!! हरि ॐ!!
‘ॐ मंत्राय नम:’ गुरुक्षेत्रम् मंत्राविषयी बघत आपण पुढे चाललो आहोत. १३ पदांचा हा मंत्र आहे. १३ हा अतिशय शुभ अंक आहे. माझा (परमपूज्य बापू) आणि नंदाचा विवाह १३ मे ह्याचदिवशी झाला. पौरसचा जन्म ही १३ एप्रिलचाच. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रही १३ आकडी. १३ अंक हा कधीच अशुभ होऊ शकत नाही. श्रद्धावंतांसाठी अतिशय लकी आकडा आहे.
गुरुक्षेत्रम्मंत्राच्या १३ पदांपैकी पहिले पद आपण बघितले, ‘सर्वबाधाप्रशमनं’ प्रत्यक्षच्या अग्रलेखांमधून चण्डिका कुल समजून घेतले, त्यांची स्कंदातील स्थाने बघितली.
गुरुक्षेत्रम् मंत्रातील पहिले पद ‘सर्वबाधाप्रशमनं’ व त्यापुढे ‘सर्वपापप्रशमनं’ व ‘सर्वकोपप्रशमनं’ ही पदे येतात. हे आधीच लक्षात ठेवून मी (परमपूज्य बापू) काही महिन्यांपूर्वीच कामाला लागलो व माझ्या १०८ मेकअपमनना पण कामाला लावले. माझे मेकअपमन कुठल्या रुपात तुमच्या समोर येतील तुम्हांला कळणारही नाही, त्यांनी मग सगळीकडे जाऊन बघितले कोण गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणतो, कोण दुसर्यांनी केलेल्या लड्या स्वत:च्या नावावर जमा करतो. हे सगळं बघितल्यावर माझ्या लक्षांत आलं की, माझ्यावर प्रेम करणार्या श्रद्धावंताच्या उपासना नीट होत नाहीत. कायिक, वाचिक, मानसिक अनेक चुका त्यांच्याकडून घडत आहेत. मग मी (परमपूज्य बापू) विचार केला की, माझं ह्या गुरुमंत्रासोबत असणारे अभयवचन खरं ठरावं, ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्रिपुरारि पौर्णिमेला किरातरुद्र येणार आहे, मग त्यासाठी माझ्या बाळांची तयारी कितपत आहे, हे आवश्यक आहे.
ह्यासाठी मी (परमपूज्य बापू) अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, प्रत्येकाने ‘श्रीराम’ म्हणा.
ह्या अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शुभंकरा नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत मी स्वत: माझ्या माय चण्डिकेची घोर तपश्चर्या करणार आहे. कारण, माझ्यावर प्रेम करणार्या श्रद्धावंताच्या चुका, पापे जास्तीत जास्त dilute करुन, त्यांना क्षमा मिळावी, अशी माझी इच्छा आहे. यासाठी माझ्या आईची उपासना करुन गुरुक्षेत्रम् मंत्राचे सामर्थ्य प्रत्येकाला प्राप्त होईल, अशी यंत्रणा निर्माण करणार आहे.
!! हरि ॐ!!