शिवगंगागौरी मंगल स्नान

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथील नवरात्री उत्सवाची सुरुवात, पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वेळी, ‘माता शिवगंगागौरी’च्या पवित्र मंगल स्नानाने होते. माता पार्वती आणि गंगामाता यांचे एकत्रित स्वरूप म्हणजे ‘माता शिवगंगागौरी’. या विधीचा एक भाग म्हणून, मातेच्या पवित्र प्रतीकाच्या रूपात एक शहाळे तिच्या समोर पूजेसाठीच्या तबकात आदरपूर्वक ठेवले जाते.

मंगल स्नानाच्या संपूर्ण कालावधीत ‘श्री शिवगंगागौरी गायत्री मंत्रा’चा अखंड जप केला जातो आणि तिच्या दिव्य कृपेसाठी व संरक्षणासाठी आवाहन केले जाते :

ॐ त्र्यंबकायै च विद्महे ।
अरिष्टस्तंभनकारिण्यै च धीमहि ।
तन्नो शिवगंगागौरी प्रचोदयात् ॥

Om Tryambakāyai Cha Vidmahe ।
Ariṣṭa-Stambhanakāriṇyai Cha Dhīmahi ।
Tanno Shivagangagauri Prachodayāt ॥

प्रत्येक उपचार अत्यंत नम्रतेने, श्रद्धेने आणि मनःपूर्वक केला जातो. त्यामुळे संपूर्ण नवरात्रीच्या काळासाठी एक सौम्य आणि पवित्र वातावरण निर्माण होते.

शिवगंगागौरी मंगल स्नान

पवित्र अलंकार - तोडे यांची मिरवणूक

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ‘मोठी आई’ अर्थात आदिमाता महिषासुरमर्दिनीचे पवित्र तोडे मंगलवाद्यांच्या पावन निनादात भव्य मिरवणुकीने श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे आणले जातात. हे तोडे पारंपरिक जाड धातूचे पैंजण आहेत. नवरात्रीमध्ये पूजल्या जाणाऱ्या आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या नऊ दिव्य स्वरूपांना समर्पित असे तोड्यांचे नऊ संच आहेत.

हे तोडे केवळ अलंकार नाहीत; ते आदिमातेच्या सामर्थ्यशाली, तसेच करुणामय कृपेचे आणि तिच्या सदैव संरक्षण करणाऱ्या उपस्थितीचे साकार प्रतीक म्हणून पूजनीय मानले जातात. स्वागतविधीनंतर हे पवित्र तोडे श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे दर्शनासाठी सन्मानपूर्वक ठेवले जातात. त्यामुळे शुभंकरा आणि अशुभनाशिनी या दोन्ही नवरात्री उत्सवांमध्ये श्रद्धावानांना आदिमातेचे आशीर्वाद आणि तिचे मातृप्रेम अनुभवता येते.

प्रत्येक श्रद्धावानाने या तोड्यांचे दर्शन घेताना हे स्मरणात ठेवावे की, परमेश्वरी आदिमाता आणि तिचा पुत्र परमात्मा देवीसिंह हे आपल्या लेकरांसोबत चालत असतात आणि जीवनातील प्रत्येक आव्हानातून त्यांचे संरक्षण करीत त्यांची काळजी वाहत असतात.

श्री आदिमाता महिषासुरमर्दिनी तोडे मिरवणूक

‘श्री मातृवात्सल्यविंदानम्‌’चे पवित्र पारायण – आदिमातेची कृपा प्राप्त करण्याचा मार्ग

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या अनंत करुणेतून, नवरात्रीच्या या विशेष कालखंडात भक्तिभावाने स्वतःला उपासनेत समर्पित करण्याचे अत्यंत मोठे आध्यात्मिक महत्त्व आपल्याला प्रेमाने समजावून सांगितले आहेच. सद्गुरु बापू म्हणतात की, या दिवसांमध्ये वातावरणामध्ये स्वाभाविकपणे मंगल स्पंदने आणि पवित्र कृपाशीर्वाद भरलेले असतात. त्यामुळे भक्तिभावाने केलेल्या पारायणादरम्यान, विशेषतः सद्गुरु बापूंनी स्वतः लिहिलेल्या पवित्र ‘मातृवात्सल्यविंदानम्’ ग्रंथाचे पारायण करताना साधकाला या सूक्ष्म कृपातरंगांचा लाभ मिळू शकतो.

‘मातृवात्सल्यविंदानम्’ किंवा ‘मातरैश्वर्यवेद’ हा ‘श्रीगुरुदत्तात्रेय’ आणि त्यांचे शिष्य ‘भगवान श्री परशुराम’ यांच्या संवादातून साकारलेला महान आणि पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये आदिमाता चण्डिकेच्या त्रिधा स्वरूपांचे—आदिमाता गायत्री, आदिमाता महिषासुरमर्दिनी आणि आदिमाता अनसूया—सोप्या व सहज पद्धतीने वर्णन केले आहे.

या पवित्र ग्रंथाचे वर्णन करताना सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू सुंदरपणे लिहितात की,

‘हा केवळ आदिमातेची कथा सांगणारा ग्रंथ नाही. तो एक पवित्र ग्रंथ आहे; तो गुणसंकीर्तन आहे, ज्ञानाची गंगा आहे आणि भक्तीची भागीरथी आहे — हृदयातून परमात्म्याकडे वाहणारी शुद्ध भक्ती.’

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सद्गुरु बापू शिकवतात की, आदिमातेची ‘शुभंकरा’ आणि ‘अशुभनाशिनी’ ही दोन्ही स्वरूपे म्हणजे तिचेच मातृप्रेम आणि संरक्षण करणारी उपस्थिती होय. त्यामुळेच, जेव्हा श्रद्धावान ‘श्री मातृवात्सल्यविंदानम्‌’चे पारायण करतात, तेव्हा ती प्रेमळ आदिमाता आपल्या शेजारी येऊन बसते आणि हे पारायण ऐकते, अशी त्यांची श्रद्धा असते.

श्रद्धावान ‘शुभंकरा नवरात्री’च्या काळात गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आणि ‘श्री मातृवात्सल्यविंदानम्’मध्ये सांगितल्याप्रमाणे अश्विन नवरात्रीच्या (‘अशुभनाशिनी नवरात्री’) काळात घटस्थापनेपासून अश्विन नवमीपर्यंत ‘श्री मातृवात्सल्यविंदानम्‌’ ग्रंथाचे पारायण करतात. या पवित्र ग्रंथातील प्रत्येक अक्षराला, दिव्य मातृप्रेम—‘मातृ-वात्सल्य’—याचा स्पर्श आहे. हे प्रेम निरपेक्ष, संगोपन करणारे आणि संरक्षण देणारे आहे. अशा पारायणाचे लाभ अगणित आहेत. ते केवळ ऐहिक लाभांपुरते मर्यादित नसून अंतःशांती, मनाची स्पष्टता आणि परमेश्वरी आदिमातेशी नव्याने दृढ होणारी जवळीक यांपर्यंत पोहोचतात.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
श्री मातृवात्सल्यविंदानम्‌, अर्थात् मातरैश्वर्यवेदः

जागरणाचे महत्त्व

भक्तीचा मार्ग अधिक दृढ करण्यासाठी सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, नवरात्रीच्या या कालखंडात श्रद्धावानांना जागरण करण्याचेही प्रेमाने मार्गदर्शन केले आहे. जागरण म्हणजे भक्तिभावाने, उपासना करीत संपूर्ण रात्रभर जागे राहणे. या साधनेचे अत्यंत मोठे आध्यात्मिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, ‘जागरण’ म्हणजे आदिमातेच्या उपस्थितीची जाणीव सतत जागृत ठेवण्याचा एक मार्ग आहे.

असे हे अत्यंत महत्त्वाचे ‘जागरण’ नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी संपूर्ण रात्र करता येते. निवडीच्या ह्या स्वातंत्र्यामुळे श्रद्धावान आपल्या परिस्थिती आणि वेळेनुसार योग्य रात्र निवडू शकतो आणि ही उपासना त्याच्यासाठी आनंदाचा स्रोत बनते, ओझे होत नाही.

प्रत्येक भक्ताची क्षमता आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात, हे लक्षात घेऊन सद्गुरु बापूंनी आणखी सुलभ मार्ग सांगितला आहे. एखाद्याला संपूर्ण रात्र जागरण करणे शक्य नसेल, तर त्याने प्रेमाने अंशतः जागरण करावे, असे त्यांनी सांगितले. हे अंशतः जागरण रात्री ९:३० ते पहाटे २:३० या वेळेत केले जाते.

हे अखंड आणि भक्तिभावपूर्ण जागरण, ‘मातृवात्सल्यविंदानम्’ ग्रंथाचे वाचन किंवा आपल्या आवडीच्या अन्य पवित्र स्तोत्रांचे अथवा मंत्रांचे पठण करून करता येते. सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी जागरणाच्या या उपासनेत अशी सहजता दिलेली आहे की प्रत्येक श्रद्धावान या पवित्र काळात आदिमातेच्या दिव्य कृपेचा स्वीकार करण्यात मनापासून सहभागी होऊ शकतो, आपली श्रद्धा वाढवू शकतो आणि आपले अंतर्बल दृढ करू शकतो.

सद्गुरु अनिरुद्ध बापू नवरात्रीचा खरा अर्थ उलगडून सांगतात आणि या नऊ दिवसांत आपण काय करावे, हे स्पष्ट करतात.

अंबज्ञ इष्टिका पूजन

‘शुभंकरा नवरात्री’ आणि ‘अशुभनाशिनी नवरात्री’ या दोन्ही पवित्र कालखंडांमध्ये श्रद्धावान आदिमाता चंडिकेचे ‘अंबज्ञ इष्टिका पूजन’ अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने करतात. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी प्रेमाने दिलेल्या या नवरात्री पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शुद्धता, साधेपणा आणि सात्त्विकता! बाह्यतः हे पूजन अत्यंत साधे असले, तरी त्याचे स्वरूप अत्यंत पवित्र आहे. नवरात्री साजरी करण्याच्या पारंपरिक पद्धतीचे हे खरे स्वरूप आहे आणि मनातील कृतज्ञता व प्रामाणिक भावनेतून भक्ताला थेट आदिमातेशी जोडते.

या पवित्र उपासनेमध्ये श्रद्धावान स्वतः इष्टिकेवर, म्हणजेच ‘अंबज्ञ इष्टिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र विटेवर, आदिमाता चण्डिकेचे मुख रेखाटतात. श्रद्धावानाकरिता ही इष्टिका, आदिमाता चण्डिकेचे सजीव प्रतिनिधित्व बनते आणि नवरात्रीमध्ये तिची अत्यंत भक्तिभावाने व सन्मानपूर्वक स्थापना केली जाते. रेखाटलेली प्रत्येक रेषा आणि केलेला प्रत्येक उपचार भक्ती व प्रेमातूनच साकार होतो. त्यामुळे हे पूजन प्रत्येक श्रद्धावानाकरिता वैयक्तिक आध्यात्मिक अनुभव ठरते.

‘अंबज्ञता’ म्हणजे आदिमाता आणि तिचा पुत्र स्वयं भगवान त्रिविक्रम यांच्याप्रती अंतःकरणातून व्यक्त होणारी कृतज्ञता. ही अंबज्ञताच या इष्टिकेच्या रूपाने साकार आणि पवित्र स्वरूप धारण करते, अशी श्रद्धा आहे. या साध्या, पण गहन कृतीतून कृतज्ञता ही केवळ भावना न राहता उपासनेचे रूप धारण करते. त्यामुळे श्रद्धावानांना नम्रता, श्रद्धा आणि प्रेमपूर्ण समर्पणातून आदिमातेशी असलेली एक शांत, आंतरिक जवळीक अनुभवता येते.

अंबज्ञ इष्टिका पूजन

श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथील रात्रपठण

दोन्ही नवरात्रींच्या काळात श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे ‘जागरण’, ज्याला ‘रात्रपठण’ असेही म्हणतात, करणे श्रद्धावान अत्यंत मंगलमय मानतात.

रात्रीच्या शांत वातावरणात श्रद्धावान श्री रामरसायन, श्री मातृवात्सल्यविंदानम्‌, श्री मातृवात्सल्य उपनिषद्‌ इत्यादी पवित्र ग्रंथांचे वाचन करतात किंवा श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मधील आदिमाता महिषासुरमर्दिनी, अनसूया माता आणि इतर देवतांच्या मंगलमय व शांत मुखकमलांना केवळ प्रेमाने न्याहाळत राहतात. रात्रीच्या ह्या शांत काळामध्ये केलेल्या या अखंड स्मरणामुळे आध्यात्मिक जाणीव, भक्ती आणि आध्यात्मिक सामीप्य अधिक दृढ होते.

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् व्यतिरिक्त, श्रद्धावान याच श्रद्धापूर्ण पद्धतीने सर्व श्री त्रिविक्रम मठांमध्ये, तसेच श्री गुरुकुल-जुईनगर येथेही रात्रपठण करतात. त्यामुळे ही पवित्र साधना या सर्व पवित्र स्थानांमध्येही अनुभवता येते.

Shraddhavans immersed in Ratrapathan at Shree Aniruddha Gurukshetram
श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथे रात्रपठणात तल्लीन झालेले श्रद्धावान
Ambadnya Ishtika Poojan
Ambadnya Ishtika Poojan
Shraddhavans perform doing Shree Ramrasayan ratra pathan at Shree Trivikram Math during Navratri utsav

Shraddhavans perform doing Shree Ramrasayan ratra pathan at Dwarkamai, Govidyapeetham, Kothimbe during Navratri utsav

Shree Mahishasurmardini's tode procession during Navratri Utsav at Shree Aniruddha Gurukshetram

Shraddhavans taking darshan at Shree Aniruddha Gurukshetram during Navratri Utsav
Shraddhavans taking darshan at Shree Aniruddha Gurukshetram during Navratri Utsav