’आदिमाता चण्डिकेची संपूर्ण विश्वाला व्यापणारी स्तंभनशक्ति म्हणजेच शिवगंगागौरी. गंगा आणि पार्वती एकत्र व एकरूप म्हणजेच चण्डिकापुत्र किरातरुद्राची सहधर्मचारिणी शिवगंगागौरी.’.

या शिवगंगागौरीमुळेच वैश्विक नियमांचे पालन नीट होत राहते.

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवात जान्हवीस्थानम्‌ येथे गंगा सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर माता शिवगंगागौरीचे पूजन केले व नंतर तिचे दर्शन सगळ्या श्रद्धावानांसाठी खुले केले. शिवगंगागौरी मातेची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०११ साली झाली. त्यानंतर सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पाने ह्या शिवगंगागौरी मातेची पुनर्स्थापना श्रीअतुलित बलधाम, रत्नागिरी येथे मंगळवार, दिनांक २५ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.

श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवात माता शिवगंगागौरींचे पूजन करताना सद्गुरु अनिरुद्ध बापू

माता शिवगंगागौरींचे दिव्य स्वरूप

माता शिवगंगागौरी पद्मासनात बसलेली आहे. मगर हे तिचं वाहन आहे. माता शिवगंगागौरीला ’रुद्रगंगा’ही म्हणतात. माता शिवगंगागौरी ही ’त्रिनेत्रा’ आहे आणि तिचा हा तिसरा डोळा म्हणजेच न्यग्रोधभूम अरण्य. शिवगंगागौरी मातेच्या मागे एक ’गंगाध्वज’ ठेवलेला आहे. त्यावर मगरीचे चिह्न आहे. सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी प्रसन्नोत्सवात या ध्वजाची स्थापना केली. शिवगंगागौरी मातेकडे हरिद्रेने भरलेला ’मंगल कलश’ आहे आणि तिचे शस्त्र गदा आहे.

मातेची सात रूपे

माता शिवगंगागौरीने आतापर्यंत विश्वरक्षणासाठी सात वेळा अवतार धारण केले आहेत व त्या प्रत्येक वेळी भगवान किरातरुद्रही तिच्यासह आलेला आहे. या अवतारांमधील सातवा अवतार म्हणजे मातेश्वरी अर्थात् माता रेणुका आणि श्रीतपोभैरव अर्थात् जमदग्नि.

भगवान किरातरुद्र व शिवगंगागौरी परशुरामाचे पिता व माता बनून अवतीर्ण झाले. किरातरुद्र जमदग्नि ऋषिच्या स्वरूपात धर्माचे व तपाचे मूर्तिमंत स्वरूप होता आणि माता शिवगंगागौरी जे जे काही अशुभ आणि हानिकारक आहे त्याला अटकाव करणारी आणि अवरोध करणारी शक्ती माता रेणुकेच्या स्वरूपात धार्मिक आचरण, अढळ पतिव्रत्य आणि पराक्रमाची स्त्रोत होती. भगवान परशुराम हा त्यांचा दैवी पुत्र. आदिमातेच्या अत्रिस्वरूपाकडील पवित्र अग्नि जमदग्निंमध्ये पवित्र क्रोध म्हणून प्रकटला तर आदिमातेच्या अनसूयास्वरूपातील धर्माचरण रेणुकेकडे पातिव्रत्य व पराक्रमाचे परम ज्ञान म्हणून अवतरले, ज्याची परिणती पुढे भगवान परशुरामांच्या रूपाने पूर्णत्वास आली.

Sadguru Aniruddha Bapu made the Rudragauri Haridra available for all Shraddhavans at Shree Aniruddha Gurukshetram
सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथे सर्व श्रद्धावानांसाठी रुद्रगौरी हरिद्रा उपलब्ध करून दिली.

पवित्र हरिद्रा

शिवगंगागौरी गदास्तोत्रामध्ये माता शिवगंगागौरीचे प्रेमाने ’हरिद्रास्थिता’ म्हणजेच पवित्र हरिद्रेमध्ये वास करणारी, हरिद्रेमध्ये स्थित असणारी, असे वर्णन केले आहे.

जगदम्ब त्वं ब्रह्मास्त्रविद्या । हरिद्रास्थिता पीतवर्णा त्रिनेत्रा ।

या सखोल विशेषणातून हे स्पष्ट होते की हरिद्रा ही केवळ एक औषधी वनस्पती नाही, तर माता शिवगंगागौरीची स्तंभनशक्ती म्हणजेच तिची रक्षण करणारी आणि मंगलमय शक्ती प्रकट करणारे एक पवित्र माध्यम आहे.

भारतीय परंपरेमध्ये अनादि काळापासून हळदीला पावित्र्य, मंगलता, आरोग्य आणि संरक्षण यांचे प्रतीक मानले गेले आहे. आधुनिक विज्ञानानेही हळदीचे जंतुनाशक (antiseptic), सूजविरोधी anti-inflammatory, antioxidant आणि शरीराची पुनर्बांधणी करणारे असे उल्लेखनीय औषधी गुणधर्म मान्य केले आहेत. सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी सांगितल्याप्रमाणे, या हळदीमधील लाभदायक गुणधर्म हे केवळ तिचे भौतिक गुणधर्म नाहीत, तर पवित्र हरिद्रेमध्ये प्रेमाने वास करणार्‍या माता शिवगंगागौरीच्या दिव्य कृपेचे ते स्वरूप आहे. त्यामुळे हरिद्रा ही केवळ एक औषधी वस्तू न राहता, आदिमातेच्या कल्याणकारी उपस्थितीचे जिवंत स्वरूप बनते आणि तिची आरोग्यदायी, रक्षण करणारी व मंगलमय स्पंदने तिच्या लेकरांच्या जीवनात प्रवाहित करते.

Sadguru Aniruddha Bapu made the Rudragauri Haridra available for all Shraddhavans at Shree Aniruddha Gurukshetram
सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथे सर्व श्रद्धावानांसाठी रुद्रगौरी हरिद्रा उपलब्ध करून दिली.

अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथील श्रीरुद्रगौरी हरिद्रा

अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे श्रीचण्डिकाकुलाच्या फोटोजवळ सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या संकल्पानुसार पवित्र हरिद्रेने भरलेला एक कुंभ ठेवलेला आहे. रेणुका मातेच्या सती जाण्याच्या वेळी तिच्या अंगावर जी हळद (हरिद्रा) होती, तिचे प्रतीक म्हणजे ही रुद्रगौरीहरिद्रा आहे आणि म्हणून श्रद्धावानांकरीता तेवढीच पवित्र आहे. मंगळवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०१२ या दिवशी आपल्या सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी माता रेणुकेला भावपूर्ण वंदन केले आणि ही हरिद्रा, म्हणजे रेणुकामातेची शेवटची खूण आणि तिची प्रेमळ आठवण म्हणून सर्व श्रद्धावानांसाठी कायमची उपलब्ध करून दिली. त्यावेळी बापूंनी या मंगल कलशाला घट्ट मिठी मारलेली होती आणि बापूंचा कंठ दाटून आला होता.

अशी कृपा जी तुम्ही अनुभवू शकता, असा विश्वास जो तुम्ही ठेवू शकता. जेव्हा सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी सगळ्यांसाठीही पवित्र रद्रगौरी हरिद्रा खुली केली….तेव्हा ती फक्त हळद नव्हती- ती एका मातेची तिच्या लेकरांवर वाहणारी शाश्वत कृपा होती. श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथील तो एक शुद्ध प्रेम, श्रद्धा आणि शरणागतीचा अनुपम क्षण होता.

मंगलकार्यातील पवित्र हरिद्रा

अशी ही दिव्य हरिद्रा श्रद्धावान मंगलकार्यात, समारंभात विशेषत: लग्नकार्यात वापरू शकतात. लग्नाच्या आधी वधू-वरांना जी हळद लावली जाते तेव्हा त्या हळदीमध्ये ही ’पवित्र हरिद्रा’ अगदी थोडीशी मिसळायची आणि हळद लावताना पुढील पारंपारिक ओवी म्हटली जाते. आपण ही ओवी जेव्हा वधू-वरांना हळद लावायच्या वेळी म्हणतो तेव्हा माता शिवगंगागौरीची कृपा व आशीर्वाद लाभतो, हा श्रद्धावानांचा विश्वास आहे.

"माय माझी रेणुका रेणुका रेणुका आई

माय माझी राहते राहते माहूर गडावरी

हळद लावाया सत्वर आली धावूनी

माय माझी रेणुका रेणुका रेणुका आई"

तसेच कुठल्याही पूजनात ही हरिद्रा वापरली असता पूजकाकडून अनवधानाने होणार्‍या चुका आणि पूजेत राहिलेल्या त्रुटी यांची आपोआप काळजी घेतली जाते.

तर अशी ही हरिद्रा चंडिकाकुलाकडून येणारी शुभ, पवित्र आणि मंगल स्पंदनं श्रद्धावानांच्या जीवनात प्रवाहित करते आणि अशुभ, अपवित्र, अमंगल शक्तींपासून श्रद्धावानांचे रक्षण करते. ही हरिद्रा आपण उदीप्रमाणेच आपल्या कपाळावर रोज लावू शकतो भक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून श्रद्धावानांचा विश्वास आहे की, जेव्हा उदी किंवा ही हरिद्रा धारण केल्यावर कुठलीही वाईट शक्ती त्यांना त्रास देऊ शकत नाही.

ॐ त्र्यंबकायै च विद्महे । अरिष्टस्तंभनकारिण्यै च धीमहि । तन्नो शिवगंगागौरी प्रचोदयात्‌ ॥

शिवगंगागौरी गायत्री मंत्र

पवित्र हरिद्रा श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, माता रेणुकेच्या आशीर्वादस्वरूपात ती विनामूल्य उपलब्ध आहे.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथून रुद्रगौरी हरिद्रा घेताना श्रद्धावान
Shivganga gauri and Kiratrudra at Shree Aniruddha Gurukshetram
Shivganga gauri and Kiratrudra at Shree Aniruddha Gurukshetram
Shraddhavans taking Haridra prasad after the darshan at Shree Aniruddha Gurukshetram

Shivaganga Gauri Haridra at Shree Aniruddha Gurukshetram
Shivaganga Gauri Haridra at Shree Aniruddha Gurukshetram
Shivaganga Gauri Haridra at Shree Aniruddha Gurukshetram
Shivaganga Gauri Haridra at Shree Aniruddha Gurukshetram
Sadguru Aniruddha Bapu taking darshan of Mahadurgeshwar at Shree Aniruddha Gurukshetram
Sadguru Aniruddha Bapu taking darshan of Mahadurgeshwar at Shree Aniruddha Gurukshetram
Sadguru Aniruddha Bapu at Shree Aniruddha Gurukshetram taking darshan of Adimata Mahishasurmardini
Sadguru Aniruddha Bapu at Shree Aniruddha Gurukshetram taking darshan of Adimata Mahishasurmardini
Sadguru Aniruddha Bapu at Shree Aniruddha Gurukshetram Shivganga Gauri Haridra kalash
Sadguru Aniruddha Bapu at Shree Aniruddha Gurukshetram Shivganga Gauri Haridra kalash
Sadguru Aniruddha Bapu at Shree Aniruddha Gurukshetram doing poojan
Sadguru Aniruddha Bapu at Shree Aniruddha Gurukshetram doing poojan
Sadguru Aniruddha Bapu at Shree Aniruddha Gurukshetram doing mantra jaap
Sadguru Aniruddha Bapu at Shree Aniruddha Gurukshetram doing mantra jaap
Sadguru Aniruddha Bapu lovingly embraces the sacred Haridra Kalash
Sadguru Aniruddha Bapu lovingly embraces the sacred Haridra Kalash
Sadguru Aniruddha Bapu in a serene of devotion with the sacred Haridra Kalash
Sadguru Aniruddha Bapu in a serene of devotion with the sacred Haridra Kalash