॥ हरि ॐ ॥
ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम: ह्या आदिमातेची सूत्रं आपण पाहिली, मंगलचिन्हं पाहिली, मंगलचिन्हाच्या खुणा बघत चाललो आहोत. स्वस्तिक, सूर्य-चंद्र, दीप. आज आपल्याला अनोखं शुभचिन्ह पहायचं आहे ते आपण सगळीकडे पाहतो. हे सॄष्टीतही आपण बघतो. हे चिन्ह आपल्याला स्पष्टपणे दाखवतं तुम्ही कुठे आहात, तुम्हाला कुठे जायचं आहे. आदिमाता चण्डिका, महाविष्णु, लक्ष्मी, शिवगंगागौरी, ...