|| हरी ॐ ||
शनिवारी आषाढी एकादशी आहे सगळीकडॆ विठ्ठलनामाचा गजर सुरू आहे... आज इथे व्यासपिठावरपण आपण हे गजर ऐकणार आहोत.
ह्या आषाढी एकादशीपासून माझ्या उपासनेचा दुसरा खंड म्हणजे उपासना मी सुरू करणार आहे ती दसर्यापर्यंत असेल .
ही उपासना असेल तपश्चर्या नाही हे लक्षात घ्या. उपासना म्हणजे उप आणि आसन म्हणजेच जवळ बसणे. मी ह्याने काय करणार आहे तर मी फक्त डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी रहाणार आहे, ह्या उपासनेमधून मला जे काही मिळणार आहे ते सर्व मी त्रिविक्रममध्ये ठेवून देणार आहे.
कारण मला आता कामाला लागायचे आहे. मला तुमच्या अधिक जवळ यायचे आहे. जेवढी दरी कमी तेवढी जवळीक अधिक बरोबर.
आता मला फक्त हात हालवत आशीर्वाद देत बसायचे नाही. आतापासून पुढे खूप मोठ्या गोष्टींना सुरुवात करायची आहे. कळलं सगळ्यांना... तर ह्यापुढे मी फक्त डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी आहे. डॉ. धैर्यधर जोशी यांचा पुत्र, MD in Mumbai.
त्यामुळे प्रत्येकाने निर्धास्तपणॆ खात्री बाळगा की आता आम्ही काहीही केले, कसेही वागलो तरी बापूला काहीही कळणार नाही.
तुम्ही विचारण्याआधी आज मीच तुम्हांला सांगतोय की तुम्ही चोरी करा, खून करा, खोटे बोला, काहीही केले तरी आता बापूला त्यातले काहीही कळणार नाही. त्यामुळे बापूला कळेल ही मनातील भीती काढून टाका.
बापू आता आमच्यासारखाच आहे हे मनापासून स्वीकारा. कारण मला तुमच्याबरोबर धावायचे आहे, तुमच्याबरोबर चालायचे आहे आणि वेळ पडली तर तुमच्यपुढे उभे राहून जे काही करायचे ते करेन पण तुमच्यापुढे उभा असतानाही मी माणूस म्हणूनच जे काही करायचे ते करेन. आलं लक्षात... कळलंय सगळ्यांना ?
तुम्हांला इथे चमत्कार बघायची इच्छा असते ना? आता बघा मी तुम्हांला एक चमत्कार दाखवतो ..
देवाच्या दाताला कधी कवळी असते का मला सांगा? रामाच्या दातांना कवळी होती का? कृष्णाच्या दातांना होती का? नाही ना .
मी कवळी बसवली बघा (बापू कवळी काढून दाखवतात). बघितली सगळ्यांनी? मला जे सांगायचे होते ते मी सांगितले आणि दाखवले बरोबर... १०८%.
आज तुम्ही, तुमच्या डोळ्यांनी बघितले आहे.. तुम्हांला सर्वांना इथे मी proof दिले आहे. बरोबर.
देव कधीही कवळी लावत नाही... आलं लक्षामध्ये... समजलं सगळ्यांना.
|| हरी ॐ ||