उत्सवाची पवित्र मांडणी
मुख्य मंचावर चण्डिकाकुलाची भव्य चित्रे लावण्यात आली होती. एका बाजूला अंजना माता आपल्या कुशीत बाल महाप्राण हनुमंताला प्रेमाने धरून उभ्या होती, तर दुसऱ्या बाजूला शताक्षी माता अर्थात शाकंभरी देवीचे चित्र होते. या मांडणीमुळे संपूर्ण वातावरण भक्ती आणि कृपेने भारून गेले होते.
मुख्य मंचाकडे जाणाऱ्या मार्गावर परिक्रमा कक्ष होता. या पवित्र मार्गावर पंचवीस आराध्य देवतांचे फोटो ठेवण्यात आले होते. ह्या फोटोंचे अनावरण सद्गुरू अनिरुद्ध बापू यांनी केले होते. त्यांच्यासमोर शहाळे, गहू आणि फुलांच्या हारांचे अर्पण करण्यात आले होते.
श्रीश्वासम् उत्सवाची तीन परिक्रमांमध्ये विभागणी करण्यात आली होती—
- जोगवा परिक्रमा
- गुह्यसूक्तम् परिक्रमा
- समर्पण परिक्रमा
या परिक्रमेची सुरुवात मूलार्क गणपती, आदिमाता महिषासुरमर्दिनी, अवधूत दत्तात्रेय आणि पंचमुखी हनुमंत यांच्या पासून होती. त्यानंतर आदिमातेची वीस तेजस्वी रूपे होती. त्यामध्ये नारायणी, अंबाबाई, बाल त्रिपुरा, श्रीविद्या, रणदुर्गा, शारदांबा, भुवनेश्वरी, दण्डनाथा, तुळजाभवानी, रेणुका माता, निसर्गमालिनी, महागौरी, महासिद्धेश्वरी, मीनाक्षी, महायोगेश्वरी, अदिती (श्री – शून्यनाम् शून्यसाक्षिणी), अनसूया दुर्गा आणि सप्तशृंगी यांचा समावेश होता. यांपैकी प्रत्येक रूप हे आदिमातेच्या अनंत करुणा आणि शक्तीच्या एकेका विशिष्ट पैलूचे प्रतिनिधित्व करणारे होते.
या परिक्रमेची सांगता श्री त्रिविक्रम आणि श्री महाविष्णू यांच्या दर्शनाने होत होती. त्यांच्यासोबत पवित्र कूर्मही होता आणि त्याच्या पाठीवर श्री यंत्र कोरलेले होते.
अत्यंत मंगलमय प्रतीक मानले जाणारे श्री यंत्र आदिमातेच्या चरणकमलांवर ठेवण्यात आले होते. हे ईश्वरी कृपा आणि विश्वातील हार्मनी (सुसंवाद आणि सुसूत्रता) यांच्या समरसतेचे प्रतीक होते.
लगतच्या सभागृहांमध्ये महाप्राण पंचमुखी हनुमंत आणि अश्विनीकुमारांची प्राणप्रतिष्ठा बापूंनी केली होती. सभागृहाच्या दुसऱ्या बाजूला ‘उषा पुष्करिणी कुंड’ ठेवण्यात आले होते. जलाने भरलेल्या या कुंडात पंचधातूंपासून बनविलेल्या त्रिविक्रम लिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. याचे देखील अनावरण बापूंनी केले होते.
उत्सवाचा प्रत्येक पैलू आदिमातेने प्रस्थापित केलेल्या दिव्य क्रमाचे साक्षात् प्रतिबिंब होते —जिथे प्रत्येक प्रतिमा, प्रत्येक प्रतीक आणि प्रत्येक पवित्र मांडणी ही गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी संकेतांनी परिपूर्ण होती.
तीन पवित्र परिक्रमा
४ मे २०१५ रोजी वैशाख पौर्णिमेच्या मंगलदिनी सकाळी ८ वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली. त्या दिवसाच्या कार्यक्रमाचे तीन टप्पे होते:
- जोगवा परिक्रमा
- गुह्यसूक्तम् परिक्रमा
- समर्पण परिक्रमा
जोगवा परिक्रमा
जोगवा परिक्रमेच्या दिशेने जाण्यापूर्वी श्रद्धावानांच्या कपाळावर नाम लावण्यात आले. श्रद्धावान सभागृहात प्रवेश केल्यानंतर परिक्रमा सुरू करण्यापूर्वी त्यांना मूषकाचे चित्र असलेली एक कागद देण्यात आला. त्यावर मूषकाची तीन चित्रे काढण्यास श्रद्धावानांना सांगण्यात आले.
बापूंनी सांगितलेले मूषकाचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे :
मूषकाचे महत्त्व
मूषक हे गणपतीचे वाहन आहे आणि गणपती मूलाधार चक्राचे अधिपती आहे आणि हा मूषक ‘श्वासोच्छ्वासाचे’ प्रतीक आहे. श्वासोच्छ्वासामुळे ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा शरीराच्या इतर भागांना पुरविली जाते.
ज्याप्रमाणे मूषक आपल्या बिळात आत-बाहेर ये-जा करतो, त्याचप्रमाणे श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया घडत असते. म्हणून मूषकाचे चित्र तीन वेळा काढायचे होते. त्यातून श्वास घेणे, त्याचे अभिसरण किंवा शोषण आणि श्वास सोडणे या तीन प्रक्रिया दर्शविल्या जात होत्या.
हा कागद परिक्रमेच्या अगदी सुरुवातीला ठेवलेल्या मूलार्क गणपतीला पुढील प्रार्थनेसह अर्पण करायचा होता :
“हे घनप्राण, आमच्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवा आणि आमच्या त्रिविध देहाचे रक्षण करा!”
जोगवा परिक्रमेकरिता श्रद्धावान डाळ आणि तांदळाचे दाणे, तीन केळी आणि काही पाने आदिमातेला अर्पण करण्यासाठी घेऊन येत होते. हे अर्पण करणे पूर्णपणे श्रद्धावानांच्या इच्छेवर अवलंबून होते.
काही श्रद्धावानांना केवळ या परिक्रमेत सहभागी होता आले, हेदेखील परमभाग्य वाटत होते. परिक्रमेच्या विशिष्ट क्रमाने ठेवलेल्या आदिमातेच्या विविध रूपांचे दर्शन घेणे, हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती.
संपूर्ण परिसरात ‘जय जगदंब जय दुर्गे’, ‘ॐ नमश्चण्डिकायै’, ‘आई, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ’, ‘हे सदगुरु, तुम्ही प्रेमळ आहात आणि मी अंबज्ञ’ या जयघोषांचे स्वर घुमत होते.
श्री त्रिविक्रमाच्या दर्शनाने ही परिक्रमा पूर्ण होत होती. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर श्रद्धावानांच्या मनात एक दृढ विश्वास निर्माण होत होता—‘त्रिविक्रम हाच आपल्या जीवनाचा एकमेव आणि संपूर्ण आधार आहे!’
पुढे एका जलकुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. श्रद्धावान सुपामध्ये घेऊन आलेल्या तांदूळ आणि डाळींमधून दोन केळी आदिमातेला अर्पण करत होते.
डाळ आणि तांदळाचे दाणे अन्नपूर्णा प्रसादम् योजनेद्वारे गरजू व्यक्तींना देण्यात येत होते. तीन केळ्यांपैकी उरलेले एक केळे श्रद्धावानांना प्रसाद म्हणून देण्यात येत होते.
परिक्रमा पूर्ण केल्यानंतर श्रद्धावान मुख्य मंचावरील चण्डिकाकुलाचे आणि त्याच्या एका बाजूला ठेवलेल्या शताक्षी माता अर्थात शाकंभरी देवीचे आशीर्वाद घेत होते. दुसऱ्या बाजूला आपल्या मांडीवर बाल हनुमंताला बसवून घेतलेल्या अंजना मातेच्या प्रेमळ आणि वात्सल्यपूर्ण रूपाचे दर्शनही ते घेत होते.
शताक्षी माता (शाकंभरी देवी) यांचे महत्त्व
सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी ‘मातृवात्सल्यविन्दानम' या ग्रंथात शताक्षी मातेचे महत्त्व सांगितले आहे— शंभर वर्षांच्या दुष्काळामुळे मानवांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. ती पाहून महर्षी अगस्त्य आणि इतर महर्षींनी परांबा मातेस आर्तपणे हाक मारली आणि तिचा महिमा गायला. तेव्हा चण्डिका माता स्वतः त्यांच्यासमोर प्रकट झाली.
सर्व महर्षींनी एकसुरात आईची स्तुती केली आणि प्रार्थना केली, “हे चण्डिका माते, तुझे तेजस्वी ‘रण-रागिणी’ रूप बाजूला ठेवून पृथ्वीवरील आपल्या लेकरांना मातृकरुणेने आशीर्वाद द्या.”
ऋषींच्या या उदात्त विनंतीचा स्वीकार करून आदिमातेने शांत आणि सौम्य रूप धारण केले. आदिमातेचे हे मनोहर रूप शंभर डोळ्यांचे होते. म्हणून तिला ‘शताक्षी’ अर्थात ‘शंभर डोळे असलेली देवी’ असे नाव मिळाले. तिच्या हातात कोवळ्या पानांची फांदी, फूल, फळ, मुळे, अक्षय जलपात्र, धनुष्य, बाण आणि नांगर होते. आपल्या शंभर डोळ्यांनी शताक्षी मातेने पृथ्वीकडे करुणेने पाहिले आणि पृथ्वी पुन्हा हिरवीगार व सुपीक झाली.
त्यांची कृपा आणि महिमा पाहून अगस्त्य ऋषींनी त्यांना शाकंभरी अन्नदा आणि नीलदुर्गा ही नावे दिली. या तेजस्वी शताक्षी मातेचे छायाचित्र ‘श्री श्वासम्’ उत्सवातील मुख्य मंचावर ठेवण्यात आले होते. बापूंनी शाकंभरी मातेची प्रार्थना करून आपल्या वसुंधरेला सदैव सिंचन मिळावे, ती सुपीक व समृद्ध राहावी—सुजलाम्, सुफलाम् आणि समृद्ध राहावी—अशी प्रार्थना केली.
राष्ट्राचे आधारस्तंभ असलेले सैनिक आणि शेतकरी यांनी समृद्ध व्हावे, ही उदात्त भावना ‘श्री श्वासम्’ उत्सवामागे होती.
पहिल्या परिक्रमेची सांगता चण्डिकाकुल, शताक्षी माता आणि आपल्या मांडीवर बाल महाप्राण हनुमंताला प्रेमाने धरून असलेल्या अंजना मातेच्या दर्शनाने आणि नमनाने झाली. शक्ती, करुणा आणि मातृवात्सल्याचे मूर्तिमंत रूप असलेल्या या पवित्र जोगवा परिक्रमेने श्रद्धावान आणि आदिमाता यांच्यातील प्रेमाचा बंध अधिक दृढ केला.
श्रद्धावान दोन ठिकाणी उभारलेल्या झालमधून जात होते. ही झाल आदिमातेच्या आशीर्वादाचे प्रतीक होती आणि ती एका पवित्र वस्त्राच्या रूपात होती. यातील एक झाल मुख्य मंचाच्या अगोदर होती आणि दुसरी दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताना होती.
अनिरुद्ध बापूंनी आपल्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे, झाल म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून माता चण्डिकेच्या साडीचा पदरच आहे—जो प्रत्येक श्रद्धावानाला आपल्या आश्रयाखाली घेतो.

गुह्यसूक्तम् परिक्रमा - विश्वाचे Healing Code ऐकणे
मुख्य मंचाच्या डाव्या बाजूच्या सभागृहात पंचमुखी हनुमंत आणि अश्विनीकुमारांच्या मूर्ती होत्या. येथे श्रद्धावानांना पवित्र जलाने भरलेल्या छोट्या कलशासह परिक्रमा करायची होती. हे पवित्र जल तापी, इंद्रायणी आणि पांजरा या नद्यांमधून आणण्यात आले होते.
श्रद्धावान जलाने भरलेला गडू डाव्या हाताच्या तळव्यावर घेऊन उजव्या हाताच्या तळव्याने गडूचे मुख झाकून, गुह्यसूक्तम् ऐकत ऐकत ही परिक्रमा करत होते. या उत्सवाचे हे प्रमुख आकर्षण होते.
आज आपण पाहतो की, माणसाची अवस्था केवळ शारीरिक स्तरावरच नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक स्तरावरही खालावत चालली आहे. जीवनातील नाती, नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक जीवन, शिक्षण, आर्थिक परिस्थिती इत्यादी अनेक स्तरांवर ‘Healing’ अर्थात निरोगीकरणाची तीव्र गरज जाणवते. प्रत्येक व्यक्ती, समाज, देश आणि संपूर्ण जगासाठी हे निरोगीकरण आवश्यक आणि अपरिहार्य आहे. सदगुरु बापूंना याची गरजेची तीव्रता जाणवली आणि त्यांनी त्यासाठी मोठी आई – आदिमाता चण्डिका यांच्याकडे उपायासाठी आर्त प्रार्थना केली.
त्यांच्या या प्रार्थनेचे उत्तर म्हणजे ‘वैश्विक निरोगीकरणम् गुह्यसूक्तम्’! अर्थात ‘The Universal Healing Code – Guhyasuktam’.
ज्याप्रमाणे आईच्या गर्भातील बाळ केवळ ऐकत असते आणि आईचा श्वास त्याच्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत असतो, त्याचप्रमाणे श्रद्धावानांनीही गुह्यसूक्तम् एकाग्रतेने ऐकायचे आहे.
श्रद्धावान जेव्हा Healing Code ऐकून नैसर्गिकपणे श्वास सोडतात, तेव्हा ते आपले सर्व आजार, दोष आणि अनिष्ट गोष्टी श्वासातून बाहेर सोडतात. आदिमाता ते सर्व स्वतःमध्ये सामावून घेते, श्वास घेते आणि त्याऐवजी निरोगीकरणाची शक्ती उच्छ्वासातून बाहेर सोडते; श्रद्धावान ती निरोगीकरण शक्ती श्वासाने ग्रहण करतात.
बापूंनी दिलेली ही भेट गुह्यसूक्तम् प्राप्त करून श्रद्धावानांनी समाधानाची सर्वोच्च अनुभूती घेतली. हे गुह्यसूक्तम् म्हणजे ‘विश्वाचे Healing Code’ आहे. ते ऐकताना त्यातील प्रेमळ शब्द आणि लय श्रद्धावानांना दिव्य सुसंवाद, सहजता, समाधान आणि तृप्ती प्रदान करत होते.
संपूर्ण विश्वाला व्यापून असलेली आदिमातेची ही निरोगीकरण शक्ती उत्सवाच्या वेळी श्रद्धावानांवर मुक्तपणे बरसत होती.
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी लिहिलेल्या मातृवात्सल्य उपनिषदातील विगताप्रमाणेच आपल्या जीवनाचा प्रवास त्रिविक्रमाकडून मार्गदर्शित होत आहे, या विश्वासाने श्रद्धावान परिक्रमा करत पुढे जात होते. श्रद्धावानांना केवळ पूर्ण श्रद्धेने ऐकायचे होते, ज्याप्रमाणे आईच्या गर्भातील बाळ आपल्या आईचा श्वास ऐकत असते.
गुह्यसूक्तम् ऐकत असताना त्यांनी नैसर्गिकपणे श्वास घेतला की आदिमाता आपल्या श्वासातून सर्व प्रकारच्या अशुभ गोष्टी प्रेमाने स्वतःमध्ये सामावून घेते आणि आपल्या उच्छ्वासातून अरुला—विश्वव्यापी निरोगीकरण शक्ती प्रदान करते.
आदिमातेने स्थापित केलेल्या या शृंखलेतून तिची कृपा भक्ताच्या सप्तचक्रांपर्यंत पोहोचते. तेथून श्री त्रिविक्रम ती शरीराच्या प्रत्येक भागात, मनात, प्राणात आणि दिव्य प्रज्ञेत प्रवाहित करतो. अशा प्रकारे पंचप्राण आणि सप्तचक्र सुसंवाद आणि सुसूत्रतेने कार्य करून आरोग्य, कल्याण आणि अंतर्गत समतोल पुन्हा प्रस्थापित होतात.
गुह्यसूक्तम् वातावरणात घुमत असताना त्यातील प्रत्येक अक्षर हे दिव्य कृपेचे स्पंदन बनत होते. संपूर्ण वातावरणातच जणू शांतता, सामर्थ्य आणि निरोगीकरण भरून राहिले होते. आदिमातेची अनंत अरुला आपल्याला प्रेमाने कवेत घेत आहे, अशी अनुभूती श्रद्धावानांना येत होती.
जीवनातील प्रत्येक परिस्थितीत गुह्यसूक्तम् ऐकण्यास सदगुरु बापूंनी श्रद्धावानांना प्रोत्साहित केले—आनंदाच्या क्षणी आनंद अधिक गहिरा करण्यासाठी, दुःखाच्या वेळी आधार मिळवण्यासाठी, प्रत्येक सकाळी मंगलमय सुरुवातीसाठी, प्रत्येक रात्री शांत झोपेसाठी आणि आजारपणातही निरोगीकरण व आरोग्यलाभासाठी.
आज गुह्यसूक्तम्च्या ध्वनिमुद्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे जगभरातील भक्तांना आदिमातेच्या निरोगीकरणाच्या कृपेची ही अमूल्य देणगी प्राप्त करता येते.
समर्पण परिक्रमा
गुह्यसूक्तम्ची प्रदक्षिणा कमीतकमी तीन वेळा केल्यानंतर श्रद्धावानांनी गडूतील पवित्र जल उषा देवी आणि त्रिविक्रम यांना अर्पण करायचे होते. यासाठी सभागृहाच्या दुसऱ्या टोकाला ‘पुष्करिणी तीर्था’जवळ ठेवलेल्या त्यांच्या मूर्तींकडे पाहत जल अर्पण करीत होते. ‘सप्तचक्र स्वामिनी महापूजन’ मोठ्या आई अर्थात माता चण्डिकेच्या छबीसमोर श्री हरिगुरुग्रामजवळील (न्यू इंग्लिश स्कुल, वांद्रे पूर्व) ‘उत्तर भारतीय संघ हॉल’ येथे उपलब्ध करून देण्यात आले होते.
हे महापूजन केल्यानंतर श्रद्धावानांना श्री हरिगुरुग्राम येथील मुख्य मंचाकडे परत यायचे होते. तेथे शताक्षी देवी अर्थात शाकंभरी देवीला फुले, भाज्या आणि फळे तसेच अंजना मातेला खण अर्पण करायचा होता. यामुळे दिव्य कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतील.
श्री श्वासम् उत्सवाचे श्रद्धावानांना झालेले आध्यात्मिक लाभ
- विश्वव्यापी निरोगीकरण शक्ती : गुह्यसूक्तम्च्या माध्यमातून प्रत्येक श्रद्धावान आदिमातेची अरुला, म्हणजेच विश्वव्यापी निरोगीकरण शक्ती प्राप्त करणारा झाला—ही केवळ आदिमाता आणि सदगुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्या अनंत कृपेतून मिळणारी अकल्पनीय कृपा होती.
- पूर्वकर्मांचे निरसन : श्री श्वासम् हे प्रतिकूल प्रारब्ध आणि पूर्वकर्मांच्या परिणामांचे रूपांतर करण्यासाठी दिव्य नियोजनाने प्राप्त झालेले साधन आहे, असा श्रद्धावानांचा दृढ विश्वास आहे.
- शाश्वत सातत्य : ज्यांची श्रद्धा आणि भक्ती अढळ राहते, त्यांच्यासाठी श्री श्वासम्ची कृपा केवळ एका जन्मापुरती मर्यादित न राहता पुढेही सुरू राहते.
- दिव्य दर्शन : कूर्माच्या पाठीवर कोरलेल्या श्री यंत्राचे दर्शन घेण्याची संधी मिळणे हीच एक विलक्षण आणि अत्यंत पवित्र कृपा होती. हे अद्वितीय आणि विशेष पवित्र रूप केवळ बापूंच्या करुणेमुळेच श्रद्धावानांना अनुभवता आले.
- द्वादशविध निरोगीकरण : बापूंनी सांगितलेल्या दुःखाच्या बारा प्रकारांवर गुह्यसूक्तम् कार्य करते आणि शरीर, मन, प्राण व दिव्य प्रज्ञा यांच्यात पुन्हा सुसंवाद प्रस्थापित करते.

अनिरुद्ध बापूंचा परम आशीर्वाद
श्री श्वासम् उत्सवाची सांगता पवित्र विश्वार्पण कलश सोहळ्याने झाली. या वेळी बापूंनी प्रत्येक श्रद्धावानाला एक अत्यंत दृढ आश्वासन दिले—
“मी माझा श्वास तुम्हाला कायमचा दिला आहे.”
हे शब्द केवळ आशीर्वाद नव्हते—ते तिच्या अढळ प्रेमाचे, संरक्षणाचे आणि सदैव सोबत राहण्याचे शाश्वत आश्वासन होते.
प्रत्येक श्रद्धावानाला शब्दांत व्यक्त न करता येणारी परिपूर्तीची अनुभूती झाली. जणू स्वयं आदिमाताच त्यांच्या हृदयात नवजीवनाचा श्वास भरत होती.













