श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम्
अशा ह्या श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्मध्ये आदिमाता श्रीमहिषासुरमर्दिनी जगदंबेचा अवतरण सोहळा दिनांक ९ ऑगस्ट २००९ ते १७ ऑगस्ट २००९ या कालावधीत संपन्न झाला, ज्यामध्ये स्वत: सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी वज्रमण्डलपीठपूजनम्केले. सन २००९ सालच्या घटस्थापनेस (नवरात्रीच्या पहिल्या दिवशी) सद्गुरु श्रीअनिरुद्ध लिखित ‘श्रीमातृवात्सल्यविन्दानम्’ह्या ग्रंथाचे प्रकाशन झाले.
नंतर मंगळवार दिनांक ३० मार्च २०१० रोजी चैत्र पौर्णिमेच्या अर्थात्हनुमान पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्येथे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार श्रीत्रिविक्रम लिंगाची स्थापना झाली आणि त्यावेळी बापूंच्या उपस्थितीत श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्मंत्राचे सर्वप्रथम पठण करण्यात आले.
त्यानंतरच्या गुरुवारी म्हणजे दिनांक १ एप्रिल २०१० रोजी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘श्रीहरिगुरुग्राम’ येथे अनिरुद्धांवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी ‘श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्मंत्र’ खुला केला व सांगितले की,
‘ज्याने हा गुरुमंत्र स्वीकारला, त्याने स्वत:ला कधीही कमनशिबी समजू नये. कारण हा गुरुमंत्र प्रत्येकाला देवयान पंथावर आणून स्थिर करणार आहे.’
श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम् मंत्र
ॐ श्री दत्तगुरवे नमः
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे—सर्वबाधाप्रशमनं—श्रीगुरुक्षेत्रम् ।
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे—सर्वपापप्रशमनं—श्रीगुरुक्षेत्रम् ।
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे—सर्वकोपप्रशमनं—श्रीगुरुक्षेत्रम् ।
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे—त्रिविक्रमनिलयं—श्रीगुरुक्षेत्रम् ।
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे—सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं—श्रीगुरुक्षेत्रम् ।।
ॐ रामात्मा—श्रीदत्तात्रेयाय नमः ।
ॐ रामप्राण—श्रीहनुमन्ताय नमः ।
ॐ रामवरदायिनी—श्रीमहिषासुरमर्दिन्यै नमः ।
ॐ रामनामतनु—श्रीअनिरुद्धाय नमः ।
ॐ मानवजीवात्मा–उद्धारक–श्रीरामचन्द्राय नमः ।
ॐ मानवप्राणरक्षक–श्रीहनुमन्ताय नमः ।
ॐ मानववरदायिनी–श्रीआह्लादिन्यै नमः ।
ॐ मानवमनःसामर्थ्यदाता–श्रीअनिरुद्धाय नमः ।
Om Shri Dattagurave Namah
Om Aim Hreem Kleem Chamundayai Vichche—Sarvabadhaprashamanam—Shree Gurukshetram.
Om Aim Hreem Kleem Chamundayai Vichche—Sarvapapaprashamanam—Shree Gurukshetram.
Om Aim Hreem Kleem Chamundayai Vichche—Sarvakopaprashamanam—Shree Gurukshetram.
Om Aim Hreem Kleem Chamundayai Vichche—Trivikramanilayam—Shree Gurukshetram.
Om Aim Hreem Kleem Chamundayai Vichche—Sarvasamartham Sarvarthasamartham—Shree Gurukshetram.
Om Ramatma—Shree Dattatreyaya Namah.
Om Ramaprana—Shree Hanumantaya Namah.
Om Ramavaradayini—Shree Mahishasuramardinyai Namah.
Om Ramanamatanu—Shree Aniruddhaya Namah.
Om Manavajivatma–Uddharaka–Shree Ramachandraya Namah.
Om Manavapranarakshaka–Shree Hanumantaya Namah.
Om Manavavaradayini–Shree Ahladinyai Namah.
Om Manavamanahsamarthyadata–Shree Aniruddhaya Namah.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् मंत्राची माहिती आणि महती सांगितली. ते म्हणाले:
`ह्या श्रीगुरुक्षेत्रम् मंत्राकडे पाहिले तर ते तीन वेगळे मंत्र वाटतात. परंतु ते तसे नसून तो तीन भागांनी बनलेला एकच मंत्र आहे. त्याचे तीन भाग म्हणजे त्याची तीन रूपे आहेत - अर्थात बीजमंत्र, अंकुरमंत्र आणि उन्मीलन मंत्र.
आपल्या मनात जे काही चांगले बीजरूपात आहे, त्याचे अंकुरात रूपांतर करणारा व जे अंकुराच्या रूपात आहे, त्याचे उन्मीलनात रूपांतर करणारा हा मंत्र आहे.
उन्मीलन म्हणजे कलिकेपासून कर्णिका, कर्णिकेपासून फूल, फुलापासून फळ, फळापासून बी व बी पासून विशाल वृक्ष असा प्रवास. थोडक्यात बीजापासून अंकुर अवस्था व अंकुरापासून उन्मीलन अवस्थेपर्यत नेणारा हा मंत्र आहे.
अधिक स्पष्ट करायचे तर हा मंत्र प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण उद्धाराचा मार्ग प्रशस्त करतो व प्रत्येकाला विकासाची समान संधी उपलब्ध करून देतो.
आणि बीज, अंकुर, उन्मीलन ह्या तीनही अवस्थांचे मूळ ‘ॐ श्रीदत्तगुरवे नमः’ हा महन्मंगल महामंत्र आहे.
मंत्राची महती
सद्गुरु श्रीअनिरुद्ध या मंत्राचा महिमा वर्णन करताना सांगतात:
‘प्रत्येकाला गुरुक्षेत्रम्च्या, पंचगुरुंच्या, त्रिविक्रमाच्या खुणा पटविणारा हा मंत्र आहे. मुख्य म्हणजे आपल्या स्वत:च्याही खुणा पटविणारा हा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येक जण कधीही म्हणू शकतो’.
ते पुढे म्हणतात:
‘जेव्हा जेव्हा तुम्हाला काही समस्या असेल व तुमचा ‘मित्र’ म्हणून तुम्हाला मला हाक मारावीशी वाटेल, तेव्हा हा मंत्र म्हणा; तसेच एरवीसुद्धा म्हणा.’
या मंत्राच्या सर्वसमावेशक स्वरूपावर बोलताना बापूंनी स्पष्ट केले:
‘ह्या त्रिविध मंत्रात सगळे ग्रंथ, सगळी उपनिषदं, सगळे मंत्र एकत्र आहेत. तुम्हाला कुठल्याही दैवताचे षोडशोपचारे पूजन करायचे असेल व बाकी काही येत नसेल, तर हा त्रिविध मंत्र सोळा वेळा म्हणा व एक एक उपचाराने (आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य इत्यादि सोळा उपचार) पूजन करा. तुमचं पूजन पूर्ण झालेलं असेल.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी जाहीर केले:
‘हा मंत्र मी केवळ प्रवचनाला आलेल्यांसाठीच दिलेला नाही, तर जो तुमचा मित्र असेल, आप्त असेल, ज्याचं बापूवर प्रेम असेल, त्या प्रत्येकासाठी हा गुरुमंत्र आहे.
आज, उद्या, परवा, एक महिन्याने किंवा एक वर्षानेसुद्धा, जेव्हा जमेल तेव्हा रात्री झोपताना एकदा हात जोडून या अनिरुद्धाला सांगा, ‘हो, मी हा मंत्र माझा ‘गुरुमंत्र’ म्हणून स्वीकारला’. तसंच यापुढेही हजारो वर्षांपर्यत ज्या मनुष्याला हा मंत्र आपला गुरुमंत्र म्हणून स्वीकारायचा असेल, त्यानेही ह्या अनिरुद्धाला फक्त एवढंच सांगायचं - ‘अनिरुद्धा, हो! मी हा मंत्र माझा गुरुमंत्र म्हणून घेतला आहे’. एवढे म्हटले तरी त्याला मंत्र मिळाला. आजही आणि कधीही! हे माझं वचन आहे.’
श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे रोज दिवसभर ह्या मंत्राचे पठण सुरू असते व या मंत्राचे पठण सुरू असताना श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्मध्ये त्रिविक्रमावर अभिषेक होत असतो, यामुळे भक्तीपूर्ण वातावरणाची निर्मिती होते.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंना त्यांच्या पंचगुरुंवरील अनिरुद्धप्रेमातून प्राप्त झालेला हा विलक्षण मंत्र अत्यंत परमपावन, कल्याणकर आहे आणि श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्शी म्हणजेच बापूंशी आणि त्यांच्या पंचगुरुंशी प्रेमाने जोडून ठेवणारा आहे.
गुरुमंत्र हा सर्वांसाठी
मंत्र स्वीकारण्यासाठी कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही, कोणत्याही अटी नाहीत, कोणतीही बंधने नाहीत. हा मंत्र स्वीकारण्यासाठी कोणत्याही विधि-विधानांची आवश्यकता नाही. कुठेही जाऊन हा मंत्र स्वीकारण्याची गरज नाही. हा मंत्र स्वीकारण्यासाठी कोणाही मध्यस्थाची गरज नाही.
हा मंत्र स्वीकारण्याची इच्छा असणारा प्रत्येक जण, तो जेथे आहे, तेथे राहूनच स्वेच्छेने हा मंत्र स्वीकारू शकतो. हा मंत्र स्वीकारल्यावर त्याचा जप करण्यासाठी कोणतेही बंधन नाही, शौच-अशौच वगैरे कोणतीही गोष्ट हा मंत्र जपण्याच्या आड येऊ शकत नाही.
परमेश्वरी मार्गाने उचित उद्धार करून घेण्याची इच्छा असणारा प्रत्येक जण हा मंत्र स्वीकारून स्वत:चे जीवन आनंदी करू शकतो.
अनेक श्रद्धावान अत्यंत विश्वासाने श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् मंत्र नियमितपणे म्हणतात. तसेच समस्या आली नाही, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही म्हणतात. या मंत्राचे अनेक अनुभवही श्रद्धावानांना प्राप्त होतात. त्यांतील काही अनुभव आपण खालील लिंक्स वर क्लिक करून पाहू शकता.
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही यापैकी काही अनुभव वाचू शकता.








