आंधप्रदेशातल्या शेषाद्री पर्वताची ओळख करून देण्याची गरज आहे? अर्थातच नाही! कारण शेषाद्री पर्वत, व्यंकटगिरी पर्वत, शेषाचलम पर्वत, तिरूमला पर्वत अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतावर असलेले व्यंकटेश मंदिर जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Glimpses of Sadguru Shree Aniruddha Bapu during Shree Venkatest Saptakoti Jap
श्री व्यंकटेश सप्तकोटी जपादरम्यान सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंची काही मनोहारी क्षणचित्रे

रामानुजाचार्यांची अद्वितीय उपासना

रामानुजाचार्यांनी ३०० वर्षांपूर्वी इथेच श्री बालाजीची उपासना केली होती. आपल्या ११ शिष्यांसह रामानुजाचार्यांनी ‌‘ॐ व्यंकटेशाय नमः‌’ या अष्टाक्षरी मंत्राचा सप्तकोटी जप करून ही उपासना पूर्णत्त्वास नेली होती. वैशाख विनायकी चतुर्थी ते वैशाख मोहिनी एकादशीच्या काळात ही अत्यंत पवित्र उपासना संपन्न झाली.

याला तीनशे वर्ष उलटल्यानंतर ७ ते १४ मे २००० या काळात पुन्हा एकदा असा योग जुळून आला. या काळात सद्गुरु अनिरुद्धांनी (बापू) श्रद्धावानांकडून ‌‘ॐ व्यंकटेशाय नमः‌’ ह्या अष्टाक्षरी मंत्राचा ‌‘श्री व्यंकटेश सप्तकोटी जप‌’ करून घेतला. मुंबईच्या वांद्रे येथे हरिगुरुग्राम, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हा अनुपम उत्सव संपन्न झाला.

‌‘रामानुजाचार्यांनी ज्या विधीवत्‌ पद्धतीने, ज्या भावाने, प्रेमाने आणि भक्तीने ही उपासना केली, त्याच्या लक्षांश का होईना, परंतु एक लहानसा अंश जरी आपण करू शकलो तरी ते खूप सुंदर असेल. रामानुजाचार्य महान होते, मी खूप लहान आहे. आपण सर्व खूप लहान असू, परंतु तरीदेखील त्यांचं अनुकरण करण्यास आपल्याला काय हरकत आहे! कारण आपण लहान आहोत, ते महान आहेत, असा विचार करायचा नाही.

मी कोणत्या रस्त्याने जाऊ? असा प्रश्न शौनकमुनींनी आपल्या गुरुंना केला होता. त्यांच्या गुरुने त्यांना उत्तर दिलं, येन मार्गेण महाजना गतः , ज्या मार्गाने श्रेष्ठ पुरुष जातात त्या मार्गाने जरुर जावे. तिथे कुठला धोका नसतो. असा हा रामानुजाचार्यांचा मार्ग आज आपल्याला चोखाळायचा आहे‌’, असे बापूंनी श्री व्यंकटेश सप्तकोटी जपाच्या आयोजनापूर्वी श्रद्धावानांना सांगितले होते.

Bhog Arpan
भोग अर्पण

सप्तचक्रांसह श्री व्यंकटेशांची मूर्ती

‘श्री व्यंकटेश सप्तकोटी जप‌’ उत्सवात श्री व्यंकटेशाची तिरुपतीमध्ये आहे तशीच हुबेहुब सात फूट उंच मूर्ती तयार करण्यात आली होती. भगवान व्यंकटेशाच्या बाजूला पद्मावतीचे स्थान होते, तर दुसऱ्या बाजूला शेषगिरी व्यंकटगिरीचे स्थान होते. व्यंकटेश मूर्तीमध्ये ‌‘सप्तचक्रांची स्थापना करण्यात आली. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंतची सात चक्रे स्थापित करण्यापूर्वी, ४९ भक्तांकडून सातही चक्रांच्या विविध मंत्रांचे पठण, तसेच अन्य सात भक्तांकडून विशिष्ट मंत्रांचे एक कोटी वेळा पठण करून ही सप्तचक्रे सिद्ध करण्यात आली होती. त्यानंतरच या चक्रांची स्थापना मूर्तीमध्ये केली गेली.

Aagaman
७ फूट उंचीची श्री व्यंकटेशांची मूर्ती

जपपूर्ती आणि अभिषेक

‘श्री व्यंकटेश सप्तकोटी जप उत्सव‌’ काळात सकाळी ८ वाजल्यापासून मंत्रपठण कक्षात नियोजनानुसार नेमून दिलेल्या जागांवर बसून श्रद्धावान जप करीत होते. या वेळी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचाही जप मिळून हा जप वृद्धींगत होत राहिला. सप्तकोटी जपासाठी ७००-७०० श्रद्धावानांच्या दोन बॅचेसमध्ये, दररोज एक बॅच आलटून पालटून एक एक तास सहा वेळा असे सात दिवस (७ ते १४ मे, २०००) श्रद्धावान ‌‘ॐ व्यंकटेशाय नमः‌’ हा जप अत्यंत प्रेमाने व भक्तीभावाने करीत होते.

तव्या दिवशी सकाळीच ७ कोटी जप पूर्ण झाला. पण तरीही सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीपर्यंत हा जप चालूच होता. जप समाप्तीनंतर १४ मे २००० रोजी त्रिसागर संगम जलाने अभिषेक करण्यात आला व श्रीव्यंकटेश सहस्त्रधारा यज्ञ संपन्न झाला. या जपकाळात पुरुष भक्तांनी तिरुपतीच्या परंपरेनुसार केलेले मुंडन, तशीच विशिष्ट वेशभूषा आणि कपाळावर अष्टगंधाने रेखांकित केलेले नाम ह्यांमुळे इथले वातावरण भक्तीभावाने ओतप्रोत भरले होते.

Two batches of 700 Shraddhavans each performed the 'Om Venkateshaya Namaha' chant with extreme love and devotion for eight days (7th May to 14th May 2000), for 12 hours daily (one batch of 6 hours).
“ॐ व्यंकटेशाय नमः” जपाचा उच्चार करणारे श्रद्धावान

‘ॐ व्यंकटेशाय नमः‌’ या जपाचे महत्त्व

प्रत्येकाला जीवनामध्ये आनंद आणि सुख हवे असते किंवा एखाद्या काळापुरते असणारे सुख निरंतर टिकवून ठेवायचे असते. परंतु असे घडण्याचा निश्चित मार्ग शोधणे सामान्य मानवाला खूपच कठीण असते. प्रत्येकाच्या आड येत असते ते त्याचे प्रारब्ध आणि त्याचेच मन. या दोन्ही शत्रुंना पराजित करणारे काही मोजकेच महामंत्र असतात. ‌‘ॐ व्यंकटेशाय नमः‌’ हा त्यांपैकीच एक महामंत्र आहे.

त्यामुळे येणारा प्रत्येक श्रद्धावान हा जप करीत आणि मनात साठवतच येथून बाहेर पडत होता.

पापमोचन कुंड व प्रायश्चित भावना

या ठिकाणी ‌‘पापमोचन कुंड‌’ही उभारण्यात आले होते. ‌‘पापमोचन कुंडाभोवती तिरुमला पर्वत व पद्मसरोवरातील मृत्तिका व जलाने बनवलेल्या पवित्र इष्टिका डोक्यावर घेऊन श्रद्धावान पापविमोचन प्रदक्षिणा घालत होते. प्रदक्षिणेच्या वेळेस ‌‘गोविंदा गोविंदा, जय व्यंकटेश गोपाला‌’ हा जप अखंड सुरू होता. ह्या इष्टिका अत्यंत पवित्र अशा तिरुमला पर्वत व पद्मसरोवर ह्या स्थानांवरील पवित्र मृत्तिका व पवित्र जलापासून बनविण्यात आल्या होत्या.

‌‘हे देवा, आजपर्यंत मी खूप चुकलो असेन, पण यापुढे माझ्या हातून कमीत कमी चुका घडोत‌’

अशी प्रार्थना श्रद्धावान प्रदक्षिणा करताना जपाच्या बरोबरीनेच करीत होते. ही प्रार्थना व जप करत श्रद्धावान कितीही वेळा प्रदक्षिणेचा लाभ घेऊ शकत होते. तसेच श्रद्धावानांना आपल्या इच्छेनुसार विशिष्ट देणगीमूल्य देऊन ‌‘तिरुपती व्यंकटेश राजोपचार अभिषेक‌’ करण्याची सोयही या ठिकाणी करण्यात आली होती.

Papmochan Kund and the feeling of repentance
पापमोचन कुंड आणि पश्चात्तापाची भावना

महापुष्पम्‌ आणि महाभोग

व्यंकटेशाच्या मूर्तीस प्रत्येक दिवशी अलंकारित ‌‘महापुष्पम्‌‍हार‌’ घालण्यात येत होते. अर्पण करण्यात आलेला महाभोगही खूप आगळा-वेगळा व भव्य होता.

  • पहिल्या व पाचव्या दिवशी १००८ फळांचा महाभोग होता.
  • दुसऱ्या व सहाव्या दिवशी १००८ लाडवांचा महाभोग होता.
  • तिसऱ्या व सातव्या दिवशी १००८ चुरमुऱ्याच्या लाडवांचा महाभोग होता.
  • चौथ्या व आठव्या दिवशी दही-भाताचा महाभोग होता.

असा महाभोग अर्पण करण्यात आला. हा प्रसाद अनाथालयांमधील विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती व गरीबांना वाटण्यात आला. हा महाभोग अर्पण करताना

‌‘रमया रमणाय व्यंकटेशाय मंगलम। सर्व लोकनिवासाय श्रीनिवासाय मंगलम्‌।‌’

हा जप पाच वेळा म्हणण्यात येत होता.

An offering of 1008 fruits was made as the Mahabhog on the first and fifth days, 1008 laddoos on the second and sixth days, 1008 puffed rice laddoos (Murmura laddoos) on the third and seventh days, and 9 quintals of curd-rice on the fourth and eighth days.
पहिल्या आणि पाचव्या दिवशी महाभोग म्हणून १००८ फळे, दुसऱ्या आणि सहाव्या दिवशी १००८ लाडू, तिसऱ्या आणि सातव्या दिवशी १००८ मुरमुरे लाडू, तर चौथ्या आणि आठव्या दिवशी दहीभात अर्पण करण्यात आला.

आरती, ‌‘ठं‌’ बीज आणि भक्तीचा परिपाक

या उत्सव काळात होणारी आरती खूपच सुंदर होती. ‘संतश्रेष्ठ पुरंदरदास’ यांची कन्नड-आरती रचना व तमिळनाडूच्या संत कवयित्री ‌‘देवी अंडाळ‌’ यांची रचना सर्व भक्त त्या भाषा येत नसतानासुद्धा प्रेमाने व भावभक्तीने म्हणत होते. दर एक तासाने आरती होत होती. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ह्या आरतीचा अर्थ श्रद्धावानांना समजावून सांगितला होता.

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या प्रवचनांतून व्यंकटेशाच्या आणि विठ्ठलाच्या कथा सांगितल्या. त्यामुळे श्रद्धावानांना या देवतांशी जोडण्यास अधिक मदत झाली.

All devotees were singing the Kannada-Aarti composition of the great saint Purandaradasa and the composition of the saint-poetess of Tamil Nadu 'Devi Andal' with love and devotion.
सर्व भक्तगण महान संत पुरंदरदास यांनी रचलेली कन्नड आरती तसेच तामिळनाडूच्या संत कवयित्री देवी आंडाळ यांनी रचलेली भक्तिगीते प्रेम आणि भक्तिभावाने गात होते.
7-foot-tall idol of Shree Venkatesh, an exact replica of Tirupati, was made during 'Shree Venkatesh Saptakoti Jap' Utsav held in the year 2000