












'श्री अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवा'च्या दुसऱ्या दिवशी, प्रत्येक अधिकृत 'सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्रा'ला 'चिन्मय पादुका' सन्मानपूर्वक प्रदान केल्या जातात. ज्या 'प्रायोगिक उपासना केंद्रां'ना अधिकृत उपासना केंद्रांचा दर्जा प्राप्त झाला आहे, त्यांनाही या चिन्मय पादुका दिल्या जातात.
नव्याने मान्यता मिळालेल्या उपासना केंद्रांसाठी चिन्मय पादुका प्राप्त होणे म्हणजे केवळ एक औपचारिक मान्यता नाही, तर त्या पवित्र पादुकांच्या माध्यमातून उपासना केंद्रात सद्गुरूंच्या जिवंत अस्तित्वाचा अनुभव घेण्याचा आनंददायी क्षण असतो.
प्रत्येक उपासना केंद्राला प्रदान करण्यात आलेल्या चिन्मय पादुका या 'श्री कृपाचैतन्य पादुकां'च्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या असतात. 'कृपाचैतन्य पादुका' म्हणजे दुसरं काही नसून साक्षात सद्गुरु श्री अनिरुद्धच; त्यांचा आत्मा व संपूर्ण अनिरुद्धमय स्वरूप आहे.
आज, भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्रे कार्यरत आहेत. प्रत्येक शनिवारी, या चिन्मय पादुका अत्यंत भक्तीभावाने उपासना केंद्रावर आणल्या जातात आणि त्यांच्या उपस्थितीत सामूहिक उपासना केली जाते. एकत्रितपणे प्रार्थना केल्यामुळे, श्रद्धावानांना सामूहिक स्वरूपात भक्तीभाव चैतन्य अनुभवता येते. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या चिन्मय पादुकांच्या उपस्थितीमुळे आपल्याला सद्गुरूंच्या सान्निध्याची अनुभूती मिळते, अशी श्रद्धावानांची दृढ भावना आहे.
श्रद्धावान या पादुका आपल्या घरी नेऊन 'पादुका पूजन'ही करतात. चिन्मय पादुकांचे आगमन होताना प्रत्यक्ष सद्गुरु बापू बरोबर असल्याची भावना श्रद्धावानांच्या हृदयात असते. त्यामुळे श्रद्धावानांचे मन भक्तीभाव चैतन्याने भरून येते. भक्त कधीही "पादुका आल्या" असे म्हणत नाहीत; तर प्रेमापोटी ते केवळ असे म्हणतात की,
"बापूच आमच्या घरी आले आहेत" किंवा "बापूच आमच्या उपासना केंद्रावर आले आहेत.














