जेव्हा ही जाणीव जीवनातील एक प्रत्यक्ष वास्तव बनते, तेव्हा आपण स्वाभाविकपणे प्रत्येक कृती त्याला अर्पण म्हणून करू लागतो; कारण आपल्याला याची जाणीव असते की, तो आपल्या प्रत्येक विचाराचा, शब्दाचा आणि कृतीचा प्रेमपूर्वक साक्षीदार आहे. ही जाणीव हीच एक आध्यात्मिक जीवनपद्धती आहे आणि या ‌‘भक्तीभाव चैतन्य‌’ तत्त्वाचे हेच सार सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांनी ‌‘श्रीमत्पुरुषार्थ ग्रंथराज, खंड १ सत्यप्रवेश, चरण १‌’मध्ये अतिशय सुंदररीत्या मांडले आहे:

चरण १

आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य आपण परमेश्वराकरिता करत आहोत व परमेश्वराला प्रत्येक गोष्ट त्याच क्षणी कळत असते, हे लक्षात ठेवून जगणे म्हणजेच आध्यात्मिक जीवन व हाच मार्ग खरेखुरे समाधान, शांती व नित्यप्रसन्नता देणारा असतो.

जे प्रत्यक्षात ‌‘भगवत्ज्ञान‌’ म्हणजेच भगवंताविषयीचे यथार्थ ज्ञान आणि ‌‘भगवत्भान‌’ म्हणजेच भगवंत आणि माझ्या जीवनातील त्यांची सक्रिय उपस्थिती यांविषयीची यथार्थ जाणीव व भान हे आहे.

‌‘सच्चिदानंद‌’ म्हणजेच ‌‘जिवंत, वास्तव आणि चैतन्यमय आनंद‌’ हे ‌‘त्रिनाथ‌’ (परमेश्वर दत्तगुरु, आदिपिता सहजशिव नारायण आणि आदिमाता जगदंबा नारायणी) यांचे स्वरूप आहे. हे त्रिनाथ ‌‘सत्‌‍, चित्‌‍ आणि आनंद‌’ या रूपांत प्रकट होतात; हाच तो आनंद आहे जो संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे आणि भक्तांचे जीवन पूर्णपणे भरून टाकतो. हा जिवंत आनंद म्हणजेच ‌‘स्वयंभगवान‌’; हाच त्रिनाथांचा आनंद अर्थात ‌‘त्रिविक्रम‌’.

ह्या स्वयंभगवानाच्या, कुठल्याही आपल्याला आवडणाऱ्या रूपाशी जोडून घेणे व अधिकाधिक जोडून घेत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य.

हे ‌‘भक्तीभाव चैतन्य‌’ आणि त्याचा मूळ स्त्रोत या दोन्ही गोष्टी अथांग व अनिरुद्ध आहेत; अर्थात ज्यांची गती कुणीही जाणू शकत नाही आणि ज्यांची गती कुणीही रोखू शकत नाही असे!

तुम्ही त्याला राम किंवा हरि, हर, हरिहर, कृष्ण, शिव, ईश्वर, सर्वेश्वर म्हणू शकता किंवा तुम्हाला आवडेल त्या कोणत्याही नावाने त्याला साद घालू शकता.

कुठलेही नियम करायचे आणि पाळायचे, तेसुद्धा प्रेमानेच.

‌‘स्वयंभगवानाचा मंत्रगजर‌’ हा भक्तीभाव चैतन्यामध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो; कारण दत्तात्रेयांच्या भगिनी ‌‘शुभात्रेयी’ यांनी याचे पठण केले होते.

सार्वभौम मंत्रगजरचे महत्त्व

ज्याला दररोज १६ माळा मंत्रगजर करणे शक्य नाही, त्याने आपल्या क्षमतेनुसार ‌‘मोजणी न करता‌’ तो मंत्रगजर करत राहावा आणि तो ‌‘त्या‌’च्या चरणी अर्पण करत राहावा - अशा श्रद्धावानाचेही जीवन अधिकाधिक सुंदर होत जाणार हे निश्चित आहे.

स्वयंभगवान त्रिविक्रमाचे दैवी स्वरूप आणि गुणधर्म

भक्तीभाव चैतन्याचे अधिक विवेचन करताना, बापू स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या (The Supreme Personality of Godhead) दिव्य स्वरूपाचे आणि गुणधर्मांचे वर्णन करतात.

हा ‌‘स्वयंभगवान‌’, ‌‘देवाधिदेव‌’ आणि ‌‘त्र्यंबकराज‌’च आहे जो अनंत विश्वांची काळजी घेत राहतो व त्यांचे रक्षण करतो आणि पर्यायाने माझीही; हे आपल्या मनाला रोज सांगत रहायचे, कारण मन चंचल असते आणि म्हणूनच मनाशी रोज संवाद साधणे आवश्यक असते.

‌‘हा स्वयंभगवान, म्हणजेच देवांचाही देव, साक्षात प्रेमस्वरूप, नित्य-तृप्त, सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वसमर्थ आहे‌’ हा अनुभव केवळ ‌‘भक्तीभाव चैतन्यातून‌’च मिळू शकतो.

स्वयंभगवान त्रिविक्रमावर प्रेम करण्यासारखे दुसरे पावित्र्य नाही.

कोणी कितीही लाखो सेवा करोत, कोणी कितीही मोठी किंवा महान कार्ये करोत, कोणी समाजाच्या सर्व प्रचलित नियमांचे तंतोतंत पालन करोत, परंतु त्याने स्वयंभगवानावर प्रेम केले नाही, स्वयंभगवानाची सेवा केली नाही, तर ही सर्व कर्मे त्रासदायकच ठरतात.

भक्तांची हाक तत्काळ ऐकून, त्या क्षणालाच कार्यरत होणारा समर्थसेतु हाच एकमेव अद्वितीय.

हा स्वयंभगवान, देवाधिदेव खूप सोपा, साधा, सहज वावरणारा, न मिरवणारा, स्वतःचे मोठेपण इतरांवर न लादणारा, स्वतःच्या उपकारांची आठवण न करून देणारा आणि फक्त न बोलता प्रेम करीत राहणारा आहे.

श्रद्धावानाच्या मुखातून निघालेले भक्तिपूर्ण शब्द, देवांचाही देव असलेल्या या ‌‘स्वयंभगवाना‌’च्या कानांना सर्वोत्तम आणि उत्कृष्ट अशा अमृतापेक्षाही अधिक मधुर व तृप्तिदायक वाटतात.

‌‘हे देवाधिदेवा! हे स्वयंभगवान! हे माझ्या देवा! माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझी निष्ठा तुझ्या चरणांशी आहे‌’

हे उच्चारताना आपोआप श्रद्धावानाच्या जीवनातील अनेक घातक गोष्टी व पापे दूर होत राहतात.