श्री अनिरुद्ध पौर्णिमा, ज्याला सामान्यतः कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते, हा सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या जन्माचा पवित्र दिवस आहे—ज्यांच्या चरणी असंख्य भक्त प्रेमाने आपली श्रद्धा, प्रार्थना आणि कृतज्ञता अर्पण करतात. १८ नोव्हेंबर १९५६ रोजी पहाटे ४:३५ वाजता, अत्यंत पवित्र अशा ब्रह्ममुहूर्तावर, सद्गुरु श्री अनिरुद्धांचा जन्म याच मंगलमय दिवशी झाला. त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस स्वतःच दिव्य माहात्म्याने प्रकाशमान असून, युगानुयुगे जगाला प्रकाश देणाऱ्या अनेक पवित्र घटनांनी समृद्ध आहे. अशा या परमपावन दिवशी झालेला सद्गुरु श्री अनिरुद्धांचा जन्म हा भक्तांच्या हृदयात श्रद्धेने आणि प्रेमाने सदैव जपला जाणारा परममंगल क्षण आहे.

अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवासाठी श्री हरिगुरुग्राम येथे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे स्वागत

पवित्र त्रिपुरारी पौर्णिमेचा दिव्य इतिहास

हा मंगलमय पौर्णिमेचा दिवस इतिहास आणि अध्यात्माच्या प्रवाहात अनेक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पवित्र घटनांचा साक्षीदार ठरला आहे :

  • त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी परमशिवाने त्रिपुरासुराचा वध करून त्याच्या अत्याचाराचा अंत केला. अधर्मावर झालेला हा विजय ‘देव दिवाळी’ अर्थात देवांची दिवाळी म्हणूनही साजरा केला जातो.
  • याच दिवशी श्री परशुरामांनी समुद्रात बाण सोडला. त्यामुळे समुद्राचे पाणी मागे हटले आणि महाराष्ट्रातील कोकणापासून केरळमधील मलबारपर्यंतचा किनारी प्रदेश निर्माण झाला. समुद्रातून प्राप्त झालेल्या या भूमीला ‘परशुराम भूमी’ असेही संबोधले जाते.
  • कार्तिक पौर्णिमेच्याच दिवशी श्रीहनुमंतांनी आपले हृदय उघडून हृदयात विराजमान असलेल्या श्रीराम, लक्ष्मण आणि जानकीमातेच्या दिव्य अस्तित्वाचे जगाला दर्शन घडविले.
  • कार्तिक पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी श्रीविठ्ठल आणि त्यांचे भक्त पुंडलिक यांच्या भक्तीचा महिमा विशेषत्वाने उजळून निघतो. पुंडलिकाची भक्ती इतकी उत्कट होती की स्वतः श्रीकृष्ण श्रीविठ्ठलाच्या रूपात त्याला भेटण्यासाठी पंढरपूर येथे त्याच्या घरी आले
  • आणि कालांतराने, २००९ साली याच पवित्र दिवशी ‘स्वयंभगवान त्रिविक्रम’—परमेश्वराचे सर्वोच्च स्वरूप—यांचे सर्वप्रथम पूजन संपन्न झाले.

यातील प्रत्येक घटना त्रिपुरारी पौर्णिमेचे माहात्म्य अधिकच वृद्धिंगत करते. या सर्व पवित्र घटना जणू दीपज्योतीप्रमाणे सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या जन्मदिवसाचे आध्यात्मिक सौंदर्य आणि दिव्यत्व उजळून टाकतात.

मराठी महिन्यातील ‘कार्तिक’मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल अनिरुद्ध बापूंचे विवेचन

श्रद्धावानांचा उत्सव - श्री अनिरुद्ध पौर्णिमा

दरवर्षी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंशी संलग्न संस्था आणि त्यांचे श्रद्धावान भक्त एकत्र येऊन प्रेम, भक्ती आणि अपार उत्साहाने ‘श्री अनिरुद्ध पौर्णिमा’ साजरी करतात. या सोहळ्यात भक्तीचा सहज आणि अखंड प्रवाह अनुभवायला मिळतो आणि प्रत्येक श्रद्धावानाला सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या कृपाछत्राखाली असल्याची अनुभूती मिळते.

अनिरुद्ध पौर्णिमेचे महत्त्व

अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवातील अध्यात्मिक कार्यक्रम

सद्गुरु उपासना

उत्सवाची सुरुवात ‘सद्गुरु अनिरुद्ध उपासने’च्या पठणाने होते; ज्यामुळे , संपूर्ण वातावरण भक्तिमय होते आणि उपस्थित प्रत्येकाच्या मनात शांतता व श्रद्धेचा भाव जागृत होतो.

सद्गुरु अनिरुद्ध उपासनेचे पठण

सद्गुरुंचे आणि श्री कृपाचैतन्य पादुकांचे दर्शन

या उत्सवासाठी एकत्र येणारे भक्त त्या एका अनमोल क्षणाची—आपल्या लाडक्या सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या दर्शनाची—अत्यंत आतुरतेने वाट पाहतात. २०१५ पर्यंत उत्सवादरम्यान बापू आपल्या भक्तांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहत आणि भक्तांची ही प्रेमळ आस पूर्ण होत असे. मात्र २०१६ पासून आपल्या अथक कार्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये पूर्णपणे व्यग्र असल्यामुळे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू या किंवा अन्य कोणत्याही उत्सवात व्यक्तिशः उपस्थित राहिलेले नाहीत. तरीही आपल्या सद्गुरुंच्या दर्शनाची भक्तांच्या मनातील ओढ किंचितही कमी झालेली नाही; उलट दिवसेंदिवस ती अधिक तीव्र होत चालली आहे. बापू प्रत्यक्ष उपस्थित नसले, तरी श्रद्धावान मित्रांना त्यांच्या हृदयात बापूंचे अस्तित्व सदैव जाणवत राहते.

त्यांच्या दर्शनाची व सान्निध्याची आस तसेच त्यांच्या कृपेविषयीची कृतज्ञता यांमुळे असंख्य श्रद्धावानांचा या पवित्र उत्सवाकडे वर्षानुवर्षे सहज ओढा राहिला आहे. सद्गुरु बापू आपल्या भक्तांचा कधीही त्याग करीत नाहीत. त्यांच्या या आश्वासनानुसार आणि त्यांच्या पवित्र संकल्पानुसार, २०२४ पासून सर्व श्रद्धावानांसाठी श्री कृपाचैतन्य पादुकांचे दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. उत्सवादरम्यान या पवित्र पादुका मुख्य मंचासमोर ठेवण्यात येतात, ज्यामुळे प्रत्येक श्रद्धावानाला त्यांच्या दर्शनाची मंगल संधी प्राप्त होते. या पादुका केवळ सद्गुरुंचे प्रतीक नाहीत, तर त्यांचे प्रत्यक्ष अस्तित्वच आहेत. (पादुका म्हणू या कैश्या, दिसती चक्रपाणी उभे -आद्यपिपा ) श्रद्धावानांसाठी या पादुका आणि सद्गुरु श्री अनिरुद्ध हे वेगळे नाहीत; ह्या पादुका म्हणजे साक्षात सद्गुरु श्री अनिरुद्ध , त्यांचे हृदय आणि त्यांचा आत्मा! श्रीकृपाचैतन्य पादुकांचे दर्शन म्हणजे सद्गुरुंची कृपा प्रत्यक्ष प्राप्त होणे आणि त्यांच्या कृपेने कल्याण साधणे, अशी श्रद्धावानांची धारणा आहे.

या पादुकांमधून सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रेममय , करुणामय आणि प्रत्यक्ष जाणवणारे सान्निध्य सतत प्रकट होत असते आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक भक्ताला ते आपल्या कृपाछत्रात सामावून घेते, अशी श्रद्धावानांची दृढ श्रद्धा आहे. याचबरोबर, उत्सवादरम्यान मुख्य मंचाच्या शेजारी असलेल्या एका विशाल पडद्यावर बापूंच्या पूर्वीच्या उत्सवांतील अनेक पवित्र क्षण पुन्हा जिवंत होतात आणि श्रद्धावान ते क्षण प्रत्यक्ष अनुभवत असतात —श्रद्धावानांना आशीर्वाद देणारे बापू, त्यांच्याकडे त्याच अथांग प्रेमाने पाहणारे बापू... हे अत्यंत भावस्पर्शी क्षण पाहताना भक्तांना ‘हे पूर्वीचे दृश्य आहे’ असे वाटत नाही. उलट त्यांचे अंतःकरण सांगत असते—‘बापू इथेच आहेत... ते माझ्याकडे पाहत आहेत... ते आत्ताच मला आशीर्वाद देत आहेत.’ त्यांच्यासाठी पडद्यावर दिसणारी ती केवळ दृश्ये नसतात; त्यांचे सद्गुरु नेहमीप्रमाणे त्यांच्या समोर उभे असतात.

ह्या जिवंत क्षणांच्या आणि प्रत्यक्ष सान्निध्याच्या ओढीने असंख्य भक्त त्या पडद्यासमोर केवळ तो व्हिडिओ पाहण्यासाठी नव्हे, तर आपल्या सद्गुरुंचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात. बापूंची केवळ एक प्रेमळ नजर लाभावी, एवढीच त्यांची आस असते. भक्तांसाठी ती नजर म्हणजे पौर्णिमेच्या शीतल चांदण्यासारखा प्रेममय प्रकाश—जो अंतर्मनातील प्रत्येक अंधार अलगद विरघळून टाकतो. आणि म्हणूनच, मुख्य मंचावर विराजमान असलेल्या श्रीकृपाचैतन्य पादुकांच्या माध्यमातून असो किंवा विशाल पडद्यावर जिवंत होणाऱ्या त्या प्रेममय क्षणांतून असो—बापूंचे सान्निध्य त्यांच्या नावाप्रमाणेच ‘अनिरुद्ध’ आहे—असीम आणि अखंड, ज्याला कधीही अवरुद्ध करता येणार नाही असे. भक्तांसाठी, त्या मंगलमय, प्रेमळ आणि पितृवत् सान्निध्याचा स्पर्श लाभणारा प्रत्येक क्षण जणू ‘अनिरुद्ध पौर्णिमा’च बनून जातो.

Krupachaitanya Padukas embody the complete Aniruddha, infused with divine blessings and concentrated spiritual energy, representing the original stream of Chaitanya that guides, protects, and empowers the true devotee.
श्री अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवामध्ये श्रद्धावानांना दर्शनासाठी ठेवलेल्या कृपाचैतन्य पादुका

गाऱ्हाणे — अंतःकरणातून उमटणारी आर्त हाक

या पवित्र दिवशी, भक्त आपल्या सद्गुरुंच्या चरणी ‘गाऱ्हाणे’ अर्पण करतात. गाऱ्हाणे म्हणजे अंतःकरणाच्या अगदी गाभ्यातून उमटलेली आर्त साद— म्हणजेच सद्गुरुंचे आशीर्वाद, सामर्थ्य आणि प्रत्येक क्षणी त्यांचा आधार मागण्यासाठी केलेली प्रार्थना. ही भक्तांची सामूहिक आणि आर्त साद अखंडपणे गायली जाते आणि प्रत्येक भक्ताला त्यात सहभागी होऊन आपला भक्तिभाव व्यक्त करण्याची संधी मिळते.

अनिरुद्ध पौर्णिमेच्या या पवित्र प्रसंगी श्रद्धावान ‘गाऱ्हाणे’ या मनःपूर्वक भक्तिमय कृतीत सहभागी होतात—सद्गुरुंना केलेली ही एक प्रामाणिक आणि भक्तिभावपूर्ण हाक असते.

गोड ‘आप्पे’ अर्पण

सद्गुरु श्री अनिरुद्धांना गोड ‘आप्पे’ (रव्यापासून बनवलेले छोटे, गोलाकार गोड पदार्थ) आवडतात. भक्त हे आप्पे अत्यंत प्रेमाने घरी तयार करून उत्सवस्थळी घेऊन येतात. आपल्या सद्गुरुंप्रती—आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आपल्या परमप्रिय मित्राप्रती—असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भक्त हे आप्पे प्रेमपूर्वक अर्पण करतात. अर्पण केलेले सर्व आप्पे नंतर भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जातात.

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू आप्प्यांचा प्रसाद स्वीकारताना

श्रीराम–लक्ष्मण–सीता–हनुमंत यांच्या मूर्तींवर अभिषेक

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या निवासस्थानी नित्य पूजनात असलेल्या श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि श्रीहनुमंत यांच्या पवित्र मूर्ती या मंगलदिनी अत्यंत श्रद्धापूर्वक उत्सवस्थळी आणल्या जातात. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू श्रीरामांना प्रेमाने आपले ‘कर्ता गुरु’-अर्थात कार्य करणारे गुरु-मानतात. श्रद्धावानांकडून ‘रामरक्षा स्तोत्राचे’ अखंड पठण सुरू असताना या दिव्य मूर्तींवर पवित्र अभिषेक केला जातो. प्रत्येक श्रद्धावानाला या देवतांसमोर बसून सामूहिक पठणात सहभागी होता येते आणि मन तृप्त होईपर्यंत त्यांच्या दिव्य दर्शनाचा लाभ घेता येतो.

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू श्रीरामांचे पूजन करताना

सुदीप आणि उद

अनेक भक्त सद्गुरुंच्या प्रतिमेसमोर ‘सुदीप’ प्रज्वलित करतात, तर काही भक्त ‘उद’ अर्पण करतात. श्रद्धावानांच्या दृष्टीने सुदीप आणि उद ही साधी वाटणारी, परंतु प्रापंचिक जीवनातील संकटे आणि अडचणींना सामोरे जाण्यासाठी अत्यंत प्रभावी साधने आहेत. सुदीप प्रज्वलित करणे हे एक भावपूर्ण अर्पण आहे, ज्याद्वारे भक्त आपल्या प्रार्थना भगवान दत्तगुरु, आदिमाता जगदंबा आणि सद्गुरुंच्या चरणी पोहोचवतात. आपली प्रार्थना आणि मनोकामना यांनुसार श्रद्धावान विविध प्रकारचे सुदीप प्रज्वलित करतात—इच्छापूर्ती सुदीप मनोकामना पूर्ण होण्यासाठी, बाधानिवारक सुदीप अडथळे दूर होण्यासाठी, पीडानाशक सुदीप दुःख व पीडेतून मुक्ती मिळण्यासाठी, जन्मदिन सुदीप वाढदिवसानिमित्त आणि दर्शन सुदीप आपल्या लाडक्या सद्गुरुंचे मंगल दर्शन लाभावे यासाठी. सुदीपाची प्रत्येक ज्योत जणू एक मूक संदेशवाहक बनून भक्ताच्या अंतःकरणातील प्रार्थना आणि भाव आपल्या सद्गुरुंच्या चरणी पोहोचवते.

सद्गुरुंच्या प्रकाशाचा भक्तीच्या ज्योतीशी संगम — बांद्रा येथील श्रीहरिगुरुग्राम येथे अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवादरम्यान सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू सुदीप प्रज्वलित करताना.
On the auspicious day of Aniruddha Pournima Utsav, Sadguru Shree Aniruddha Bapu is performing Abhishek on the idol of Shree Ram in the Ramraksha Pathan Kaksha at Shreeharigurugram, Bandra E.

Shraddhavans perform Aarti of Sadguru Shree Aniruddha Bapu on Shree Aniruddha Pournima at Shree Harigurugram
Shraddhavans perform Aarti of Sadguru Shree Aniruddha Bapu on Shree Aniruddha Pournima at Shree Harigurugram
The poojan of the idol of Sadguru Shree Aniruddha Bapu performed at Shree Harigurugram on the occasion of Shree Aniruddha Pournima.