मंदोदरी - नामस्पर्शाच्य मार्गावरून चाललेली पहिली व्यक्ती.
हा स्पर्श आहे पवित्र रामनामाचा. हा नामस्पर्श सर्वप्रथम केला रावणाच्या पत्नी मंदोदरीन. लंकेत कोणालाही रामनाम उच्चारायची परवानगी नव्हती; तिथे ‘रामनाम’ जपण्यावर पूर्ण बंदी होती. म्हणून मंदोदरीने ‘नामस्पर्शा’चा मार्ग स्वीकारला.
एके दिवशी, ‘नामस्पर्श’ करत असताना तिला प्रभू रामांच्या चरणकमलांचा स्पर्श जाणवला. तिने डोळे उघडले तेव्हा तिला फक्त धनुष्य दिसले. राम हा एकनिष्ठ, एकपत्नी असल्यामुळे, मंदोदरी महालात एकटी असताना रामाने एकट्याने तिला दर्शन देणे योग्य ठरले नसते; म्हणून, रामाने आपल्या धनुष्याच्या माध्यमातून तिला प्रतिकात्मकरीत्या दर्शन दिले.
या ‘नामस्पर्शा’मुळे मंदोदरीची तपश्चर्या रावणाच्या तपश्चर्येपेक्षा अधिक पवित्र आणि श्रेष्ठ ठरली. ‘नामस्पर्श’ म्हणजे साक्षात प्रभू रामांचा स्पर्श. त्यांच्या चरणकमलांचा स्पर्श आणि त्यांच्या पवित्र हातांचा स्पर्श.
नामस्पर्शाचा सराव तीन प्रकारे केला जाऊ शकतो.
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांनी त्यांच्या प्रवचनात स्पष्ट केल्याप्रमाणे, ‘नामस्पर्श’चा अभ्यास तीन प्रकारे करता येतो:
- डोळे उघडे ठेवून किंवा बंद करून उजव्या हाताच्या तळहाताने हवेत ‘रामनाम’ लिहा. असे करताना, आपण प्रभू रामाच्या त्या चतुर्भुज रूपाच्या मांडीवर बसून नामस्पर्श करत आहोत, त्याच्याच उपस्थितीत त्याचे नाव हवेत लिहीत आहोत, असा भाव मनात ठेवून नामस्पर्श करावा.
- डोळे बंद करून उजव्या हाताची पाचही बोटे एकत्र येऊ न देता आपल्या हृदयावर उजवा हात ठेवावा व मनात ‘रामनामा’चा जप करावा. हे रामनाम घेताना ह्या नामाची स्पंदने माझ्या मुखातून माझ्या हृदयात प्रवेश करीत आहेत, असा भाव मनात ठेवावा. असे रामनाम आपल्या अंत:करणापर्यंत पोहोचते, हृदयाला शुद्ध करते आणि हृदयापासून संपूर्ण शरीरात पसरते.
- डोळे मिटून, उजव्या हाताच्या अनामिकेने (करंगळीच्या शेजारच्या बोटाने) डाव्या हाताच्या तळहातावर ‘रामनाम’ लिहा. या ‘नामस्पर्शाचा’ सराव दररोज डोळे मिटून पाच वेळा करावा. जेव्हा मी नामस्पर्श करतो, तेव्हा ‘चरणध्यान’ आपोआप घडते.
‘नामस्पर्श’ हा ‘चरणस्पर्श’ साधण्याचा एक सोपा आणि सहज मार्ग आहे. एकदा का ‘नामस्पर्श’ साधला गेला, की ‘चरणस्पर्श’ प्राप्त होतोच.
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने
पादुका - नाम - चरण हे अविभाज्यपणे जोडलेले आहेत.
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥ म्हणजेच रामनाम हे विष्णूच्या सहस्त्रनामा इतकेच पवित्र आहे. हेच रामनामाचे माहात्म्य आहे, असा या रामनामाचा महिमा स्वयं भगवान शिव पार्वतीला सांगतात.
असे हे ‘रामनाम’ आपल्या मनावर अंकित करण्याचे, ते हृदयात कोरून ठेवण्याचे आणि आपल्या अंत:करणात साठवून ठेवण्याचे सहजसोपे साधन म्हणजेच नामस्पर्श. ‘नामस्पर्श’ आणि पवित्र ‘पादुका’ यांच्यात आणखी एक सुंदर संबंध आहे.
महाप्राण हनुमानाने रामसेतूच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाषाणांवर ‘राम’ हे नाम लिहिले; पण त्या पाषाणाने ‘नामस्पर्श’ अनुभवला. ते रामनाम लिहिलेले पाषाण तरले, आणि ‘रामनाम’ अंकित असलेल्या त्या पाषाणांपासून बनलेल्या याच सेतूवरून प्रभू राम, लक्ष्मणजी, हनुमानजी आणि वानरसेना चालत गेली.
नामस्पर्श म्हणजेच ‘हनुमत् स्पर्श’
‘तुलसीपत्र १५८६’ या अग्रलेखात सद्गुरु श्री अनिरुद्ध यांनी ‘नामस्पर्श’चा उल्लेख ‘हनुमत् स्पर्श’ असाही केला आहे. हनुमान हा पवनपुत्र म्हणजेच साक्षात ‘रामनाम’च. म्हणूनच, हवेत ‘रामनाम’ लिहिणे हे ‘नामस्पर्श’चे सर्वात खरे स्वरूप आहे.
हनुमंत म्हणजे ‘महाप्राण’, जो प्रत्येक अजीव व सजीवात असतोच. ‘नामस्पर्शा’द्वारे तो हनुमंत आपल्या हृदयाला हात घालतो. आमचे अंतःकरण त्या आत्मारामाशी जोडतो; असे हे ‘रामनाम’ आपल्या अंतःकरणाच्या खोलवर पोहोचते. जेव्हा आपण ‘रामनाम’ वहीत हनुमंताच्या आकृती बंधनात ‘रामनाम’ लिहितो, तेव्हा तो देखील ‘नामस्पर्श’च असतो. अगदी डिजिटल ‘रामनाम’ वहीत लेखन करतानाही ‘नामस्पर्श’ अनुभवता येतो.
‘राम’ हे नाव ‘रं’ बीज, ‘आं’ बीज आणि ‘म’ बीज या तीन बीजांपासून बनलेले आहे. ही तीन अक्षरे म्हणजे स्वयंभगवान त्रिविक्रमांची तीन पावलेच आहेत.
र+आ+म = राम
हा ‘रामनाम’ मंत्र, ‘नाम’ आणि प्रभूंचे ‘चरण’ या दोन्हीचे प्रतीक आहे. हे चरण म्हणजेच ‘नामस्पर्श’ आहेत. जर आपल्याला रामाच्या पादुका आपल्या हृदयात प्रतिष्ठित करायच्या असतील, तर ‘नामस्पर्श’ अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री लक्ष्मण सतत माता सीता आणि प्रभू राम यांच्या कमळासारख्या कोमल चरणांचे ध्यान करत असतात. जेव्हा मी ‘नामस्पर्श’ करतो, तेव्हा ‘चरणध्यान’ सहजपणे घडते.





