पदचिन्ह (चरणमुद्रा) म्हणजे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रत्यक्ष चरणांचे पवित्र ठसे. ही कोणतीही प्रतीकात्मक किंवा कलात्मकरीत्या तयार केलेली प्रतिकृती नसून, त्यांच्या पवित्र चरणांवरील वैशिष्ट्यपूर्ण खुणा आणि बारकावे जपणारी त्यांची अस्सल पदचिन्हं आहेत.

प्रत्येक श्रद्धावानाला सद्गुरूंच्या चरणांवर नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेचा अनुभव घेता यावा, यासाठी पंचधातूमध्ये घडवलेली ही पवित्र पदचिन्हं श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे स्थापित करण्यात आली आहेत. येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंतही श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये ही पदचिन्हं आशीर्वादरूपाने श्रद्धावानांसोबत कायम राहतील.

म्हणूनच, ती केवळ पवित्र स्मृतिचिन्हे म्हणून नव्हे, तर सद्गुरूंच्या शाश्वत अस्तित्वाची, कृपेची आणि मार्गदर्शनाची सजीव आठवण म्हणून जपली जातात. त्यामुळे प्रत्येक श्रद्धावानाच्या हृदयात त्यांना एक अत्यंत विशेष स्थान आहे.

याशिवाय, प्रत्येक गुरुवारी श्री हरिगुरुग्राम येथे होणाऱ्या दर्शनाच्या वेळी श्रद्धावानांना बापूंच्या पदचिन्हांचे दर्शन घेण्याची आणि त्यांवर श्री त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हांच्या माळा अर्पण करण्याची आणखी एक संधी मिळते. ही पदचिन्हेही पंचधातूमध्ये घडवलेली आहेत.

श्री त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हांच्या माळेमध्ये तीन वर्तुळं आहेत जी वर्तुळं श्रद्धावानाचे मन, प्राण आणि प्रज्ञा यांचे प्रतिनिधित्व करतात.

जेव्हा श्रद्धावान ही पवित्र माळ पदचिन्हांवर अर्पण करून भक्तिभावाने नतमस्तक होतो, तेव्हा ही कृती संपूर्ण शरणागतीचे प्रतीक बनते. या साध्या, परंतु अत्यंत अर्थपूर्ण कृतीच्या माध्यमातून श्रद्धावान आपले मन, प्राण आणि प्रज्ञा या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे बापूंच्या चरणी अर्पण करतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शनाच्या, संरक्षणाच्या आणि कृपेच्या प्राप्तीची प्रार्थना करतो.

अशा प्रकारे पदचिन्ह हे श्रद्धावानाला आपले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे मूर्त माध्यम बनतात. पदचिन्हांचे दर्शन घेणे, त्यांच्यासमोर नतमस्तक होणे किंवा भक्तिभावाने त्यांची उपासना करणे म्हणजे सद्गुरू अनिरुद्धांची कृपा, मार्गदर्शन आणि निरंतर सान्निध्य प्राप्त करण्यासाठी विनवणी करणे, तसेच सद्‌गुरु अनिरुद्धांशी दिवसेंदिवस अधिक दृढ होत जाणारे नाते जपणे होय.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंची पवित्र पदचिन्हं
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Shraddhavan taking darshan of Sadguru Aniruddha Bapu’s Padachinha
Shraddhavan taking darshan of Sadguru Aniruddha Bapu’s Padachinha
The sacred Padachinha of Sadguru Shree Aniruddha Bapu
The sacred Padachinha of Sadguru Shree Aniruddha Bapu
The sacred Padachinha of Sadguru Shree Aniruddha Bapu
The sacred Padachinha of Sadguru Shree Aniruddha Bapu
The sacred Padachinha of Sadguru Shree Aniruddha Bapu
The sacred Padachinha of Sadguru Shree Aniruddha Bapu
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan
Aniruddha Bapu Padhchinha Darshan