|| हरी ॐ ||
श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती संदर्भातील काही शंकांचे निरसन परम पूज्य बापूंनी ६ जानेवारी रोजी प्रवचनात केले होते. १३ जानेवारी रोजी झालेल्या प्रवचनाच्या आधी देखील परम पूज्य बापूंनी श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती संदर्भात काही प्रश्नांचे निरसन केले.
आज परत काही प्रश्न बघायचे आहेत.
१) उडदाची डाळ चिकट असते तर सांबर कसे करायचे? नारळ सुका घालयचा की ओला?
-- खर सांगायचे झाले तर उडदाची आमटी हा नवरात्रातला common पदार्थ आहे. सांबर म्हणजे ज्यात विविध भाज्या घातल्या आहेत अशी तिखट आंबट गोड आमटी. ह्यात नारळ सुका आणि ओला दोन्ही चालेल.
उडदाच्या सांबराची एक रेसिपी परम पूज्य नंदाआईने सांगितली आहे.
रेसिपी : उडदाची डाळ पातेल्यात तेलात परतायची आणि लालसर झाली की पाणी घालायचे, ह्यामुळे चिकट पणा येत नाही. डाळ शिजवून पाणी उरले पाहिजे. (कुकरच्या ३ शिट्या करायच्या) ह्यात जे पाणी उरते ते नंतर आमटीसाठी वापरायचे.
उडदाची आमटी ही माझी (परम पूज्य बापू) सगळ्यात आवडती आमटी आहे. अतिशय चविष्ट पदार्थ आहे. उडीद म्हणजे उष्ण स्निग्ध, गुरु पदार्थ ,मनाला बुद्धीला ताजेतवाने व शांत करणारा पदार्थ. प्रत्येक अवयवाला पुष्टी देणारा असा हा उडीद म्हणूनच सगळ्यात पावन पदार्थ आहे.
ह्या उडदाच्या सांबारात कुठलाही सांबर मसाला घातला तरी चालेल. कांदा-लसूण वापरू शकता. हे सांबर पोळी, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकता.(सर्व प्रकारच्या) इडली डोश्यासोबत खाल्ले तरी चालेल. जास्त करून तांदूळ, गव्हाचा वापर करा. हे खाल्यावर कळेल की पोटाला किती फ्रेश वाटते!! ह्यातील सगळे पदार्थ हे सम्यक उर्जा निर्माण करणारे आहेत.
प्रपत्ती करताना दुसर्यांच्या चुका काढत बसू नका. जी basic माहिती आहे त्यानुसार जल्लोषाने व समाधानाने प्रपत्ती साजरी करा.जर प्रपत्ती करताना काही चूक झालीच त्यासाठी तुमची आई समर्थ आहे.
हळद - कुंकू ह्यांचे विसर्जन करायचे.
तांदूळ- गहू प्रत्येकीने वाटून घ्यायचे व घरी घेवून जायचे. एक दाणा मिळाला की शंभर दाणे सारं तेवढंच महत्वाचं.
आता
ॐ मन्त्राय नमः
आपण बघत होतो सर्व बाधा प्रशमनम. ह्या आधी आपण वैखरी देवी व श्री गुरुकेंद्र बघितले. आज बंधन बाधा बघायची आहे .बंधन म्हणजे क्रियेला, गतीला अटकाव. जे करायचे आहे ते करायला न मिळणे म्हणजे बंधन.
घरी उशिरा न येणे, खोटे न बोलणे ही negative वाटत असली तरी चांगली बंधने आहेत.
बंधन बाधा ही दोन प्रकारची आहे -
१) स्व- कृत २) पर- कृत
तुमच्या प्रगतीच्या आड तुम्ही स्वतः येता म्हणजेच आपल्या दुर्गुणांमुळे जे काही आपण करून बसतो ते स्व-कृत बंधन. ही बाधा प्रयत्न्यपूर्वक दूर करावी लागते आणि यासाठी गुरूक्षेत्रम मंत्रच धावून येणार .
२) पर-कृत बंधन बाधा ह्याचे दोन प्रकार आहेत.
१) भौतिक - तुम्हाला चुकीचा सल्ला मिळणे, मुलगा-आईमध्ये, नवरा-बायकोत भांडण उत्पन्न होणे ही भौतिक बाधा आहे. याचबरोबर आपला सहकारी किवा शेजारी निंदा करतो तेव्हा देखिल भौतिक बाधा बंधन उत्पन्न होते.
२) अ-भौतिक - अ-भौतिक म्हटले की पहिल्यांदा जारण-मारण असेच विचार मनात येतात. ह्या गोष्टीच्या विचारात पण कधी अडकू नका. अश्या गोष्टींचे bacteria (विषाणू) कुठले ह्याच्याशी आपला संबंध नाही. आपल्याला हे bacteria कसे शरीरात घुसतात व त्यावर लस कोणती हे बघायचे आहे .
जेव्हा परीक्षेला एखादी कविता यायची असेल तर आपण ती सतत वाचतो, गुण गुणतो. पण परीक्षा झाल्यावर ती कविता आठवतही नाही. पण तेव्हा महिनाभर न ऐकलेले पिक्चरचे गाणे मात्र आपोआप आठवते. असे stop आणि start चे बटन हीच मनाची ताकद. आजचा प्रत्यक्षचा अग्रलेख ह्या वरच होता श्रेयस आणि प्रेयस. तुमच्या मनाला कायम प्रेयसाची ओढ तर बुद्धीला श्रेयसची ओढ असते.
आपली बुद्धीचे काम कुठपर्यंत ते मन ठरवते, काम झाले की मन आवडीच्या गोष्टींकडे वळत असते. बुद्धी कधी भ्रष्ट होत नाही मन भ्रष्ट होत असते. मनाच्याच साहाय्याने बंधनात अडकायला होते तर मनाच्याच साहाय्याने बंधनांतून बाहेर पडता येते.
मनाचे भाग ३ आहेत -
१) जागृत- बाह्य मन (conscious mind )
२) अजागृत - आंतर मन (sub conscious mind )
३) संक्षिप्त मन (interceptive mind )
बाह्य मन हे ज्ञानेन्द्रीयांशी जोडलेले पूर्ण पणे स्वतंत्र असते. तर आंतर मन हे आंधळे असते. हे केवळ बाह्य मनाच्या सहाय्यानेच बघू शकते . तरीही हे सगळ्यात सशक्त आहे कारण हे फार व्यापक आहे. म्हणूनच आंतर मन सगळ्यात प्रभावी ठरते. ह्या मनाला feed back बाह्य मनाकडून मिळत असतो. तर संक्षिप्त मन हे आंधळे असते व पांगळेही. जागृत व अजागृत मन ह्यांच्यामधला एक अतिशय सुंदर common point म्हणजे संक्षिप्त मन.
ज्यांची तुमचे वाईट व्हावे अशी इच्छा असते ती मंडळी तुमच्या कडची दैवी उपासना खंडित करण्यासाठी तुमच्या वैखरी देवीचे केंद्र व तुमचे श्रीगुरु केंद्र ह्या दोन केंद्रांचा तुमच्या संक्षिप्त मनाशी असणारा संबंध तोडण्यासाठी प्रयत्नशील असतात.
सदगुरू हा तुमच्या संक्षिप्त मनाचा रखवाला असतो. तुमच्या संक्षिप्त मनाचा राखणदार हेच सद्गुरूंचे प्रमुख कार्य असते.
जेव्हा तुम्ही सद्गुरुंपासून दूर जाता तेव्हा तुमचे संक्षिप्त मन कुठल्याही हल्ल्याला बळी पडु शकते. मग दुर्बळ संक्षिप्त मन चुकीच्या गोष्ठी स्विकारते. तुम्ही तुमचीच ताकद विसरून जाता, हीच बंधन बाधा .
म्हणूनच आमचे संक्षिप्त मन हे सदगुरूद्वारीचा श्वान झाले पाहिजे. कुत्रा हा नेहमी त्याच्या मालकाशी प्रमाणिक असतो, उपाशी असेल तरी तो त्याच्या मालकाने दिलेलेच अन्न खातो. आम्ही कितीही चुकलो तरी आमचे संक्षिप्त मन आम्हाला सद्गुरुंच्या ताब्यात देता आले पाहिजे. सद्गुरु त्यावर कसे कार्य करतात हे मी इथे सांगणार नाही.
आमचे सक्षिप्त मन सद्गुरुंच्या ताब्यात देण्यासाठी काय करावे लागते तर वावर, वापर अणि सवांद .
१) वावर म्हणजे जिथे जिथे मी जातो तिथे तिथे प्रथम सद्गुरु स्मरण मला करता आले पाहिजे .
२) वापर म्हणजे जी गोष्ट आम्ही वापरतो, कुठलीही नविन गोष्ट विकत आणली की प्रथम सद्गुरूस अर्पण करून मग ती वापरावी .
३) परंतु यात नवीन लग्न झालेल्यांनी आपली पत्नी अर्पण करतो असे म्हणण्याचे चाळे करू नका. तर सद्गुरुराया तुझ्या कृपेने मला चांगला/चांगली जोडीदार लाभला/लाभली हा भाव असावा.
३) संवाद - मला माझ्या सद्गुरुंशी कायम संवाद साधता आला पहिजे. मनात राग आला तर सद्गुरुंशी बोलू लागा. आपोआप क्रोध शांत होईल. व्यवहाराच्यावेळी सद्गुरुंचे स्मरण केले तर कधीच फसगत होणार नाही.
आमच्या वावर, वापर व संवादात सद्गुरु नाम आले की आपोआप संक्षिप्त मन समर्थ होणारच.
मन बुद्धि व शरीर ह्यांचे कार्य ह्या वावर, वापर, संवादामधुनच बनते म्हणुनच तुमचा वावर, वापर व संवाद नेहमी श्री गुरुंच्या ताब्यात असू दे, मग तुमच्या सुखाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही .
|| हरी ॐ ||