घेऊन जातात.

श्रीमाघी गणपती जन्मोत्सवाविषयी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा:

माघी गणपती उत्सव म्हणजे काय?
The powerful Ganpati Atharvashirsha is continuously chanted during the Utsav celebrations. Shraddhavans are encouraged to participate actively in the soul-stirring chanting of the Brahmanaspati’s Mantra and the Atharvashirsha.

Shraddhavans (devotees) wholeheartedly perform the Vighnavinashak Ganapati Poojan

The Ekdin Sadhya Shree Ganesh Pratishtha Yaag performed during Maghi Ganesh Janmotsav