नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, आपत्ती ही आधुनिक जगातील एक दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता ह्या आपत्ती उद्भवू शकतात आणि त्यामुळे जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान, उपजीविकेत अडथळे तसेच मोठ्या प्रमाणावर सामाजिक व आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. EM-DAT (Emergency Events Database) डेटाबेसनुसार, २०२४ मध्ये जगभरात नैसर्गिक धोक्यांशी संबंधित ३९३ आपत्तींची नोंद झाली. या आपत्तींमुळे १६.७ कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले, १६,७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास २४२ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले.

भारताला पूर, चक्रीवादळे, भूकंप, भूस्खलन आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा विशेष धोका आहे. याशिवाय आग, औद्योगिक दुर्घटना, वाहतूक अपघात आणि हिंसाचाराच्या घटनाही मोठे धोके निर्माण करीत असतात. मोठे धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक मेळावे यांमध्ये संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आपत्तीविषयक जागरूकता, पूर्वतयारी आणि सुरक्षित व सुनियोजित गर्दी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते.

भारतात दरवर्षी अनेक धार्मिक उत्सव आणि मोठे सार्वजनिक मेळावे आयोजित केले जातात, जिथे लाखो भाविक उपस्थित राहतात. एकट्या महाराष्ट्रात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कुंभमेळा, माउंट मेरी फेअर तसेच ज्योतिबा आणि मांढरदेवी मंदिरांमधील यात्रा यांसारख्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशा वेळी चेंगराचेंगरी आणि आग यांसारख्या आपत्ती टाळण्यासाठी प्रभावी गर्दी-व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी आवश्यक असते. २००५ मध्ये वाई येथे मांढरदेवी मंदिरात लागलेल्या आगीमध्ये सुमारे २५० जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेतूनही याचे महत्त्व अधोरेखित होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, प्रभावी प्रतिसादासाठी अग्निशमन दल, पोलीस, रुग्णालये आणि इतर आपत्कालीन यंत्रणांच्या प्रयत्नांबरोबरच प्रशिक्षित स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो.

आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी पूर्वतयारी हाच सर्वांत प्रभावी मार्ग आहे. जागरूकता निर्माण करून, उपयुक्त कौशल्ये विकसित करून आणि सेवेची भावना जोपासून समाज आपत्कालीन परिस्थितीत अधिक आत्मविश्वासाने प्रतिसाद देण्यासाठी सक्षम होतो. संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करणे हे केवळ नागरी-कर्तव्य नसून नैतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी देखील आहे.

Sadguru Aniruddha Bapu addresses the Aniruddha's Academy of Disaster Management (AADM) foundation seminar
Sadguru Aniruddha Bapu अनिरुद्धांच्या आपत्ती व्यवस्थापन अकादमीच्या (AADM) Foundation Seminar मध्ये मार्गदर्शन करताना

सद्गुरु अनिरुद्ध बापूंची दृष्टी

समाजाच्या सुरक्षिततेविषयी आणि कल्याणाविषयी असलेल्या ध्यासातून, डॉ. अनिरुद्ध डी. जोशी, ज्यांना प्रेमाने सद्गुरु अनिरुद्ध बापू म्हणून ओळखले जाते, यांनी १४ मार्च २००२ रोजी अनिरुद्धांच्या आपत्ती व्यवस्थापन अकादमीची (AADM) स्थापना केली. अध्यात्म आणि निःस्वार्थ सेवा या मूल्यांवर आधारलेल्या AADM चे वर्णन सद्गुरु बापूंनी “घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे प्रत्यक्ष कृतीरूप” असे केले आहे.

जानेवारी २००१ मधील भुज भूकंप आणि डिसेंबर २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपत्ती व आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या प्रशिक्षित नागरिकांची गरज अधोरेखित केली आणि त्यातून AADM च्या स्थापनेची प्रेरणा मिळाली. सद्गुरु बापूंच्या दूरदृष्टीतून आणि समर्पित प्रयासातून साकार झालेल्या AADM ची स्थापना आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती निर्माण करणे, जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आणि समाजामध्ये निःस्वार्थ सेवाभाव रुजविणे या उद्देशांनी करण्यात आली.

सद्गुरु अनिरुद्ध बापूंची दृष्टी

ध्येय आणि प्रशिक्षण

राष्ट्रीयत्व, जात, पंथ किंवा धर्म असा कोणताही भेद न करता प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना प्रभावीपणे सामोरे जाण्यास सक्षम करणे हेच AADM चे ध्येय आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागींना बचाव पद्धती, प्राथमिक प्रथमोपचार तसेच कार्डिओ पल्मोनरी सेरेब्रल रिससिटेशन (CPCR) यांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर किंवा वैद्यकीय पथकाची मदत उपलब्ध होईपर्यंत आवश्यक ती मदत पुरविण्यास ते सक्षम होतात.

जून २०२६ पर्यंत AADM ने ८७,००० हून अधिक ‘आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक’ म्हणजेच Disaster Management Volunteers (DMVs) ना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत समाजाच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या नागरिकांचे एक मोठे जाळे निर्माण झाले आहे.

या प्रशिक्षणामध्ये वर्गातील शिक्षणाबरोबरच आवश्यक प्रशिक्षण, मॉक ड्रिल्स आणि प्रत्यक्ष सराव यांचा समावेश असतो. स्वयंसेवकांना बचावकार्याच्या पद्धती, अग्निशमन, प्रथमोपचार, बँडेज बांधणे, गाठी बांधणे, स्ट्रेचर हाताळणे आणि कार्डिओ पल्मोनरी सेरेब्रल रिससिटेशन (CPCR-Cardio Pulmonary Cerebral Resuscitation) यांचे प्रशिक्षण दिले जाते. सक्षम संपर्क व समन्वय यंत्रणेच्या माध्यमातून, आपत्कालीन परिस्थिती किंवा आपत्ती निवारण कार्याच्या वेळी प्रशिक्षित DMVs ना अल्पावधीत एकत्रित करून स्थानिक प्रशासनाच्या सहाय्यासाठी कार्यरत करता येते.

AADM तर्फे विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम विनामूल्य आयोजित केले जातात. यामध्ये मूलभूत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, अग्निशमन प्रशिक्षण, बचावकार्य प्रशिक्षण, कॉर्पोरेट आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, गांडूळखत निर्मिती प्रशिक्षण, हॅम रेडिओ प्रशिक्षण तसेच संचलन (परेड) प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

Sadguru Aniruddha Bapu addresses the Aniruddha's Academy of Disaster Management (AADM) foundation seminar
अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (AADM) च्या फाउंडेशन-सेमिनारमध्ये मार्गदर्शन करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू.

संकटाच्या काळात समाजसेवा

अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (AADM) च्या फाउंडेशन-सेमिनारमध्ये मार्गदर्शन करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू.गेल्या अनेक वर्षांत AADM च्या स्वयंसेवकांनी विविध आपत्ती आणि सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितींमध्ये मोलाची सेवा बजावली आहे. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुराच्या वेळी DMVs नी बचाव व मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला, विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना मदत केली तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. त्यांच्या या समर्पित सेवेची शासकीय यंत्रणांनीही दखल घेतली आणि त्यानंतर AADM ने पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी शासनातर्फे करण्यात येणाऱ्या पूर्वतयारी व नियोजनामध्येही महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

भूस्खलन, आग, बॉम्बस्फोट तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितींमध्येही DMVs नी पोलीस, अग्निशमन दल आणि इतर शासकीय यंत्रणांना सहकार्य केले आहे. बचावकार्यात मदत करणे, प्रथमोपचार देणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी अथवा उपचारासाठी हलविणे आणि आपत्ती निवारण कार्यात आवश्यक ते सहाय्य करणे अशा विविध स्वरूपांत त्यांनी योगदान दिले आहे.

आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देण्यापलीकडेही AADM महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक मेळाव्यांमध्ये गर्दी व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. गणपती विसर्जन, नवरात्रोत्सव, महाशिवरात्र, पंढरपूर वारी आणि विविध मंदिर उत्सवांमध्ये DMVs मोठ्या संख्येने सरकारी यंत्रणांसोबत काम करतात आणि भाविकांची ये-जा सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध रीतीने व्हावी हे सुनिश्चित करण्यास मदत करतात. याशिवाय, शासनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पोलिओ लसीकरण मोहिमांसारख्या विविध सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांमध्येही AADM चे स्वयंसेवक नियमितपणे सहभागी होतात.

श्रद्धेने गणपती बाप्पांची सेवा : AADM स्वयंसेवक | अनंत चतुर्दशी सेवा २०२५

सरकारी यंत्रणांना सहाय्य

AADM ने विविध शासकीय आणि सार्वजनिक संस्थांशी समन्वय साधून कार्य केले आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्रातील विविध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, बेस्ट (BEST) तसेच नेव्हल डॉकयार्ड यांचा समावेश आहे.

या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयासोबत (DVET) करण्यात आलेला सामंजस्य करार (MoU). या कराराचा उद्देश राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे हा आहे. AADM तर्फे हे प्रशिक्षण मे २०२५ पासून दिले जात आहे. याशिवाय, विविध कॉर्पोरेट संस्थांसाठीही आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्याच्या आपल्या बांधिलकीचा एक भाग म्हणून AADM ने ‘The Textbook of Disaster Management’ या विषयावरील भारतातील अग्रणी ग्रंथांपैकी एक ग्रंथ प्रकाशित केला. या पुस्तकाची पहिली इंग्रजी आवृत्ती एप्रिल २००२ मध्ये, तर मराठी आवृत्ती जुलै २००२ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, आजही ते आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि आपत्तीपूर्व सज्जतेसाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरत आहे.

AADM ने DVET सोबत ITI विद्यार्थ्यांना राज्यभर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी MoU केला.

पर्यावरणविषयक उपक्रम

AADM ची सेवेप्रती असलेली बांधिलकी केवळ आपत्ती व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून, गांडूळखत निर्मिती, वृक्षारोपण आणि सीडबॉलद्वारे बीजप्रसार यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही विस्तारली आहे.

AADM च्या गांडूळखत निर्मिती प्रकल्पांद्वारे सुमारे ७०० टन सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करून जवळपास १४० टन गांडूळखताची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था, शासकीय संस्था आणि कॉर्पोरेट संस्थांसाठी यासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

AADM च्या स्वयंसेवकांच्या सहभागातून महाराष्ट्रभर १.९ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच जून २०२६ पर्यंत वनक्षेत्रांमध्ये आणि अन्य निर्धारित क्षेत्रांमध्ये ९.४९ लाखांहून अधिक सीडबॉल्स विखुरून बीजप्रसार करण्यात आला आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले जात आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि L&T (लार्सन अँड टुब्रो). यांच्या सहकार्याने अनिरुद्धांच्या आपत्ती व्यवस्थापन अकादमीने लावलेली २,००० झाडे

पुढील वाटचाल

वारंवार उद्भवणाऱ्या आपत्ती आणि त्यांची वाढती तीव्रता या पार्श्वभूमीवर, आपत्तीपूर्व सज्जतेची आवश्यकता आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची ठरली आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी AADM ची संकल्पना केवळ ‘साहसी उपक्रम’ राबविणारी संस्था म्हणून नव्हे, तर आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकणारे जबाबदार, शिस्तबद्ध आणि सेवाभावी नागरिक घडविणारे एक सक्षम व्यासपीठ म्हणून केली.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दूरदृष्टीला अनुसरून, जीवनाचे रक्षण करण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीत समाजाला सहाय्य करण्यासाठी आणि सज्जता, करुणा व निःस्वार्थ सेवेची संस्कृती रुजविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास व्यक्तींमध्ये विकसित करण्याचे कार्य AADM सातत्याने करीत आहे.

AADM संपर्क

Aniruddha’s Academy of Disaster Management
६०१, लिंक अपार्टमेंट, ६वा मजला, ओल्ड खार व्हिलेज,खार (पश्चिम), मुंबई – ४०००५२.

दूरध्वनी: ०२२-०२६०५७०५४, ०२६०५४४७४
ई-मेल: [email protected]
वेबसाइट: www.aniruddhasadm.com

सोशल मीडिया

AADM DMVs helping the common people during 26th July 2005 Heavy Rain Disaster

AADM DMVs helping the common people during Sakinaka Landslide during 26th July 2005 Heavy Rain Disaster