|| हरी ॐ ||
" ॐ ऎं ह्रीं क्लीं सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं - श्रीगुरुक्षेत्रम् "
गेल्या वेळेला आपण बघितले गुरु म्हणजे काय? अनेक ग्रंथातून गुरुबद्दल सांगितले जाते. गुरु आज्ञापालन वगैरॆ माहीत असते पण तो जो खराखुरा एकमेव सद्गुरु आहे तो ओळखायचा कसा?
आपल्याला माहिती आहे ह्या विश्वाची निर्मिती त्या आदिमातेकडून झाली आहे. तिचे तीन पुत्र मोठा दत्तात्रेय, मधला किरातरुद्र व धाकटा परमात्मा. ह्या चण्डिकाकुलाच्या रचनेत एक महत्त्वाचे principal आहे. हा जो सगळ्यात छोटा महाविष्णु व मधला किरातरुद्र आहे ह्या दोघांसाठी दत्तात्रेय हे गुरु आहेत. दत्तात्रेयांनी २४ गुरु केले. त्यांची आई चण्डिका ही देखील त्यांना गुरु आहेच. चण्डिकेलाच महागुरु हे नाव आहे कारण ती दत्तात्रेयांची गुरु आहे. तिचे गुरु म्हणजे निर्गुण निराकार दत्तगुरू, ज्याला तुम्ही अत्रि म्हणा, सवितृ म्हणा तो एकच आहे. असे हे चण्डिकाकुल पुर्णपणे गुरुत्वाच्या नात्याने बांधले गेले आहे. व हे सगळे चण्डिका कुल मानवाच्या पातळीवर कोण आणते तर तो एकमेव परमात्मा.
आता तुम्ही म्हणाल तो एकच कसे म्हणता?, अत्रि - अनसूया हे पण मानवी देह धारण करून आले होते. किरातरुद्र व शिवगंगागौरी हेदेखील माता रेणुका व जमदग्नीचा अवतार घेऊन आले होते मग एकच असे कसे म्हणता? अत्री अनसूयेने दैवी गुण बाजूला ठेवून पूर्ण मानवी जीवन स्वीकारले होते मग हा एकच कसा काय?असा प्रश्न पडला पाहिजे.
जी आदिमाता सूक्ष्मरुपाने येते लढते, कार्य करते तीच अनसूया रूपाने येते तेव्हा काय करते? बाळाला जन्म देते अत्रि अनसूया त्या बाळाचे संगोपन करतात, पूर्ण मानवी जीवन जगतात, पुढे शेवटी काय होते आम्हांला माहीत नाही, ते निघून गेले. रेणुका जमदग्नीच्या रुपात पण जमदग्नीच्या मृत्यूनंतर रेणुका सती जाते ही पुढची पातळी आहे.
ह्यात एक लक्षात घ्या... ही जी काही सगळी रूपे पृथ्वीवर मानवाप्रमाणे वावरली. त्यांना कर्माचा अटळ सिध्दांत लागू नव्हता. कर्माचा अटळ सिध्दांत स्वीकारला की परत परत जन्म घ्यावा लागतो.
हा अटळ सिध्दांत जर त्यांनी स्वीकारला, ही जबाबदारी त्यांनी घेतली तर चण्डिकाकुलाचे कार्य असंतु्लित होईल, हे योग्य नाही. कर्माच्या अटळ सिध्दांतानुसार स्वत:ला जो बांधून घेतो तो हा एकच...
रामाने झाडाआडून वालीला बाण मारला ह्याचे पाप जराही लागत नसतानादेखील तोच पुढे कृष्ण जन्मात त्या वालीचा दुसरा जन्म असणार्या व्याध्याकडून मारलेल्या बाणामुळे मृत्यू स्वीकारतो .
हया चण्डिकाकुलातील senior मंडळी व junior most मध्ये फरक आहे. कर्माच्या अटळ सिध्दांतात तो स्वत:ला बांधून का घेतो? तुमच्यासाठी... म्हणूनच तो परत परत येत असतो.
परित्राणायं च साधुनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगेयुगे ॥
हे त्याच्या अवताराचे ब्रीद असते, नाहीतर त्याला यायला कारणच उरणार नाही. अमक्या अमक्या ऋषीने शाप दिला म्हणून त्याला परत जन्म घ्यावा लागला ह्या गोष्टी पूर्णत: चुकीच्या आहेत. कुठल्याही ऋषीची ही ताकद नाही.
वेदांमधील शाप देणारा दुर्वास व अनसूयेचा पुत्र दुर्वास हा वेगळा आहे. ह्यांच्या जन्मात ६ ते ७ हजार वर्षाचे अंतर आहे. हा दुर्वासाचा शाप स्वत: स्वीकारून गर्भवास भोगायला तयार असतो. तो शाप स्वत: वर घेउनही तो येतोच.
का? कारण शापाचे प्रयोजन करताना एक गोष्ट करायची असते त्यात मग अजुन ४-५ ऋषींचे भलेच आहे म्हणून. तो अंबरीषाचा शाप स्वीकारतो.
तो जोपर्यंत स्वत:ला कर्माच्या अटळ सिध्दांताशी बांधून घेत नाही तोपर्यंत मानवाला त्याच्याशी बांधून घेता येत नाही. त्याचं गणित वेगळं असते. ते २+२=४ नसते. कर्माच्या अटळ सिद्धांताने बांधला न गेलेला अशी त्याची अवस्था म्हणजे भर्गलोकातील अवस्था. ह्या अवस्थेत असताना भक्त जे काही देतो ते स्वीकारलं की मग तो पाहिजे तर जास्त देऊ शकतो किंवा कमी देऊ शकतो. भर्गलोकात असताना तो न्यायी असतो पण जेव्हा तो कर्माच्या अटळ सिद्धांताने तो बांधुन घेऊन येतो तेव्हा तो एकपट घेतो व दसपट देतो. व्यवहार हा एकच पातळीवर चालतो. मनुष्यने १ ग्रॅम भक्ती दिली तर तो १० ग्रॅम देतो . ह्यातील ९ ग्रॅम त्या मनुष्याच्या account वर कर्ज म्हणुन जमा होतात व हे कर्ज तो फेड म्हणुन पण सांगत नाही.
कर्माच्या अटळ सिध्दांताने बांधुन घेतल्यामुळे जमा होणार्या कर्जासाठी तो परत परत येतो.
समजा X ने Y कडुन कर्ज घेतले आहे व ते फॆडले नाही तर Y काय करणार? X वर कर्ज आहे म्हणून म्हणुन परत परत येणार. आलं लक्षात.
तुम्ही कर्ज फेडलं नाही म्हणुन तो दुसर्यांदा परत येतो. परत तुम्हांला १ ग्रॅम भक्तीसाठी १० ग्रॅम पुण्य देतो. पुन्हा ९ ग्रॅम extra झाले. म्हणजे total १८ ग्रॅम extra कर्ज झाले. हे ही फेडले नाही म्हणुन परत येतो तेव्हादेखील १ ग्रॅम भक्तीसाठी १० ग्रॅम पुण्य देतो. पुन्हा ९ ग्रॅम extra झाले... म्हणजे आता total २७ ग्रॅम extra कर्ज झाले. बरोबर!!
पण तो ह्याला कर्ज म्हणत नाही तो काय म्हणतो त्याने मागितले नव्हते, मी दिले.
जिथे भक्ताचा फायदा तिथे तो काय म्हणतो, त्याच्यावर कर्ज आहे म्हणून मी येतो असं म्हणतो. पण जेव्हा चित्रगुप्ताकडॆ पापपुण्याचा हिशोब असतो तेव्हा तो म्हणतो ते extra त्याने मागितले नव्हते तर मीच दिले म्हणून त्या मानवाच्या account मध्ये २७ नाही तर ३ ग्रॅमचेच पुण्य आहे.
हा एकपट घेऊन दसपट देतो म्हणजेच दानधर्म करतो म्हणजेच पुण्याचा साठा करतो. पुण्याचा साठा आपण कुणासाठी वापरतो तर मुलाबाळांसाठी. हा पण त्याने केलेला पुण्याचा साठा त्याच्या मुलाबाळां साठी म्हणजेच प्रत्येक मानवासाठी त्याच्या प्रत्येक लेकरासाठी वापरत असतो.
असा पुण्याचा साठा कर्माच्या अटळ सिद्धांतानुसार कधी वापरता येईल तर जेव्हा इतर मंड्ळी त्याला आपला समजतील तेव्हा.
जेव्हा एखादे gift आपल्याला दुसर्याला द्यायचे असते तेव्हा त्यावर gift tax लावतो पण जेव्हा तेच gift बापाला त्याच्या मुलाला द्यायचे असते तेव्हा तो gift tax लावतो का? नाही.
जे त्याचे आप्त असतात त्यांना त्याला द्यायचे असते त्या गोष्टीचे कर्ज न वाटता म्हणूनच तो कर्माच्या अटळ सिद्धांतानुसार येत असतो. तो परत परत येतो त्याचा कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी.
जेव्हा आम्ही आनंदात असताना मजा मारत असतो तेव्हा आम्हांला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे.
गुरु शब्दाची व्याख्या काय? तर जो अंधाराचे रूपांतर प्रकाशात करतो तो गुरु.
पंचशील परिक्षेमध्ये एक practical आहे ज्यात आपल्याच घरात काळोख करून फिरायचे आहे, असे करताना तुम्ही किती ठिकाणी आपटाल? म्हणजे रोजच्या आपल्याच जागेत आपल्याला अंधारातही आपटायला होते .
पण हेच जर आपण जास्त वेळ अंधारात राहिलो तर त्या अंधारातही आपल्याला थोडं थोडं दिसू लागते. आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यांच्या adjustment capacity मुळे आपल्याला अंधारतही दिसत असते. ह्याचाच अर्थ कितीही अंधार असला तरी त्यात प्रकाश असतोच. ज्यांना डोळे नाहीत त्यांची गोष्ट वेगळी त्यांना दिवसही अंधाराप्रमाणेच असतो.
पण जे डोळस असून त्याला समोर असूनही बघू शकत नाहीत ते खरे आंधळे.
"काय गॊड गुरुची शाळा, सुटला जनक जननींचा लळा."
अंधाराचे रूपांतर प्रकाशात म्हणजे काय? तर adaptation क्रिया.
अंधारातही त्याचे अस्तित्व राखण्याची क्रिया. जिथे जिथे अंधार, पावित्र्याचा अभाव तिथेही तो येऊन राहतो.
"जिस जिस पथ पर भक्त साई का वहा खडा हे साई"
आम्ही बाबांच्या फोटोला बघतो मग आम्ही आंधळे आहोत का ?
नुसते बघणे व खरेखुरे बघणे हे वेगळे आहे? आई - वडील मुलासोबत मुलगी बघायला जातात तेव्हा त्या मुलाने आधीही अनेक वेळा आजूबाजूला मुली बघितलेल्या असतात. पण ते बघणे व एका विशिष्ट हेतूने बघणे ह्यात फरक असतो. रस्त्याने जाताना आपण अनेक घरे बघत असतो पण त्या बघण्यात व घर विकत घेताना घर बघण्यात फरक असतोच ना... बघणं हे त्यामागच्या हेतूवर ठरत असते .
जेव्हा आम्ही "त्या"च्याकडे बघत असतो तेव्हा त्या बघण्यामागे ह्या चारपैकी एक कुठलातरी हेतू असतो.
१) नुसता नमस्कार करायला पाहिजे म्हणून बघणे.
२) देवा मला माफ कर असे सांगण्यासाठी बघणे.
३) देवाकडे रडण्यासाठी बघणे.
४) देवाकडॆ मागण्यासाठी बघणे .
आमच्या ह्या हेतूमागचे कारण काय असते? आम्हांला सुखात जगायचे असते दु:ख आम्हांला नको असते. ह्या कारणांनी जरी तुम्ही त्याच्याकडे बघितले तरी ह्यात अजून एक कारण add व्हायला पाहिजे, ते म्हणजे त्याला सुख वाटावे म्हणून त्याला दु:ख वाटू नये म्हणून
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
साजणी म्हणजे अतिशय सुंदर. ह्यात दोघांनाही म्हणजे बघणार्याला व ज्याच्याकडे बघितले जाते आहे त्या दोघानांही सुख आहे. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला बघितले ती जी क्रिया आहे त्यात दोघांनाही सुख आहे.
१९ व्या अध्यायात साईनाथ सांगतात "तू माझ्याकडे पहा, मीही तसाच तुझ्याकडे पाहीन" सगळ्यात सोपी गोष्ट साईनाथांनी सांगितली आहे.
"न करिता सगुणाचे ध्याना भक्तीभाव कदा प्रगटेना
आणि सप्रेम जव भक्ती घडेना कळी उघडेना मनाची "
सगुणाचे ध्यान लावा, जो साकार आहे त्याच्याकडे नुसते प्रेमाने बघायला शिका. इथे ध्यान धारणा असे मोठे मोठे शब्द नकोत, तुमच्या बघण्याने त्याला आनंद वाटला पाहिजे. त्याच्याकडे प्रेमाने, विश्वासाने बघा. किती छान आहे माझा देव. माझा साईनाथ सगळ्यात best. असे विचार करत करत प्रेमाने त्याच्याकडे बघणे ही सुद्धा एक सेवाच आहे.
हे माझे मत नाही ३२ व्या अध्यायात साईनाथांनी स्वत: सांगितले आहे.
अध्याय ३२ ओवी ८८ -
"असो ऎसी दिधली सेवा, दाविला मज ज्ञानाचा ठेवा ,
लागला न मज शोध करावा, अर्थ गिंवसावा किंचितही, "
इथे कुठली सेवा दिली होती तर गुरु एक दृष्टीचे ध्यान.
"वाटे या गुरुच्या गळ्यांतचि गळा, घालूनि त्या डोळां वसवावें ,
तयाचे प्रतिबिंब नसतां डॊळां, तो काय शुद्ध मांसाचा गोळा,
अथवा त्याहून बरा मी आंधळा, ऎसी ही शाळा मज झाली,
लागतां ह्या शाळेस पाय, कोण हतभागी माघारा जाय,
माझें घरदार बापमाय, सर्वचि गुरुराय जाहले"
आपल्याला ३२ व्या अध्यायातील story माहिती आहे. चौघे प्रबुध्द गुरुचा शोध घेत वनात फिरत असतात. त्यातील साईनाथ गुरुची भेट झाल्यावर सांगतात. गुरुने मला सेवा काय दिली? तर फक्त बघण्याची. गुरुच्या समोर बसायचे आणि तेही डोळे बंद करून तर काय उपयोग मला सांगा. असे करणे म्हणजे पंचपक्वान्नाचे ताट समोर आहे व तोंडाला fevicol लावला आहे अशी स्थिती.
साईनाथांनी गुरुउपदेश दिला तो फक्त देशमुखीण बाईंना," तू मजकडे पाही, मी ही तुझ्याकडे तसाच पाहीन"
ज्या डोळ्यात गुरुची image नाही तो मांसाचा गोळाच आहे. गुरुकडे बघणे ही देखील एक सेवाच आहे, त्याच्याकडे बघता बघता प्रेम दाटून आले की त्याचे गुण आपोआप आठवू लागतात.
जेव्हा साईबाबा पृथ्वीवर होते तेव्हा त्यांनी जो उच्छ्वास सोडला तो तेव्हा त्यांच्या सोबत असणार्या भक्तांनी श्वास म्हणून घेतला. हा त्याचा direct प्रसाद आहे लक्षात ठेवा.
त्याच्या उच्छ्वासात आम्ही श्वास घेणे हा direct प्रसादच आहे. तो परत परत येतो का? त्याचा उच्छ्वास तुमचा श्वास बनावा म्हणून मग तुमची ईच्छा असो वा नसो. तुम्ही त्याला बघणे नाकाराल, त्याचा प्रसाद नाकाराल पण श्वास घेणे कसे नाकाराल?
तो पृथ्वीवर का येतो? तर तुम्हाला हा त्याचा श्वास मिळावा म्हणुन, तुमची इच्छा असो वा नसो. कर्माचा अटळ सिध्दांत तो का स्वीकारतो तर त्याने श्वास टाकल्यावर तो उच्छ्वास तुम्हांला मिळावा म्हणून.
जमदग्नी व रेणुका जेव्हा पृथ्वीवर होते तेव्हा त्यांना ही श्वासोच्छवासाची क्रिया नव्हती, कारण त्यांचा देहच पूर्ण प्राणमय होता.
कर्माच्या अटळ सिद्धांताची पहिली पायरी काय? तर श्वास घेतला की बाहेर टाकणे. शिर्डीत बाबा समोर असताना त्यांच्यासमोर ध्यानधारणा करत बसणारे पापी, मूर्ख होय. आता तुम्हांला वाटेल मग घरात फोटो असतात त्याचे काय? त्या फोटॊं समोर रात्रभर जागायचे का? तर हा खुळचटपणा आहे.
आपल्याला माहीत आहे, आपले डोळे कायम उघडे नसतात. डोळे जेव्हा मिटतो तेव्हा आम्ही झोप घेत असतो. म्हणून आम्ही डोळे उघडे असताना त्याला प्रेमाने बघितले की नाही हे महत्त्वाचे आहे. तो जेव्हा येतो तेव्हा त्याने टाकलेला उच्छ्वास हा जर एखादा उत्तर ध्रुवावर असेल व एक दक्षिण ध्रुवावर असेल तरीही त्यांना समानपणे मिळत असतो. तो फोटोत असताना त्याची प्रतिमा जेव्हढी आपल्या जवळ आपण घेतो तेव्हढे आत घेतलेला श्वास हा अधिक त्याच्या स्पंदनानी भरलेला असतो. ही हवा आत घेण्याचे साधन कधी उदी, लॉकेट, कंकण ह्या स्वरुपात असते. ह्यासोबत जर नाम असेल, जे तोंडाने उच्चारले जाते, स्वरयंत्राशी जोडलेले असते, नाकाशी जोडलेले असते. जिथून श्वास आत बाहेर आपण घेतो तो श्वास हा त्याच्या श्वासाने भरला जातो. तो पृथ्वीवर असताना जेव्हा त्याचे नामस्मरण आपण करतो तेव्हा त्याची अधिक स्पंदने मिळतात.
जेव्हा फोटोला समोर ठेवून हृदयात ठेवून (हृदयात ठेवणे म्हणजे मजबूत प्रेम) आपण नमस्कार करतो तेव्हा अधिक स्पंदने मिळत असतात.
तुमचे कर्ज कमी करण्यासाठी तुमची पापाची list कमी करण्यासाठी म्हणून हा परत परत येत असतो,
"यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत
विनाशाय् च दुष्कृताम् संभवामि युगे युगे"
धर्म संस्थापन म्हणजे काय? बघा बोट हलणे हा बोटाचा गुणधर्म आहे, ही सहजता आहे, व त्यामुळे होणारे चांगले कार्य म्हणजे सत्कार्य.
जो प्राणाचे व बुद्धीचे कार्य सुरळीत चालवतो तो सनातन धर्म. हा निर्गुण निराकार स्वरूपातून वेद रूपाने सगुण साकार बनून मानवाच्या जीवनात येत असतो. प्रत्येक माणसाच्या जीवनात सहजता येणे हाच तो धर्म.
जसं चालणं हा पायाचा गुणधर्म तोच जर पाय मुरगळला तर त्यात अडथळा आला. हृदयाच्या कार्यात अडथळा येणे म्हणजे heart failure, इथे कार्यहीनता आली. अशा तर्हेच्या अनेक गोष्टींमुळे सहजता जात असते आणि मग त्याच गोष्टींसाठी अधिक प्रयास करावा लागतो.
जेव्हा अशाच प्रकारची दु:खे आमच्या जीवनात येतात तेव्हा आमच्या जीवनातील सहजता जाते. प्रत्येक मनुष्याच्या बुध्दीचा गुणधर्म सहजता आहे तो गुणधर्म मानव जीवनातील लहान मोठ्या दु:खांमुळे विसरून जातो हा गुणधर्म परत तुमच्या जीवनात आणण्यासाठी तो येत असतो.
तुमचे त्याच्यावर जेवढे प्रेम, त्याप्रमाणात तुमचे ५०% पाप तो स्वीकारतो. का? कारण तो मनुष्य त्याच्यासमोर त्याचे नाव प्रेमाने घेतो म्हणून, हा नियमही त्यानेच त्याच्या फायद्यासाठी केला आहे. कारण भक्तांचे दु:ख बघून तो दु:खी होतो. जरी तो आनंद स्वरुप असला तरी त्याला हे दु:ख आवडत नाही. म्हणुन तो पृथ्वीवर येतो.
आणि तो एकदा का अवतरीत झाला की त्याच्या अस्तित्वामुळे अख्खी पृथ्वीच गुरुक्षेत्रम् होते. तुम्ही मग जगाच्या पाठीवर कुठेही असा तुम्ही त्याचे नाव घेत असाल तर तुम्ही गुरुक्षेत्रम्मध्येच असता.
जेव्हा त्याचे गुणसंकीर्तन आम्ही प्रेमाने करतो तेव्हा आमचे मन हेच गुरुक्षेत्रम् बनते. म्हणजे अख्खेच्या अख्खे चण्डिकाकुल आमच्या मनामध्ये येत असते, जेवढा वेळ आम्ही त्याच्या शाळेत राहण्याचा प्रयास करतो तेवढा वेळ.
कुणी जर आपल्याला कुठला student म्हणून विचारले तर आपण प्रथम शाळेचेच नाव घेतो. हे कुणी शिकवलेले असते का? नाही.
आपली आयुष्यभर attachment कुणाशी असते तर आपल्या शाळेशी. शाळा म्हटल्यावर अख्खी शाळा आठवते. तसेच त्याची आठवण काढताना तो अख्खा आठवला पाहिजे व त्यासाठी त्याला अख्खा बघितला पाहिजे.
जेव्हा तुम्ही त्याच्याकडे प्रेमाने बघता तेव्हा तो ही तुमच्या नजरेत नजर मिसळून बघतो, त्यामुळे त्याचे प्रेमही त्याच्या नजरेतून आम्हांला मिळत असते. आम्ही रागाने बघितले तर काय होणार?
गुरुक्षेत्रम् म्हणजे काय? तुमची त्याच्याकडे पाहणारी एकमेव दृष्टी. तुम्ही त्याच्याकडे पाहणे हेच तुम्हांला सर्व समर्थं सर्वार्थसमर्थं बनवते.
रामनामाची वही ज्यांनी आधी सुरू केली ती जुनी लोकं आता लिहिण्याचा कंटाळा करत आहेत, आमचा speed slow का झाला? त्याच्याकडॆ बघत रामनाम लिहून बघा. त्याचे प्रेम आम्हांला मिळावे म्हणून तो कर्माचा अटळ सिद्धांत स्वीकारून परत परत येत असतो त्याच्या ह्या प्रयासांची आपल्याला थोडीतरी जाणीव व्हायला पाहिजे.
किती श्रमतोस रे माझ्यासाठी हा भाव नेहमी ह्याच्याशी बोलताना प्रगटला पाहिजे. सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं म्हणाजे काय? हे आपल्याला पुढच्या वेळेला बघायचे आहे .
लक्षात ठेवा तुमच्या फायद्यासाठी हा स्वत:ला restriction घालतो, हा असा एकच आहे.
|| हरी ॐ ||