सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या जीवनातील अनेक पैलूंपैकी एक पैलू असा आहे, जो प्रेरणादायी तर आहेच, पण आजच्या काळाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे त्यांची शिकण्याप्रती असलेली अखंड तळमळ. सद्गुरु, आध्यात्मिक मार्गदर्शक तसेच तज्ज्ञ डॉक्टर, लेखक आणि शिक्षक म्हणून ते सर्वपरिचित असले, तरी बापूंनी स्वतःला नेहमीच सर्वप्रथम एक विद्यार्थी मानले आहे. त्यांच्या दृष्टीने शिकणे हे केवळ शाळा-कॉलेजच्या वर्गापुरते किंवा परीक्षा आणि पदवीपुरते मर्यादित नसून निरीक्षण करणे, प्रश्न विचारणे, शोध घेणे, संशोधन करणे आणि ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करणे असा आयुष्यभर सुरू राहणारा ज्ञानप्रवास आहे.

या दृष्टिकोनाचा प्रभाव केवळ त्यांच्या जीवनप्रवासावरच पडला नाही, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संस्थांच्या कार्यपद्धतीवर देखील पडला. समकालीन घडामोडी तसेच भक्ती आणि अध्यात्म यांवरील सेमिनार्सच्या माध्यमातून त्यांनी सुजाण, तर्कसंगत आणि सतत जिज्ञासू राहणाऱ्या मनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित होतो आणि शिस्तबद्ध अध्ययन व आचरण यांमुळे व्यावसायिक जीवन, वैयक्तिक विकास आणि भक्ती यांना कशा प्रकारे समृद्ध करता येते, हे दिसून येते.

आजीवन ज्ञानसाधना करणारे डॉक्टर

बापूंची शिकण्याची तळमळ त्यांच्या शैक्षणिक प्रवासात रुजलेली आहे. मुंबईतील डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांनी १९७८ मध्ये एमबीबीएस आणि १९८२ मध्ये मेडिसिनमध्ये एमडी पदवी प्राप्त केली. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी त्यांनी तेथे लेक्चरर म्हणूनही काम केले.

वैद्यकीय क्षेत्रात अद्ययावत रहाण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता असते आणि ही शिस्त बापूंनी सातत्याने जोपासली. व्यावसायिकदृष्ट्या स्वतःला प्रस्थापित केल्यानंतरही, बापूंनी विज्ञान, तंत्रज्ञान विषयक नवकल्पना, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि इतिहास अशा आपल्या क्षेत्राबाहेरील विषयांचाही अभ्यास सुरू ठेवला.

आयुष्यभर विद्यार्थी राहा

मला शाळेतील आणि महाविद्यालयातील मित्र ‘घासू’ (जो सतत अभ्यास करत राहतो अशा व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द) म्हणून चिडवत असत, हे बापू अनेकदा सांगतात. त्यांनी हे टोपणनाव अभिमानाने स्वीकारले. ते आपल्या श्रद्धावान मित्रांना नेहमी आठवण करून देतात की

‘शाळा किंवा कॉलेज संपल्यानंतर बहुतेक लोकांचा अभ्यास थांबतो. त्याऐवजी आपण आयुष्यभर विद्यार्थी राहिले पाहिजे.’

त्यांच्या मते, शिकणे म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे; त्यासाठी सतत निरीक्षण करत राहणे, समजून घेणे, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे आणि स्वतःला अधिक चांगले घडवत राहणे आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ‘आता शिकण्यासारखे काहीही उरलेले नाही’ असे वाटू लागले की त्याची नवीन ज्ञान आत्मसात करण्याची प्रक्रियाही हळूहळू थांबते.

आधुनिक सेमिनारमध्ये ‘सत्रा’ची प्राचीन परंपरा

शिकण्याला प्रोत्साहन देण्यासाठी बापूंनी वापरलेले सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण माध्यम म्हणजे सेमिनार. ते स्पष्ट करतात की ‘सेमिनार’ हा शब्द लॅटिन भाषेतील ‘Seminarium’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ रोपवाटिका किंवा अशी जागा जिथे बीजांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार केले जाते. बापू सेमिनारचा संबंध भारताच्या प्राचीन गुरुकुल परंपरेतील ‘सत्रांशी’ही जोडतात. या सत्रांमध्ये चर्चा करणे, प्रश्न विचारणे आणि सामूहिकपणे विषयाचा शोध घेणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे भाग होते.

त्यामुळे सेमिनार म्हणजे केवळ व्याख्यान नव्हे. एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून तो पद्धतशीरपणे मांडतो. त्यामुळे इतरांना गुंतागुंतीच्या संकल्पना अधिक प्रभावीपणे समजून घेता येतात आणि त्यांचा पुढे अधिक सखोल अभ्यास करता येतो. येथे सहभागी व्यक्तींनीही प्रामाणिक विद्यार्थी राहणे, विचारपूर्वक ऐकणे, प्रश्न विचारणे, माहितीची पडताळणी करणे आणि स्वतंत्रपणे शिकत राहणे आवश्यक आहे.

बौद्धिक जिज्ञासेची संस्कृती निर्माण करणे

अध्यात्माबरोबरच दैनंदिन दैनंदिन जीवनाला आकार देणाऱ्या समकालीन घडामोडींच्या अभ्यासालाही सद्गुरु बापूंनी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक असलेला व्यक्ती हा झपाट्याने बदलणाऱ्या जगाची जाण असलेला एक सुजाण नागरिकही असला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सेमिनार्समध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, दळणवळण आणि सोशल मिडीयापासून अर्थशास्त्र आणि जागतिक राजकारणापर्यंतच्या विविध विषयांचा समावेश झाला आहे. यामागचा उद्देश विखुरलेल्या माहितीचा संग्रह करणे हा नसून, बौद्धिक, वैयक्तिक आणि आध्यात्मिक विकासाला पूरक ठरेल असा समतोल दृष्टिकोन विकसित करणे हा आहे.

दूरदृष्टीने आयोजित केलेले मेगा सेमिनार्स

सद्गुरु बापूंच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या असंख्य सेमिनार्सपैकी २०१२ आणि २०१३ मध्ये त्यांनी स्वतः घेतलेले दोन विस्तृत सेमिनार्स विशेष उल्लेखनीय आहेत. ते म्हणजे ‘स्ट्रॅटेजीज ऑफ द न्यू एरा’ (Strategies of the New Era) आणि ‘हाऊ द वर्ल्ड इज गोइंग टू बी’ (How the World Is Going to Be).

‘स्ट्रॅटेजीज ऑफ द न्यू एरा’ (Strategies of the New Era)

२०१२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉन सेमिनारमध्ये दोन दिवसांत जवळपास अठ्ठावीस तासांची सत्रे झाली. बापूंनी ‘Jugaad’, Emotional Intelligence, Attention Economy, 3D Printing, Cloud Computing, Personal Cloud, Blogosphere, NPTEL आणि Digital Education, Open-Source Software तसेच HAM Radio यांसारख्या संकल्पना आणि तंत्रज्ञानांची माहिती दिली. यांपैकी अनेक विषय त्या काळी दैनंदिन चर्चेचा भागही झालेले नव्हते. अशा वेळी या सेमिनारच्या माध्यमातून सहभागी व्यक्तींना या विषयांचे भविष्यातील दीर्घकालीन महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.

हाऊ द वर्ल्ड इज गोइंग टू बी' (How the World Is Going to Be)

२०१३ मधील या सेमिनारमध्ये बापूंनी कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence), होलोग्राफी (Holography), नॅनोटेक्नोलॉजी (Nanotechnology) आणि रोबोटिक्स (Robotics) यांसह अन्य उदयोन्मुख क्षेत्रांची ओळख सहभागी व्यक्तींना करून दिली. त्यानंतर या तंत्रज्ञानांना मिळालेले महत्त्व पाहता, भविष्यात प्रभाव टाकणाऱ्या घडामोडींकडे बापूंचे किती बारकाईने लक्ष असते, हे जाणवते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, अशा बदलांकडे भीतीने न पाहता जिज्ञासेने आणि पूर्वतयारीच्या भावनेने पाहण्यास त्यांनी सहभागी व्यक्तींना प्रोत्साहित केले.

स्वतःच्या आचरणातून शिकवणे

उपदेश करण्यापूर्वी स्वतः आचरणात आणणे आणि इतरांना मार्गदर्शन करण्यापूर्वी स्वतःच्या कृतीतून उदाहरण घालून देणे, यावर सद्गुरु बापूंचा विश्वास आहे. एखाद्या विषयावर बोलण्यापूर्वी ते त्याचा सखोल अभ्यास करतात आणि त्या विषयाचे सर्वंकष आकलन करून घेतात. एखाद्या विषयाची सखोल जाण प्राप्त झाल्यानंतर ते त्यांच्या संस्थांमधील स्वयंसेवकांना आणि कार्यकर्त्यांना त्या विषयाचा, विशेषतः त्याच्या व्यावहारिक उपयोगाच्या दृष्टीने अधिक अभ्यास करण्यास प्रेरित करतात.

त्यांच्या कार्यालयात अनेकदा होणारे प्रेसेंटेशन्स (Presentations) परस्परांच्या सहकार्याने शिकण्याचा अनुभव देतात. बापू चर्चेत सहभागी होतात, आपले विचार मांडतात आणि काही चुकीचे आढळल्यास ते सौम्यपणे दुरुस्त करतात. या प्रक्रियेत सहभागी व्यक्तींना माहिती शोधणे, संशोधन करणे आणि तिचे विश्लेषण करून पडताळणी करणे शिकता येते; त्याचबरोबर आपल्या निष्कर्षांचे सादरीकरण करण्याने त्या व्यक्तींचा आत्मविश्वासही वाढतो.

डॉ. निकोला टेस्ला ते क्लाउड-बेस्ड रिमोट ऑफिस (Cloud-Based Remote Office)

या अध्ययनसंस्कृतीची व्याप्ती वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या सेमिनार्समधून दिसून येते. जवळपास बारा तास चाललेल्या एका सेमिनारमध्ये संशोधक डॉ. निकोला टेस्ला (Dr. Nikola Tesla) यांच्या जीवनाचा, संघर्षांचा, शोधांचा तसेच त्यांच्या या शोधांचा दीर्घकाळ टिकून राहिलेल्या प्रभावाचाही सखोल अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये Alternating Current (AC) Electricity मधील त्यांचे योगदान आणि वायरलेस कम्युनिकेशनच्या (Wireless Communication) च्या प्रारंभिक संकल्पनेमधील विकासात डॉ. टेस्ला यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही समावेश होता.

नोव्हेंबर २०१९ मध्ये बापूंनी ‘Cloud-based Remote Office’ आणि ’प्रॉडक्टिव्हिटी टूल्स’ (Productivity Tools) यांवर एक विस्तृत सेमिनार आयोजित केला. त्यानंतर काही महिन्यांतच कोविड-19 (COVID-19) महामारीमुळे जगभरातील बहुतांशी ऑफिसांमध्ये ऑनलाइन पद्धतीने घरूनच (Work from Home) काम करणे गरजेचे झाले. यापूर्वी सेमीनारमधून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे स्वयंसेवकांना संस्थेचे कामकाज डिजिटल प्लॅटफॉर्मवर वर हलविणे, पेपरलेस (Paperless) कामकाजाला ला पाठबळ देणे आणि दूरस्थपणे व्हिडीओ कॉन्फरंसिंगसारख्या माध्यमातून एकत्रितपणे काम करणे शक्य झाले. प्रत्यक्ष भेटीगाठींवर निर्बंध असलेल्या या काळात अशा प्रकारच्या संपर्कांमुळे एकोपा आणि कामकाजातील सातत्य टिकवून ठेवण्यासही मदत झाली.

इतर काही सेमिनार्समध्ये इंटरअॅक्टिव्ह मीडिया प्लॅटफॉर्म्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, डिजिटल डॅशबोर्ड्स (Interactive Media Platforms, Social Media Platforms, Digital Dashboards) आदी विषयांचाही समावेश होता. आपल्या जीवनावर प्रभाव टाकणार्‍या घडामोडींविषयी अद्ययावत रहाणे व त्यांची माहिती असणे यांची गरज अशा विषयांतून अधोरेखित झाली.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) च्या युगात प्रवेश

जसे Artificial Intelligence, शिक्षण, संवाद आणि दैनंदिन जीवनात बदल घडवून आणू लागले तसे सद्गुरु बापूंनी पुन्हा एकदा त्याचे केवळ निरीक्षण करण्याऐवजी, दैनंदिन दिनचर्या आणि कामांमध्ये AI चा पद्धतशीरपणे वापर करण्याचा आग्रह धरला. २०२५ पासून त्यांनी Artificial Intelligence, जनरेटिव्ह एआय टूल्स (Generative AI Tools), उदयोन्मुख तंत्रज्ञान (Emerging Technologies), क्यूआर कोड (QR Codes) आणि त्यांच्या व्यावहारिक उपयोगांवर सेमिनार्स सुरू केले. नवीन साधनांची केवळ ओळख करून घेण्यावर त्यांचा भर नसून, ती कशा प्रकारे कार्य करतात, त्यांच्या शक्यता आणि मर्यादा ओळखणे आणि त्यांचा विचारपूर्वक, जबाबदारीने व प्रभावीपणे उपयोग कसा करावा, हे समजून घेणे यावर बापूंचा भर आहे.

ज्ञानाचा उपयोग मानवकल्याणासाठी झाला पाहिजे

आपल्या सर्व सेमिनार्समध्ये सद्गुरु बापू हे स्पष्ट करतात की ज्ञान जेव्हा मानवतच्या सेवेसाठी उपयोगी पडते तेव्हाच त्या ज्ञानाला खरे मूल्य प्राप्त होते. जबाबदारीची जाणीव नसलेली माहिती धोकादायक ठरू शकते, तर नैतिक मूल्यांचा आधार नसलेल्या तंत्रज्ञानामुळे विद्यमान समस्या सोडवण्याऐवजी नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या लेखनातून आणि प्रवचनांतून विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांना पूरक असल्याचे मांडले जाते. तर्कशुद्ध विचार अंधश्रद्धा दूर करण्यास आणि आकलन व्यापक करण्यास मदत करतात, तर आध्यात्मिक मूल्यं समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा जबाबदारीने आणि करुणेने उपयोग करण्यास मार्गदर्शन करतात.

प्रेरणा देणारे शब्द

सद्गुरु बापू नेहमी सांगत असलेल्या दोन उक्तींमधून बापूंची सातत्याने प्रोत्साहित केलेल्या शिकण्याच्या दृष्टिकोनाची सुस्पष्ट झलक मिळते. तंत्रज्ञान क्षेत्रातील द्रष्टे स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांचे

'स्टे हंग्री, स्टे फूलिश' (Stay Hungry, Stay Foolish)

हे वाक्य बापू ’शिकण्याची दुर्दम्य इच्छा आणि पारंपरिक चौकटीबाहेरील कल्पनांचा प्रयोग करण्याचे धाडस’ टिकवून ठेवण्याचे आवाहन करते. तसेच, कृषीशास्त्रज्ञ आणि संशोधक जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (George Washington Carver) यांचे

‘Start where you are, with what you have; make something of it and never be satisfied.’

('तुम्ही जेथे आहात तेथून सुरुवात करा, तुमच्याकडे जे आहे त्यातून काहीतरी घडवा आणि कधीही समाधानी राहू नका)

हे वाक्यही बापू उद्धृत करतात. या दोन्ही वाक्यांमध्ये सातत्याने स्वतःमध्ये सुधारणा करण्याची भावना दिसून येते.

खरे तर, हा दृष्टिकोन केवळ औपचारिक सेमिनार्सपुरता मर्यादित नाही. तर बापूंची प्रवचनही अनेकदा अध्ययनाचा एक प्रकार बनतात. केवळ ऐकण्याऐवजी विचार करणे, विश्लेषण करणे आणि समजून घेणे यासाठी ती श्रोत्यांना प्रेरित करतात.

अध्ययनाचा वारसा

सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी सुरू केलेले सेमिनार्स केवळ ज्ञानाची देवाणघेवाण करण्यापेक्षा कितीतरी पुढे जाणारे आहेत. ते अशा जीवनपद्धतीला प्रोत्साहन देतात, ज्यामध्ये शिकणे कधीही थांबत नाही. सतत शिकत राहिल्यामुळे आपले मन सक्रिय राहते, आपले आकलन व्यापक होते आणि आपल्या आजूबाजूला घडणारे बदल समजून घेण्यासाठी आपण अधिक सक्षम होतो. मात्र, त्याच वेळी ज्ञानाचा हा शोध भक्तीमध्ये दृढपणे रुजलेला असला पाहिजे. सद्गुरु बापूंच्या दृष्टीने भक्ती आणि ज्ञान ही मानवाकडे असलेली सर्वांत मोठी संपत्ती आहे - अशी संपत्ती जी कोणीही चोरू शकत नाही.