बापूंच्या फोटोसमोर केलेली प्रत्येक प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतेच
श्रद्धावानासाठी बापूंचा फोटो म्हणजे बापूंच्या सचेतन अस्तित्वाचे प्रतीक असतो; कारण श्रद्धावानाच्या विश्वासानुसार, बापूंच्या फोटोसमोर उच्चारलेला प्रत्येक शब्द ऐकला जातो. बापूंच्या फोटोसमोर श्रद्धावानाच्या ओघळलेल्या प्रत्येक अश्रूमागील भाव जाणला जातो. बापूंच्या फोटोसमोर केलेली प्रत्येक प्रार्थना बापूंपर्यंत पोहोचतेच.
निराशेच्या गर्तेत असतानाच असे काही नाजूक क्षण येतात, जेव्हा अचानक बापूंचा फोटो आपल्या नजरेस पडतो. कदाचित अनपेक्षितपणे समोर आलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून, कदाचित रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाडीच्या काचेवर झळकणारा बापूंचा फोटो किंवा आपण ज्या ठिकाणी बापूंचा फोटो असेल अशी कल्पनाही केलेली नसते, अशा अनपेक्षित ठिकाणी जेव्हा तो दिसतो. आणि त्याच क्षणी, आपल्या अंतर्मनाला खूण पटते की हा निव्वळ योगायोग नाही. ते क्षण अलगद करून दिलेल्या आठवणीसारखे, स्मरणासारखे असतात. जणू बापूंनी स्वतःच आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय देण्यासाठी तो क्षण निवडलेला असतो.
खरे तर, श्रद्धावानासाठी बापूंचा फोटो त्यांच्यापासून कधीही वेगळा नसतो; तो त्यांची जवळीक, त्यांचे सानिध्य अनुभवण्याचा आणखी एक मार्ग असतो. बापू शांतपणे आपली सोबत करत राहतात आणि त्यांची उपस्थिती सदैव आपल्यासोबत आहे, याची आठवण करून देत राहतात.















