बापूंचे अग्रलेख : मार्गदर्शक दीपस्तंभ
काळाबरोबर सर्वकाही बदलतं, जे बदलत नाही त्याला काळ बदलवून टाकतो. बापूंचे अग्रलेख बदलत्या काळाशी जुळवून घेत पुढे जाण्यास मदत करणारे एक साधन म्हणून कार्य करतात.
अंधारातच घात होतो. आजूबाजूचं परखड वास्तव माहीत नसणं म्हणजेच अंध:कार! दैनिक ‘प्रत्यक्ष’ आणि त्यातील अग्रलेखांच्या माध्यमातून बापूंनी आपल्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आध्यात्मिक गोष्टी वाचकांना आकलन करून देत हा अंध:कार दूर करण्याचा सातत्याने प्रयास केला आहे.
बापूंचे हे अग्रलेख अज्ञानाबरोबरच गैरसमज, अंदाज आणि तर्कवितर्क दूर करतात आणि खालीलप्रमाणे परिवर्तन घडवून आणतात:
- * माहितीचे ज्ञानात रूपांतर
- * स्वप्नाचे वास्तवात रूपांतर
- * दुबळेपणाचे सामर्थ्यात रूपांतर
- * द्वेषाचे सुसंवाद आणि प्रेमात रूपांतर (शिक्षेचे दिक्षेत रूपांतर)
- * अभावाचे वैभवात रूपांतर
- * भयाचे विवेकात रूपांतर
- * जीवनाचे मंदिरात रूपांतर.
पहिला अग्रलेख
‘उद्धरेत् आत्मना आत्मानम्’ (“माझा उद्धार फक्त मीच करू शकतो.”) या शीर्षकाच्या आपल्या पहिल्याच अग्रलेखात बापूंनी ठामपणे सांगितले की, आमच्या स्वत:च्या विकासासाठी जोपर्यंत आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीवर, दुसर्या कुणाच्या मदतीवर, चमत्कारांवर किंवा प्रारब्धावर अवलंबून असतो तोपर्यंत आम्ही आमचे ध्येय कधीच गाठू शकत नाही.
आपल्या अग्रलेखांच्या माध्यमातून बापूंनी सातत्याने अशा समाजाची संकल्पना मांडली आहे, जो अन्यायाकडे मूक प्रेक्षक म्हणून पाहत बसणार नाही आणि भावनांच्या आहारी जाऊन बेफामपणे प्रतिक्रियाही देणार नाही. त्याऐवजी त्यांनी शिस्तबद्ध, जबाबदार आणि निर्धाराने कार्य करणाऱ्या समाजाचा आदर्श आपल्या वाचकांसमोर मांडला आहे.
सद्गुरु अनिरुद्ध बापूंचा पहिला अग्रलेख ‘उद्धरेत् आत्मना आत्मानम्’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
‘तिसरे महायुद्ध’
बापूंच्या सर्वांत महत्त्वपूर्ण अग्रलेखमालिकांपैकी एक म्हणजे तिसऱ्या महायुद्धावरील मालिका. या मालिकेत पहिल्या दोन महायुद्धांचा मागोवा घेण्यात आला आणि तिसऱ्या महायुद्धाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या जगाचे परीक्षण करण्यात आले. सखोल संशोधन आणि चिकित्सक विश्लेषणाच्या आधारे लिहिलेल्या या अग्रलेखांनी केवळ भविष्यातील घटनांचे भाकीत केले नाही, तर उदयास येणाऱ्या जागतिक वास्तवांविषयी सावधगिरीचा इशाराही दिला.
संभाव्य जागतिक संघर्षाचे विध्वंसक परिणाम अधोरेखित करण्याबरोबरच, बापूंनी भारतासमोर असलेल्या धोरणात्मक पर्यायांची आणि त्यांच्या संभाव्य परिणामांची रूपरेषाही मांडली. हे अग्रलेख केवळ धोक्याचा इशारा देण्यापुरते मर्यादित नव्हते. जागतिक संघर्षाचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि अगदी आरोग्याच्या दृष्टीनेही कसा परिणाम होऊ शकतो, हे त्यांनी स्पष्ट केले आणि त्यामुळे वाचकांनी सजग, सज्ज आणि संकटांचा सामना करण्यास (परिस्थितीला सामोरे जाण्यास) सक्षम राहावे, यासाठी या अग्रलेखांनी मार्गदर्शन केले. आपली वैचारिक सखोलता, वस्तुनिष्ठता आणि दूरदृष्टी यासाठी विशेषत्वाने उल्लेखनीय ठरलेल्या या अग्रलेखांनी केवळ सामान्य वाचकांचेच नव्हे, तर जागतिक राजकारणाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तिमत्त्वांचेही लक्ष वेधून घेतले.
समर्थ इतिहास
‘प्रत्यक्ष’मधील बापूंच्या आणखी एका व्यापक आणि प्रशंसनीय अग्रलेखमालिकेचे नाव होते ‘समर्थ इतिहास’. राष्ट्राला आपले भविष्य घडवायचे असेल, तर त्याने आपल्या भूतकाळाचे आकलन करून घेणे आवश्यक आहे, या विचारातून प्रेरित होऊन या लेखमालेद्वारे सम्राट समुद्रगुप्तांच्या कालखंडाच्या माध्यमातून भारतीयांना त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या मुळांशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
समर्थ इतिहास’ ही केवळ गतवैभवाचा गौरव करणारी लेखमाला नव्हती, तर भारताला अभूतपूर्व समृद्धी आणि जागतिक प्रभाव प्राप्त करून देणाऱ्या तत्त्वांचा शोध घेणारी होती. लोककेंद्रित शासनव्यवस्था, धर्माधिष्ठित समाजव्यवस्था आणि सत्तेपेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ स्थान देणारी मूल्यव्यवस्था या तत्त्वांचा सखोल वेध ‘समर्थ इतिहास’ या लेखमालेत घेण्यात आला.
सुंदरकांड
संत तुलसीदासविरचीत रामचरितमानसमधील सुंदरकांडावर आधारित आपल्या ‘तुलसीपत्र’ या अग्रलेखमालिकेतून सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी अधोरेखित केले की, सुंदरकांड हा केवळ पठणाचा भाग नाही, आचरणातून जगण्याचा मार्गदर्शक आहे. शांततापूर्ण, ध्येयपूर्ण आणि समाधानकारक जीवन घडविण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक ज्ञान सुंदरकांडातून प्राप्त होते, हे त्यांनी या लेखमालेतून स्पष्ट केले.
या मालिकेत बापूंनी अग्रलेखांची एक उल्लेखनीय मालिकाही लिहिली, ज्यातून भारताच्या इतिहासासह मानवी इतिहासातील अनेक अज्ञात सत्यं उघडकीस आली. या लेखनातून वाचकांना रूढ इतिहासकथनांमध्ये फारसे आढळून न येणारे विविध दृष्टिकोन या लेखनातून वाचकांसमोर आले. तसेच, ‘सत्य हे अनेकदा कल्पनेपेक्षाही अधिक अनपेक्षित आणि विलक्षण असते’ या शाश्वत सत्याची प्रभावी प्रचितीही या लेखांमधून वाचकांना झाली.
श्री गणपती
विघ्नहर्ता आणि प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी आवर्जून स्मरण केला जाणारा श्रीगणपती हे भक्तांच्या हृदयातील एक विशेष स्थान असलेले आराध्य दैवत आहे. ‘प्रत्यक्ष’मधील अग्रलेखांच्या एका मालिकेतून सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी वेद, पुराणे आणि संतांच्या शिकवणुकीचा आधार घेत गणपतीचे सखोल तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक महत्त्व उलगडले.
अत्यंत सोप्या आणि सुबोध (सहज समजणाऱ्या) भाषेत, बापूंनी गणपतीचे रूप, गुण, पूजन-अर्चन आणि पवित्र कथांमागील व गणेशाच्या स्वरूपामागील प्रतीकात्मकता स्पष्ट केली. सर्वश्रुत परंपरा आणि कथांमागील सखोल तत्त्व उलगडून दाखवत बापूंनी वाचकांना वरवरच्या आकलनापलीकडे जाऊन त्यांचे खरे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्यास मदत केली. या अग्रलेखांनी केवळ भक्ती समृद्ध केली नाही, तर अज्ञान, खोट्या समजुती आणि चुकीच्या कथनांवर मात करून भक्तांना आपल्या श्रद्धेकडे अधिक स्पष्टता, दृढ विश्वास आणि सजगतेने आपल्या श्रद्धेकडे पाहण्याची व ती आचरणात आणण्याची दृष्टी देणारी ठरली.
कथामंजिरी आणि भारताचा इतिहास
सुंदरकांडावरील आपल्या गाजलेल्या अग्रलेख मालिकेनंतर बापूंनी ‘कथामंजिरी’ या विस्तृत लेखमाला सुरू केली. ही लेखमाला चार स्वतंत्र मालिकांमध्ये प्रकाशित झाली. ‘कथामंजिरी’च्या माध्यमातून बापूंनी भारतीय इतिहास, संस्कृती आणि अध्यात्मातील अपरिचित पैलूंचा सखोल वेध घेतला. प्राचीन काळापासून ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंतचा प्रदीर्घ कालखंड व्यापणारे हे कथन त्यांनी वाचकांसमोर प्रभावीपणे मांडले.
‘कथामंजिरी’च्या पहिल्या तीन भागांचा गाभा विजयरुद्र आणि धर्मलेखा जे सम्राट-सम्राज्ञी असूनही स्वयंभगवान त्रिविक्रमाचे नम्र दास म्हणून जीवन जगण्याची निवड करतात, अशा भावनेत आहे. विजयरुद्र हे भारतीय संस्कृतीच्या सुंदर स्वप्नाचे प्रतीक आहेत, तर धर्मलेखा हे त्या स्वप्नाचे तेजस्वी साकार स्वरूप आहे. त्यांचे जीवन भक्ती, धर्म, धैर्य, प्रेम आणि निःस्वार्थ सेवेचे आदर्श उदाहरण ठरते. या कथेद्वारे बापूंनी हे स्पष्ट केले आहे की आध्यात्मिक असो वा ऐहिक, जीवनातील खरे यश हे अढळ भक्तीच्या भक्कम पायावरच उभे असते.
‘कथामंजिरी’चा चौथा भाग राणी लक्ष्मीबाई आणि अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची कथा एका नव्या दृष्टिकोनातून मांडतो. त्यांच्या जीवनातील आणि व्यक्तिमत्त्वातील सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर अज्ञात असलेल्या पैलूंवर या भागात प्रकाश टाकण्यात आला आहे.
या महान व्यक्तिमत्त्वांकडे पाहताना आपल्याला परमभक्तीने ओतप्रोत असे भक्त दिसून येतात, ज्यांनी वरकरणी अजिंक्य आणि दुर्दम्य वाटणाऱ्या संकटांचा सामना केला. त्यांच्या सामर्थ्याचा आणि अढळ निर्धाराचा मूलाधार हीच भक्ती होती, हे या कथांमधून प्रकर्षाने जाणवते.
भक्तिभाव चैतन्य
बापूंच्या अग्रलेखांमधून मांडलेल्या अनेक विषयांपैकी ‘भक्तिभाव चैतन्य’ हा विषय भक्तीचे खरे स्वरूप व सार स्पष्ट करतो.
सद्गुरु बापूंच्या मते, भक्तिभाव चैतन्य म्हणजे स्वयंभगवान त्रिविक्रमांच्या चरणी प्रेमाने स्वतःला समर्पित करून स्वयंभगवानाचे होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे, आपल्याला मार्गदर्शन करत आहे आणि आपली काळजी घेत आहे, या दृढ जाणीवेसह जीवन जगणे.
भक्तिभाव चैतन्य म्हणजे भगवंताचे खरे ज्ञान असलेले भगवत्ज्ञान आणि भगवंताच्या सततच्या अस्तित्वाची जिवंत जाणीव असलेले भगवत्भान यांचा सुरेख संगम होय. हा कठोर नियमांचे पालन करण्याचा किंवा बोजड कर्मकांडांनी युक्त असा मार्ग नसून, प्रेम, नाते आणि समर्पणाचा मार्ग आहे. या मार्गावर भक्ताचा प्रत्येक विचार, शब्द आणि कृती भक्तिभावातूनच उदयास येते.
बापू स्पष्ट करतात की, स्वयंभगवान त्रिविक्रमांच्या मंत्रगजरातून आणि भक्तिभाव चैतन्यात रुजलेल्या जीवनातून श्रद्धावानाला हळूहळू अधिक परिपूर्णता, आंतरिक सौंदर्य आणि भगवंताशी अधिकाधिक दृढ होत जाणाऱ्या नात्याचा अनुभव येतो. आपल्या प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणातून उमटणाऱ्या मनःपूर्वक हाकेला भगवंत असीम प्रेमाने आणि करुणेने प्रतिसाद देतो.
पिढ्यान्पिढ्यांना मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणा देणारे बापूंचे अग्रलेख
दोन दशकांहून अधिक काळ, सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या अग्रलेखांनी पत्रकारितेच्या पारंपरिक सीमांपलीकडे जाऊन आपला प्रभाव निर्माण केला आहे. वर उल्लेख केलेले अग्रलेख हे जागतिक राजकारण, सांस्कृतिक इतिहास, अध्यात्म आणि वैयक्तिक उत्कर्ष यांसारख्या विषयांवरून ते संगणक साक्षरतेसारख्या विविध विषयांपर्यंत पसरलेल्या हजारो लेखनाचा केवळ एक छोटीशी झलक आहे., वन्यजीव संवर्धनप्रेमी आणि निसर्गप्रेमी स्टीव्ह आयर्विन यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनकार्याचे केलेले कौतुक, भारत-रशिया संबंधांचे धोरणात्मक महत्त्व आणि त्यांची आवश्यकता तसेच इतर अनेक भक्तिपर, सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील असंख्य विषयांचाही त्यांनी आपल्या संपादकीयांमधून वेध घेतला. अनेकांनी दुर्लक्षित केलेल्या, नजरेआड केलेल्या किंवा हाताळण्यास संकोच केलेल्या विषयांनाही बापूंनी स्पर्श केला; आणि त्यामागे एकच उद्देश होता — वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील वास्तवांना सामोरे जाण्यासाठी समाजाला सज्ज करणे.
समाजाच्या, विशेषतः सामान्य माणसाच्या कल्याणाचा आणि हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या अग्रलेखांनी वाचकांना ज्ञान देण्याबरोबरच त्यांना सक्षम करण्याचे कार्य केले आहे.
जेव्हा सतर्क राहण्याची गरज होती तेव्हा बापूंनी सावध केले; जेव्हा स्पष्टतेचा अभाव होता तेव्हा त्यांनीच मार्गदर्शन केले; जिथे स्मरणशक्ती धूसर झाली होती, तिथे भूतकाळाची आठवण करून दिली; आणि जिथे भक्तीची ज्योत मंदावली होती, तिथे ती पुन्हा प्रज्वलित केली.
