अध्यात्मात गुरुंची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

‘सद्‍गुरुवाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी’

असे विश्वगुरु संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात स्पष्टपणे सांगतात.

‘श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ....’

ह्या शब्दांत संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी श्रीहनुमान चलिसाची सुरुवात करतात.

गुरुंच्या चरणांचा महिमा सुव्यवस्थितपणे सांगणाऱ‍या या ओळीबद्दल सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापू त्यांच्या दिनांक १६ जून २०११ रोजीच्या प्रवचनात म्हणाले -

‘सद्‍गुरुचरणांच्या धुळीने माझ्या मनरूपी आरशाला मी स्वच्छ करतो. हृदयात सद्‍गुरुंचे चरण असतील, तर मनाचा आरसा कितीही मलीन असला, तरी तो स्वच्छ होतोच.’

स्वत: भगवान शिव ‘गुरुगीते’मध्ये माता पार्वतीस गुरुचरणांचा महिमा कथन करतात -

‘सप्तसागरपर्यन्ततीर्थस्नानादिकं फलम् । गुरोरंघ्रिपयोबिन्दुसहस्रांशे न दुर्लभम् ॥’

अर्थात् सातही सागरांपर्यंतच्या समस्त तीर्थांमध्ये स्नान आदि केल्याने जे फल मिलते, ते समस्त पुण्यफल गुरुंच्या चरणतीर्थाच्या एका बिंदूच्या हजाराव्या अंशापुढेही काहीच नाही. गुरुंच्या चरणतीर्थातील एका बिंदूच्या हजाराव्या अंशाची प्राप्ती होण्याचे पुण्यफल अतुलनीय आहे, असा गुरुचरणतीर्थाचा महिमा आहे.

संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी विरचित ‘श्रीरामचरितमानस’च्या ‘अरण्यकाण्डा’मध्ये स्वत: श्रीरामभद्र शबरीस नवधा भक्तीचा म्हणजेच नऊ प्रकारच्या भक्तीचा उपदेश करतात. त्यासमयी ते म्हणतात -

‘गुर पद पंकज सेवा तीसरि भगति अमान।’

अर्थात् ‘अहंकाररहित होऊन सद्‍गुरुंच्या चरणकमलांची सेवा करणे’ ही तिसरी भक्ति आहे.

श्रीमद्भागवत महापुराणातील स्कंध ११ अध्याय १७ श्लोक २७ मध्ये भगवान श्रीकृष्ण गुरुमहिमा वर्णन करताना ‘सर्वदेवमयो गुरु:’ असे उद्धवास सांगतात -

‘आचार्यं मा विजानीयात् नावमन्येत कर्हिचित्। न मर्त्यबुद्धयाऽसूयेत सर्वदेवमयो गुरु:॥’

अर्थात् ‘गुरुंना माझेच स्वरूप समजावे. कधीही त्यांचा अपमान करू नये आणि त्यांना एक सामान्य माणूस (मर्त्यबुद्धी) समजून त्यांच्यामध्ये दोष काढू नये, तसेच त्यांचा द्वेष (असूया) करू नये. गुरुदेव हे सर्वदेवमय असतात.’

ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुंच्या चरणी शरण जाण्याचा निर्देश मुण्डक उपनिषदामध्ये केला आहे.

‘तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत्समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्।’

अर्थात् ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी शिष्याने विनम्र होऊन पूर्ण समर्पित भावाने गुरुंच्या चरणी शरण जावे.

गुरुचरणांना वन्दन करताना गुरुगीतेत म्हटले आहे -

वन्दे गुरुपदद्वंद्वं वाङ्मनश्चित्तगोचरम्। श्वेतरक्तप्रभाभिन्नं शिवशक्त्यात्मकं परम्॥

वाचा, मन व चित्त ह्यांनी आकलन होणाऱ‍या श्रीगुरुंच्या दोन्ही चरणांना मी वंदन करतो. श्रीगुरुंचे दोन्ही चरण शिव व शक्ती ह्यांचे स्वरूप असून ते अनुक्रमे श्वेत (शुभ्र धवल) व रक्त (लाल) अशा भिन्न प्रभेने युक्त आहेत.

‘कृष्णं वन्दे जगद्‍गुरुम् ’ ह्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना ‘जगद्‍गुरु’ म्हणून वंदन केले आहे. ‘युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा केली गेली’ असे आम्ही महाभारतात वाचतो.

तत्पादाववनिज्याप: शिरसा लोकपावनी: । सभार्य: सानुजामात्य: सकुटुम्बो वहन्मुदा ॥’

ह्या श्रीमद्‍भागवत महापुराणातील श्लोकात (१०/७४/२७) स्पष्टपणे सांगितले आहे की भगवान श्रीकृष्णाच्या चरणांची पांडवांनी पूजा केली.

अत्यंत आनंदाने आणि आदराने श्रीकृष्णांचे दोन्ही चरण धुतले आणि संपूर्ण जगाला पवित्र करणारे ते चरणामृत अत्यंत आनंदाने आपल्या मस्तकावर धारण केले.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे पवित्र चरण

चरणकमलांचा स्पर्श

सद्‍गुरुंच्या चरणांवर आम्ही आमचे मस्तक ठेवून सद्‍गुरुंना वंदन करतो. दोन भुवया जेथे एकत्र येतात, ते मस्तकावरील स्थान हे आमच्या प्राणमय देहातील आज्ञा चक्राशी संबंधित आहे. मानवाचे आज्ञा चक्र हे बाह्य स्पंदने, ऊर्जा स्वीकारण्याचे कार्य करते, जणू ते एका ग्रहणकेन्द्राप्रमाणे म्हणजे रिसिव्हिंग स्टेशनप्रमाणे कार्य करते. जेव्हा भक्त सद्‍गुरुंच्या चरणांवर किंवा पादुकांवर मस्तक टेकवतो, तेव्हा सद्‍गुरुंच्या चरणांमधून, पादुकांमधून प्रवाहित होणारी स्पंदने तो सहजपणे ग्रहण करू शकतो आणि म्हणूनच आम्ही चुकीच्या ठिकाणी वंदन करता कामा नये.

बापूंनी अनेक वेळा सांगितले आहे की ‘एखाद्या स्थानाबद्दल सुस्पष्ट माहिती नसताना, जर त्या स्थानी वंदन करण्याची वेळ आली, तर त्या स्थानी वंदन करताना आपल्या इष्टदैवताचे, सद्‍गुरुंचे स्मरण करून, ‘मी त्यांना वंदन करत आहे’ हा भाव मनात धरून त्या स्थानी वंदन करावे म्हणजे ते वंदन त्या स्थानास, तेथील व्यक्तीस केलेले वंदन न ठरता ते वंदन सद्‍गुरुतत्त्वच स्वीकारते.’

श्री हरिगुरुग्राम येथील चरणमुद्रा

आणि म्हणूनच सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणी श्रद्धावान नतमस्तक होतात. बापूंच्या प्रवचनांच्या सुरुवातीच्या काळात श्रद्धावान प्रेमाने, आदराने बापूंच्या पायांवर मस्तक ठेवून बापूंना वंदन करत असत. काही काळाने प्रवचनास येणाऱ‍यांची संख्या वाढल्यावर सर्वांना सद्‍गुरुंचा चरणस्पर्श मिळावा यासाठी सद्‍गुरुंच्या पायाला हात लावून सद्‍गुरुंना वंदन केले जाऊ लागले.

पुढे ‘श्रीहरिगुरुग्राम’ येथे बापूंच्या प्रवचनास येणाऱ‍यांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसे सद्‍गुरुंच्या चरणांना प्रत्यक्ष स्पर्श करून वंदन करणे शक्य नसल्याने सद्‍गुरुंना काही अंतरावरून वंदन केले जाऊ लागले आणि श्रद्धावानांना सद्‍गुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवून वंदन करता यावे ह्यासाठी ‘श्रीहरिगुरुग्राम’ येथे सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणमुद्रा दर्शनसाठी ठेवण्यात येऊ लागल्या.

ह्या सद्‍गुरु-चरणमुद्रांवर श्रद्धावान अत्यंत प्रेमाने ‘त्रिपुरारि त्रिविक्रम चिह्नां’च्या माळा अर्पण करतात. आमच्या मन, प्राण आणि प्रज्ञा यांवर सद्‍गुरुंच्या चरणांची मुद्रा उमटावी ह्या प्रार्थनेसह श्रद्धावान ह्या माळा अर्पण करतात. श्रद्धावान जणू मन-प्राण-प्रज्ञारूपी त्रिदल बिल्वपत्रच ज्ञानाचा उपदेष्टा असणाऱ‍या सद्‍गुरुंच्या चरणी अर्पण करतात.

पिसांनी त्यांच्या भक्तिरचनेत म्हटले आहेच -

‘मनः प्राणः प्रज्ञा माझे त्रिदल बिल्वपत्र।’

‘जीव लावलासी इतुका, जाहलो मी वेडापिसा । पाहिले त्या बिल्वपत्री, उमटला तुझा ठसा ॥’

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणांचे वर्णन करताना आद्यपिपा म्हणतात - ‘देख चरण सुमंगलमूला’ म्हणजेच ‘त्या चरणांकडे पहा, जे सुमांगल्याचे म्हणजेच सुख-सौभाग्याचे, शुभाचे, कल्याणाचे मूळ आहेत.’ आमच्या जीवनात सर्व काही मंगलमय होण्यासाठी सद्‍गुरुंच्या चरणांचे रूपध्यान करणे आवश्यक असल्याचे आद्यपिपांच्या ह्या ओळीद्वारे आमच्या लक्षात येते.

सर्व मंगलाचे उगमस्थान

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणांचे वर्णन करताना आद्यपिपा म्हणतात:

देख चरण सुमंगलमूला’

“Dekh Charan Sumangalamula,”

म्हणजेच ‘त्या चरणांकडे पहा, जे सुमांगल्याचे म्हणजेच सुख-सौभाग्याचे, शुभाचे, कल्याणाचे मूळ आहेत.’

आमच्या जीवनात सर्व काही मंगलमय होण्यासाठी सद्‍गुरुंच्या चरणांचे रूपध्यान करणे आवश्यक असल्याचे आद्यपिपांच्या ह्या ओळीद्वारे आमच्या लक्षात येते.

‘सद्‍गुरुंच्या चरणांना हृदयी स्थापन कसे करावे’ ह्याचे वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ‘ज्ञानेश्वरी’च्या पंधराव्या अध्यायात करताना म्हणतात:

‘आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरुंचीं ॥’

“Ata Hriday He Apule |
Chauphaluniya Bhale |
Vari Baisau Paule |
Shrigurunchi ||”

‘आपल्या हृदयाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरुंच्या पावलांची स्थापना करावी’ असे ते सांगत आहेत.

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे पाद्यपूजन करताना पूज्य समीरदादा

ललकारी आणि चरणधूळ

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध त्यांच्या पंचगुरुंच्या चरणी अनन्यशरण आहेतच आणि अशा सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणी नतमस्तक होताना श्रद्धावान अत्यंत प्रेमाने, भक्तिभावाने आपल्या सद्‍गुरुंची ललकारी देताना म्हणतात:

अनन्यप्रेमस्वरूप दत्तभक्तचूडामणि चरणाश्रितत्रितापहर महापापविमोचक सर्वपुरुषार्थप्रदायक शान्तिसिंहासनस्थ सद्‍गुरु श्रीअनिरुद्धसिंह की जय।

सद्‍गुरुंचे चरण माझ्या जीवनात सर्व काही मंगलमय करण्यास, माझा उद्धार करण्यास समर्थ आहेतच, हाच श्रद्धावानाचा विश्वास असतो आणि अशा चरणांची चरणधूळ अत्यंत प्रिय असणाऱ‍या श्रद्धावानाचा ध्यास असतो:

‘बापु चरणधूली मोहे अतिप्रेमा । तन मन धन सेवा द्रिढ़ नेमा ॥’

Sadguru Aniruddha Bapu immersed in the Bhakti of Dattaguru
श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथे सद्गुरु अनिरुद्ध बापू
Sadguru Shree Aniruddha Bapu's Lotus feet (Charan)