॥ हरि ॐ ॥
ॐ मन्त्राय नम: ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम: आपण आत्मा म्हणजे काय बघितले, दत्तात्रेय म्हणजे काय बघितले त्याच पदातील पुढची गोष्ट ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम:, आजोबाच नातू झाला एवढं मानलं की दत्तात्रेय म्हणजे काय हे कळेल. राम हा परमात्मा आहे तर रामात्मा रामाचा आत्मा कोण? परत्त्म्याच्या आत्त्म्याला काय म्हणतात? त्याची मूळ संज्ञा काय? जीवात्म्याला नावं असतात श्रीधर, मधुकर वगैरे तसं परत्त्म्याच्या आत्त्म्याला काय म्हणतात? जो स्वत:च विश्वाचा आत्मा आहे त्याला आत्म्याची गरज काय?
माणसाला पाण्याची गरज आहे, माणसासाठी पाणी जे काम करते, ते काम पाण्यासाठी कोण करते? मनुष्याला पाण्याची गरज आहे त्याचं जीवन टिकविण्यासाठी त्याचप्रमाणे पाण्याला त्याचं जीवन टिकविण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ती गोष्ट पाण्यासाठी पाण्याचं काम करते. सूर्यकिरण पृथ्वीवरचं पाणी शोषून घेतात, तेच परत पृथ्वीवर येते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या अणूंचं त्याच प्रमाणात (H2O) एकत्रित राहण्यावर पाण्याचं पाणीपण आहे. म्हणजेच ह्यात transformation आहे.
१) हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोन वायूंचं एकत्रित असणं
२) ह्या दोघांचं त्या प्रमाणात मिलन होणं
३) ह्या दोघांचे मूळ गुणधर्म जाऊन पाणी हा नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होणं. हे दोन वायू असले तरी पाणी हा द्रव पदार्थ आहे.
ह्याच क्रियेला transformation म्हणजेच रूपांतरित होणं म्हणतात. Transformation म्हणजे पूर्णपणे बदल घडवून आणणे गुणात्मक व संख्यात्मकदृष्ट्या qualitative आणि quantitative. पूर्णपणे बदल घडवून आणणं आणि पाण्याचं पाणीपण टिकवणं ही क्रिया ऊर्जेमुळे घडते. ही ऊर्जा दोन वायूंना एकत्र आणते आणि पाण्याचं पाणीपण टिकवते.
हे विश्व सगळं ऊर्जेने भरलेलं आहे, ऊर्जेवर चालत आहे. समजा एक मनुष्य आहे त्याला आत्मा, प्राण, मन, बुद्धी सगळं आहे पण जर त्याला पंधरा दिवस खायाला दिलं नाही तर त्यात ऊर्जा राहत नाही. तो काम करू शकणार नाही.
ऊर्जा ही प्रत्येक प्रक्रियेच्या, प्रतिक्रियेच्या, क्रियेच्या मुळाशी असते. ही प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. ऊर्जा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या असतात, त्या वेगवेगळी कामं करतात. तरीही ऊर्जा ही basically एकच आहे, जी ऊर्जा हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांना एकत्र पाणी बनविते तीच सोडिअम आणि क्लोरीन ह्यांना एकत्र आणून मीठ बनविते. ऊर्जा ही एकच असते, पण नुसत्या ऊर्जेला कुवत नसते, कसलाही निर्णय घेण्याची, काय आणि कसं करायचं ह्याची inteligency नसते. ही सगळी ऊर्जा जी आहे तिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं कार्य करण्याचं ठरविणारा वेगळा घटक असतो. माणसाकडे ऊर्जा येते, तेव्हा माणूस ठरवतो ऊर्जा कशी वापरायची ते. ऊसापासून साखरही बनविता येते आणि दारुही बनते. ताकद वाचवूही शकते आणि मारूही शकते. ऊर्जा वापरण्यावर ऊर्जेचा उपयोग ठरत असतो.
ह्या ऊर्जेचं संचलन करणारी बुद्धिमत्ता ज्याच्याकडे आहे, त्याला महाप्राण म्हणतात. हनुमंताचे वर्णन काय येते - "बुद्धिमत्तां वरिष्ठम्"
बापूंनी, दादांनी सांगितले - १०८ वेळा रामरक्षा म्हणा, आम्ही एकदा तो आकडा पूर्ण कसा होतो हे बघत असतो. १०८ वेळा रामरक्षा म्हणताना प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे असे नाही, पण ती म्हणताना रामावरच्या प्रेमाने म्हणा, अर्थ कळो वा न कळो पण प्रेमाने म्हणा. १०८ वेळा नीट लक्ष देऊन म्हणण्यापर्यंत तुम्ही पोहचलेले नाहीत. ज्यांना वाटतं आम्ही अध्यात्मात खूप पोहचलेलो आहोत त्यांना माझा नमस्कार. जो कोणी ऋषी असतो, ज्याच्याकडे ताकद असते, तो कधी जगासमोर चत्मकार करून दाखवत नाही. मी इथे सगळ्यात मोठा आहे आणि मोठी व्यक्ती नमस्कार कधी करते, जेव्हा आम्ही जातो आमच्या गावा.
पूर्ण रामरक्षा म्हणताना लक्ष नसलं तरी, "रामो राजमणि: सदा विजयते....." ह्या शेवटच्या सात ओळ्या खूप महत्त्वाच्या. हे पद म्हणताना जागे रहा. At least हे पद म्हणताना तरी भानावर रहा. ह्या ओव्यांमध्ये संस्कृतचं सगळं व्याकरण आहे. रामो - राम: प्रथमा एकवचन, रामं - द्वितीय एकवचन, रामेण - तृतीया एकवचन, रामाय - चतुर्थी एकवचन, रामात - पंचमी एकवचन, रामस्य - षष्ठी एकवचन, रामे - सप्तमी, भो: राम - संबोधन
एका व्यक्तीचे दुसर्या व्यक्तीशी संवाद होताना, भक्ताचा देवाशी संवाद होताना ज्या ज्या प्रकारे नाव उच्चारले जाईल ते सर्व प्रकार ह्या पदामध्ये आहेत. हे पद म्हणजे देवाशी होणारा संवाद आहे.
आम्ही सामान्य माणसं आहोत, आमच्या हातून चुका घडतात पण पाय जमिनीवर असले पाहिजेत. इथे सुंदरकाण्डाची सुरुवात आठवली पाहिजे. जेव्हा समुद्र उल्लंघनाची वेळ येते, तेव्हा अंगदासहित प्रत्येक वानर आपण एवढीच उडी मारू शकतो असे सांगतात, त्यांचे सगळ्यांचे पाय जमिनीवर आहेत, त्यांना आपापली capacity माहीत असते. त्यावेळी हनुमंत शांत असतो. जांबुवंत हनुमंताला सांगतो की, तू हा समुद्र पार करू शकतोस.
आम्हाला आमची capacity माहीत असली पाहिजे, आमची capacity नसली तरी हनुमंत आमच्या प्रत्येकासाठी सेतू बांधतो.
आम्ही संकटात भगवंताला साकडं घालतो, की संकटाच्या पैलतीरी पोहोचव. तेव्हा मी भक्ती करीन, सेवा करीन असं म्हणतो, आम्हाला ह्यातलं काही करायचं नसतं. हनुमंताने आम्हांला पाठीवर बसवून घेऊन जावे ही आमची अपेक्षा असते. तो तुम्हाला पाठीवरुन नेईलही, पण तेवढी निष्पापवृत्ती, प्रामाणिकपणा आहे का तुमच्याजवळ? संकटाच्या वेळी केलेल्या प्रार्थनेत आर्तता, व्याकूळता असते पण ती संकट निवारण्यासाठी असते; भगवंताचं प्रेम, कृपा प्राप्त व्हावी म्हणून नसते. परमेश्वराने आमचा फायदा करून द्यावा म्हणून व्याकूळता असते, पण परमेश्वराने प्रेम करावे म्हणून व्याकूळता नसते.
तुम्ही म्हणाल काय बापू नेहमी आमच्या दोषांवरच बोट ठेवता, काय गरज आहे? खरंच सांगतो बाळांनो, मलाच गरज वाटते, कारण जिथे आपलं असतं तिथेच झाकायचं असतं, वेळ पडल्यास धपाटा घालायचा असतो.
सगळ्या ऊर्जेला बुद्धीमत्ता पुरविण्याचं काम हनुमंत करतो. बुद्धी आणि बुद्धिमत्ता ह्यात फरक आहे. माझ्या जवळ एवढे पैसे आहेत ही बुद्धी आहे, तर ह्या पैशातले एवढेच पैसे मला खर्च करायचे आहेत ही बुद्धिमत्ता आहे. आपल्याकडचं knowledge सांभाळायची शक्ती बुद्धी आणि ते वापरायची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. जर सगळ्या ऊर्ज्यांना बुद्धिमत्ता हनुमंत पुरवतो. तो परमात्त्मा जेव्हा मानवी शरीर धारण करुन येतो तेव्हा त्याच्या कार्याला अनुरुप परिस्थिती हा हनुमंत तयार करतो, तर परमात्त्म्याचं काम काय?
हेच समजावून सांगतो - ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम:
दत्त म्हणजे दिलेला, दिला गेलेला, दिलेला असलेला, जो दिलाय, जे देऊन टाकलाय. आपण म्हणतो भगवतदत्त म्हणजे भगवंताने दिलेला. तुम्ही कोणाला प्रेमाने पेन दिलं तर ते दत्त आहे. दत्त हा कोणाकडून तरी दिला गेलेला असलेला हवा. जो दिला आहे गुरु म्हणून तो दत्तगुरु आणि जो दिलेला आहे आत्रेय म्हणून तो दत्तात्रेय. अत्रि जो तीनच्या पलीकडे आहे तो तीन काळ, तीन गुणांच्या पलीकडे आहे तो. मानवाने तो चिंतनातून ओळखला आणि जाणलं ह्याचं मूळ माहीत नाही.
तो दत्त आत्रेय आहे, तीन गुणांच्या पलीकडून आम्हाला समजेल असा अनसूयेने दिलेला आहे. आमच्यासाठी जी गोष्ट आधीपासून अस्तित्वात आहे, जी कोणी दिलेली नाही अशी सर्वोच्च स्थिती म्हणजे दत्त. अशी अवस्था जो माणसाला समजेल अशा स्वरूपात वावरते ती गोष्ट म्हणजे दत्तात्रेय. अभ्यासाचं मोठ text book म्हणजे दत्तगुरु. ते समजत नाही म्हणून आपण जे guide वापरतो ते म्हणजे दत्तात्रेय.
मग परमात्मा हा कसा आहे? चण्डिकेचा प्रथम पुत्र दत्तात्रेय प्रकाश स्वरूप, द्वितीय पुत्र किरातरुद्र अग्निस्वरूप आणि तृतीय पुत्र परमात्मा ध्वनिस्वरूप आहे.
म्हणजेच काय? जे अदृश्य आहे ते दृश्य स्वरूपात आणणारा परमात्मा. आपण ultrasonography बघतो जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही ते ध्वनीलहरींच्या सहाय्याने बघू शकतो. म्हणजेच इथे ध्वनीलहरी प्रकाशाचे काम करतात. असेच प्रत्येकासाठी जे मनुष्याला कळू शकत नाही तिथे तो ध्वनीलहरी असूनसुद्धा प्रकाशाचे काम करतो.
इथे आपल्याला समजेल इथे ध्वनीचा आत्मा प्रकाशच आहे, मी बोलतो तेव्हा जीभ टाळूवर आपटते आणि ध्वनी उत्पन्न होतो. म्हणजेच जिथपर्यंत आम्हांला समजू शकेल तिथे तो ध्वनीच्या माध्यमातून कार्य करतो, जिथे आम्हांला समजू शकत नाही तिथे तो त्या पोकळीतून प्रकाशाच्या माध्यमातून कार्य करतो.
आज तुम्हाला परमात्म्याचे कार्य समजले. आता प्रकाश जरी आमच्यापर्यंत येऊ शकत असेल पण आम्हीच दार बंद केलं तर?
परमात्म्याचा ध्वनी कधी कानात ऐकू येत नाही. असं होत असेल तर समजायचं तुम्हाला आजार झालाय. त्याचा ध्वनी म्हणजे जेव्हा तुम्ही चुकीच्या ठिकाणी असता, संकटात असता, तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग तो दाखवत राहतो. मनातल्या विचारांना लहानसा धक्का देतो, की तुमचं मन लगेच दुसरा विचार करू लागतं. हाच त्याचा ध्वनी आणि प्रकाशही.
संकटात दोन मार्ग असतात - १) शांत बसून देवाचं नाव घेणं, २) दुसर्यावर आरोप करणं, दुसर्याल जबाबदार ठरवणं, आपण नेहमी दुसरा मार्ग अवलंबत असतो.
संकटाच्या वेळी शांत बसता येत नाही, मनात प्रचंड टेन्शन असतं. पण अशावेळी त्याचं गुणसंकीर्तन, त्याची गीतं, प्रार्थना ऐका. ती ऐकता ऐकता कुठला ध्वनी त्यातील कुठला शब्द तुमच्या संकटासाठी फिट होईल हे सांगता येत नाही. तुमच्या संकटाच्या कुलुपाच्या चावीचा password त्या नामाच्या, गुणसंकीर्तनाच्या, स्तोत्राच्या भावात असतो.
पण त्यासाठी तुमचा फोकस परमेश्वराच्या संकट निवारण्याच्या ताकदीवर असला पाहिजे. पण आमचं लक्ष संकटांवर केंद्रित असतं. संकटाच्या वेळी फोकस कसा असला पाहिजे -
माझा देव आहे, माझा देव मला कधीच टाकणार नाही, माझा देव लई भारी आहे, माझा देव संकटांपेक्षा मोठा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे.हे काम परमात्मा करतो. तो तुमच्या ध्वनीला व कामाला shape देतो. तुमच्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते तुम्हांला तुम्ही असाल तिथे तो पुरवतो. मदतीसाठी व्यक्ती तोच पाठवतो. सगळ्या जीवात्म्यांशी साखळी जो जोडतो तो परमात्मा व त्या परमात्म्याला व आदिमातेला आणि जीवात्म्याला व परमात्म्याला जोडण्याचे कार्य हनुमंत करतो.
हा अंकुरमन्त्राचा प्रथम पाद म्हणताना आपण काय करतो -
आपण संपूर्ण चण्डिकाकुलावरचा विश्वास घोषित करतो. आपला विश्वास अधिक सबळ करतो. हा मंत्र ज्याने कोणी प्रेमाने स्विकारला आहे, त्याच्या मेंदूमधील पेशींना जो जो password आवश्यक आहे ते पुरविण्याचं काम हा मन्त्र करतो. ह्या अंकुर मन्त्रामुळे आमच्या मेंदूत विश्वास अधिक बिंबवला जातो, अशा ठिकाणी जे आपल्या प्राणांबरोबर लिंगदेहातून जाणार असतो त्यामुळे पुढच्या जन्मांत हा मंत्र आपोआप मिळणार आहे.
मला "अनादी" शब्दचा अर्थ सांगा. अनंत शब्दचा अर्थ कळू शकतो ज्याला अंत नाही असा. पण अनादी म्हणजे काय? अनादी म्हणजे जे सुरू झालंय पण कधी सुरू झालंय ते माहित नाही, कुठून सुरू झालंय हे सांगता येतं नाही असं.
हा अर्थ ज्या दिवशी कळेल त्या दिवशी समजा तुम्हाला आध्यात्मिक ताकद प्राप्त झाली आहे. जो गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणतो त्या श्रद्धावानाला हे नक्की कळणार, पण कधी जेव्हा तो ह्या जन्मातलं विकासाचं कार्य संपवून पुढच्या जन्माला जातो तेव्हा, म्हणून त्याला घाबरण्याचं कारण नाही.
जो हा मंत्र प्रेमाने स्विकारतो त्याला भूतबाधा होऊ शकत नाही. ह्या मंत्राने आमच्या मनातले अनेक password काम करतात, चाव्या आपोआप उघडतात, आम्हांला टाळं फोडायची गरज राहत नाही.
मनापासून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. मातृवात्सल्यविन्दानम् उपनिषद लिहून पूर्ण झालेलं आहे. जे दत्तजयंतीपासून सर्वांना उपलब्ध होईल.
हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, स्वभावातल्या बदलासाठी, त्याच्या भक्तीला जपण्यासाठी, निष्ठेला वाढविण्यासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ते ते सगळेच्या सगळे ह्या उपनिषदामध्ये आहे.
मनापासून सांगतो, "सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते"
सर्व मंगलता, सर्व पुरुषार्थांची साध्यता हे उपनिषद आहे. हे दत्तजयंतील सर्वांना मिळणार आहे. ह्या दिपावलीला एक खास पणती लावा आणि माझ्या आईला सांगा की, ही पणती म्हणजे उपनिषद आहे आणि ही पणती माझ्या जीवनात सदैव तेवत राहू दे.
॥ हरि ॐ ॥