भौगोलिकदृष्ट्या चंद्रभागा नदी भले महाराष्ट्रातील काही ठराविक प्रदेशातून वाहत असेल, पण ‘विठ्ठलभक्ती’रूपी चंद्रभागा मात्र केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, विठ्ठलभक्तीचा हा नाद देशविदेशात दुमदुमत असतो. केवळ विठ्ठलनामाचा उच्चार होताक्षणीच त्याच्या प्रेमाने भक्ताचे अंग शहारून जाते आणि एक वेगळेच चैतन्य त्याच्या अंगात संचारते. ‘विठ्ठल, विठ्ठल…’, ‘ग्यानबा तुकाराम...’ असे गजर करीत, विठ्ठलभेटीच्या आर्त ओढीने, तापलेल्या रस्त्याने नाचत-गात दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या वारीला जाणार्‍या वारकर्‍यांनी या विठ्ठलनामाची ही चंद्रभागा दूरवर पोहोचविली. ‘जेव्हा नव्हत्या गंगा-गोदा, तेव्हा होती चंद्रभागा’, ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी’, असे संत-वारकरी अत्यंत दृढ आत्मविश्वासाने सांगतात.

पवित्र यात्रेचा शुभारंभ

पंढरीनाथ, विठ्ठल, विठू, पांडुरंग अशा असंख्य नावांनी ज्या लाडक्या दैवताला श्रद्धावान हाक मारतात, त्या विठ्ठलाचे निवासस्थान असलेल्या ‘श्रीक्षेत्र पंढरपूर’ येथे भावयात्रेचे आयोजन सद्गुरु श्री अनिरुद्धांनी (बापू) २००१ साली केले होते.

अगोदरच्या वर्षांमध्ये आयोजित केलेल्या शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा-गोवा या चार रसयात्रांनंतर सद्गुरु श्री अनिरुद्धांनी या भावयात्रेची घोषणा केली. ही घोषणा होताच उपस्थित श्रद्धावानांच्या मनात एकच उत्साह संचारला. कधी एकदा भावयात्रा सुरू होते अशी ओढ प्रत्येकाला लागली.

‘(षोडश (१६) ऐश्वर्यांपैकी) ‘भक्ती’ हे सोळावे ऐश्वर्य आम्हाला पंढरपूरमध्ये विठ्ठलासह मिळते. संतांना पंढरपूर ‘माहेरघर’ वाटते आणि ते चंद्रभागेला ‘बहीण’ आणि श्रेष्ठ भक्त पुंडलिकाला ‘भाऊ’ मानतात. हे सोळावे ऐश्वर्य, हे माहेरघर प्राप्त करण्यासाठीच भक्ताची पावले पंढरीची वाट चालत राहतात’, असे पंढरपूरच्या भावयात्रेचे आध्यात्मिक महत्त्व सांगताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध म्हणाले होते.

Aavahanam Na Jaanami
पंढरपूर भावयात्रेत अनिरुद्ध बापू

पंढरपूर भावयात्रा — पहिला दिवस (५ मे २००१)

दिनांक ५ मे २००१ रोजी संध्याकाळपर्यंत, विविध ठिकाणांहून आलेले सर्व श्रद्धावान, मनात प्रचंड उत्सुकता बाळगून पंढरपूरच्या पवित्र श्रीक्षेत्री पोहोचले. रात्री १० वाजता, ते ज्याची अधीरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला. सर्वांच्या लाडक्या सद्गुरु बापूंचे आगमन झाले. सद्गुरुंना पाहताक्षणीच श्रद्धावानांमध्ये अवर्णनीय आनंदाची लहर उसळली. सद्गुरुंच्या पंढरपूरमधील प्रथम दर्शनाने, इतक्या वेळेच्या प्रतीक्षेचे सार्थक झाले, अशीच सर्व श्रद्धावानांची भावना होती.

दुसरा दिवस (६ मे २००१)

भावयात्रेचा दुसरा दिवस उजाडला. सर्व श्रद्धावान सकाळी उत्सवस्थळी मंडपात जमा झाले. आज सर्वप्रथम सद्गुरु श्रीअनिरुद्ध मार्गदर्शन करणार होते. त्यामुळे ‘आज सद्गुरु काय सांगणार’ ह्या विचाराने श्रद्धावानांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती.

सद्गुरु बापूंनी बोलायला सुरुवात केली - ‘‘पांडुरंग म्हणजे महाविष्णुच, जो अंधःकार व प्रकाश या दोन्हींवर समानपणे नियंत्रण ठेवतो! ‘पांडु-रंग’ म्हणजे पांढर्‍या (गौर) वर्णाचा; पण संतांच्या रचना पाहिल्या, तर ते ह्याला ‘सावळ्या’, ‘काळ्या’ अशी हाक मारताना दिसतात. म्हणजेच एकाच वेळेस तो सावळा, काळा पण आहे आणि गोरा पण आहे. अशा ह्या पांडुरंगाबद्दल ‘तो माझा आहे आणि मला त्याचं व्हायचंय’ ही भावना मनात पाहिजे.’’

बापूंनी केलेल्या ह्या मार्गदर्शनानंतर विठ्ठलाच्या प्रेमभावात रंगलेले श्रद्धावान पुढील उपासनेसाठी सज्ज झाले. यानंतर श्रद्धावानांना ओली माती आणि अर्चनद्रव्ये देण्यात आली. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘हरि ॐ’ म्हणून सुरुवात करायला सांगितल्यापासून ते त्यांनी पुन्हा ‘हरि ॐ’ म्हणेपर्यंतच्या अवधीत श्रद्धावानांना त्या मातीपासून शंख, चक्र, गदा आणि पद्म ही महाविष्णूची दिव्य आयुधे तयार करायची होती. मुखाने मनःपूर्वक ‘श्री हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल’ हा गजर करत सर्वांनी ती आयुधे बनविली. ह्या गजराने भक्तिमय झालेल्या वातावरणात, ह्या मातीपासून आयुधे बनवण्याची कृतीतून छान उपासनाही घडत होती.

त्यानंतर ‘पांडुरंग गायत्री मंत्रा’चा १०८ वेळा जप सुरू असताना, दिले गेलेले अर्चनद्रव्य श्रद्धावानांनी त्या आयुधांवर अर्पण केले:

ॐ पद्मनाभाय विद्महे । पांडुरंगाय धीमहि । तन्नो हरिः प्रचोदयात्॥

Om Padmanaabhaaya Vidmahey, Paandurangaaya Dheemahi, Tanno Harih Prachodayaat.

महाविष्णूच्या आयुधांचे हे अनोखे पूजन बापूंनी श्रद्धावानांकडून करून घेतल्यावर सायंकाळी, श्रद्धावानांच्या मनात प्रचंड उत्सुकता असलेल्या ‘श्री पंढरीनाथ पद्मराग रथयात्रे’ची सुरुवात झाली. ही रथयात्रा खरं तर दुपारीच सुरू होणार होती. परंतु रणरणत्या दुपारच्या उन्हात तापलेल्या रस्त्यांवर श्रद्धावानांचे पाय पोळतील, याची परमपूज्य बापूंना आपुलकीने काळजी होती. त्यामुळे वेळापत्रकात बदल करून रथयात्रा सायंकाळी सुरू करण्याचे ठरले.

हा रथ जवळजवळ २ टन वजनाचा होता आणि त्यामध्ये भव्य-दिव्य विठ्ठलमूर्ती आरूढ झाली होती. रथाच्या माथ्यावर हनुमंताची प्रतिमा आणि ‘श्री पंढरीनाथ पद्मराग रथयात्रा’ असा नामनिर्देश फलक होता. रथयात्रेचे मनोहारी दृश्य श्रद्धावान कौतुकाने न्याहाळत होते. सर्व श्रद्धावान विठ्ठलाचा गजर करत श्रद्धेने, अफाट उत्साहाने, आनंदाने, रथाला बांधलेला दोरखंड ओढत रथ पुढे नेत होते. श्रद्धावान भक्तांनी सकाळी बनवलेली महाविष्णूची मृत्तिकेची आयुधेही ह्या रथात विठोबाच्या मूर्तीच्या चरणी अर्पण करण्यात आली होती.

डोक्यावर भगवे फेटे परिधान करून व हातात भगवे झेंडे घेऊन ‘जय जय राम कृष्ण हरि’, ‘माझा विठू, माझा विठू, विठू विठू’, ‘आला रे आला माझा सावळा विठ्ठल आला’ अशा बहारदार गजरांच्या ठेक्यावर नाचणार्‍या हजारो श्रद्धावानांनी आसमंत फुलून गेला होता. ढोल-ताशांचा निनाद, पवित्र नामाचा गजर आणि उत्साहाने आणि भक्तिभावाने एकत्र चालणाऱ्या हजारो श्रद्धावानांचे दृश्य, यांमुळे ही रथयात्रा पंढरपूरच्या चिरंतन वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविणारा भक्तिमय सोहळा ठरली. स्वतः सद्गुरु श्रीअनिरुद्ध रथयात्रेच्या मार्गावर सर्वांबरोबर चालत असल्यामुळे रथ ओढणार्‍या श्रद्धावानांच्या उत्साहाला उधाण आले होते.

नऊवारी साड्यांमध्ये नटलेल्या आणि पारंपरिक नथींनी सजलेल्या महिलांनी मनसोक्त आनंदाने गजराच्या तालावर नृत्य केले; विठूनामाच्या तालावर पडणारे त्यांचे प्रत्येक लयबद्ध आणि डौलदार पाऊल त्यांच्या लाडक्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेल्या निर्मळ भक्तीचे प्रतीक बनले. ह्या विठुमाऊलीचा रथ ओढताना प्रत्येक श्रद्धावानाला धन्य धन्य वाटत होते आणि आपले आयुष्य सार्थकी लागल्याचा आनंद होत होता.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
पंढरपूरच्या रस्त्यांवर श्री पंढरीनाथ पद्मनाभ रथयात्रा

तिसरा दिवस (७ मे २००१)

सर्व श्रद्धावानांनी आधी संत नामदेव महाराजांच्या पायरीचे, नंतर चोखोबा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले, कान्होपात्रा माऊलीच्या समाधीला मनोभावे प्रणाम केला आणि मगच विठ्ठलचरणी माथा टेकला. यापूर्वी बापूंनी सर्व श्रद्धावानांना या तीन महान संतांच्या कथा सांगितल्या होत्या.

ह्या भावयात्रेचे अजून एक अविस्मरणीय वैशिष्ट्य म्हणजे ‘दहीकाला उत्सव. ‘दहीकाला’ हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या डोळ्यांसमोर उत्साह आणि ऊर्जेने भरलेला सोहळा उभा राहतो. मग येथे तर प्रत्यक्ष पंढरीतील दहीकाला साजरा होणार होता. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली झालेल्या हा उत्सव केवळ एक परंपरागत विधी न राहता, सद्गुरुंच्या पावन उपस्थितीमुळे भक्ती, एकता आणि सामूहिक प्रयासांचा एक धडाच बनला.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
पंढरपूर भावयात्रेदरम्यान साजरा करण्यात आलेला दहीकाला उत्सव

चौथा दिवस (८ मे २००१)

रसयात्रेच्या चौथ्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत प्रथम हरिपाठ झाला. हा दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी वैशाख पौर्णिमेचे महत्त्व व त्या दिवशीच्या उपासनेची महती अगोदरच विशद केल्यामुळे प्रत्येक श्रद्धावानाच्या मनातील भक्तिभाव भाव उपासना करताना वृद्धिंगत झाला होता.

वैशाख पौर्णिमेच्या ह्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या उपस्थितीत सांघिक उपासना करण्यात आली, जिचा क्रम पुढीलप्रमाणे होता -

  1. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः । – (१ वेळा)
  2. सद्गुरु तारकमंत्र — (ॐ मनःसामर्थ्यदाता श्रीअनिरुद्धाय नमः ।) – (१०८ वेळा)
  3. श्रीहनुमानचलीसा – (११ वेळा)

यानंतर वैशाख पौर्णिमेचा सर्वश्रेष्ठ प्रसाद मानले जाणारे कैरीचे पन्हे व आंबेडाळ या तीर्थप्रसादाचे सेवन सर्वांनी केले.

स्वतः श्रीअनिरुद्ध स्टेजवर हजर झाले आणि ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ ह्या अभंगाने सुरुवात करून सर्वांनी सद्गुरु बापूंच्या सान्निध्यात चंद्रभागेच्या वाळवंटात टिपर्‍या खेळण्याचा आनंद लुटला. ‘भक्तांच्या मागे युगानुयुगे धावूनही, दुष्टांचा संहार युगानुयुगे करूनही हा खेळिया श्रीकृष्ण जराही थकत नाही’ यासंबंधी एक आख्यायिका श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांना सांगितली व टिपर्‍या खेळताना ‘मी श्रीकृष्णाचा गोप आहे’ हा भाव मनात ठेवून टिपर्‍या खेळायच्या, हेदेखील बजावले.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
पवित्र चंद्रभागा नदीच्या तीरावर टिपरी (गरबा) खेळण्यासाठी एकत्र आलेले श्रद्धावान

अखेरचा निरोप

अखेरच्या दिवशी निघण्यापूर्वी या भावयात्रेत अनुभवलेला आनंद सोहळा आठवून आणि पंढरपूरचा निरोप घेण्याच्या भावनेने प्रत्येक श्रद्धावानाचा ऊर भरून आला होता. पंढरपूरला संतांचे माहेरघर म्हटले जाते. अशा पंढरपुरात संपन्न झालेल्या ह्या भक्तिपूर्ण भावयात्रेनंतर पंढरपूरचा निरोप घ्यायचा, ही भावना कोणालाही सहन होत नव्हती.अखेरीस ह्या पंढरपूर भावयात्रेची सांगता करताना सद्गुरु बापूंनी श्रद्धावानांना सांगितले की:

“ ‘देवा! तू माझाच आहेस, पण मला तुझं व्हायचंय’ ह्या भावाने जगा. ह्यामुळे तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा होईल, प्रेमाने भरून जाईल.”

Sadguru Shree Aniruddha Bapu at Pandharpur Bhavyatra held in the year 2001

Sabha Mandap for Pandharpur Bhavyatra
Sabha Mandap for Pandharpur Bhavyatra
Shraddhavans making Padukas for Pandharpur Bhavyatra
Shraddhavans making Padukas for Pandharpur Bhavyatra
Celebrate the divine Shree Padmaraag Rathyatra. Witness Bapu’s compassion and the grand chariot of Shree Vitthal as Shraddhavans chant with fervor, filling the air with bhakti.