॥ हरि ॐ ॥
ॐ मन्त्राय नम: - श्रीगुरुक्षेत्रम् अंकुर मंत्र - रामात्मा म्हणजे काय ते आपण बघितले. आम्हांला प्रश्न पडतो बीजमंत्रामध्ये किती पदे - पाच, अंकुरमंत्रामध्ये - चार पदे व उन्मीलन मंत्रामध्ये - चार पदे आहेत. म्हणजे सर्व मिळून १३ पदे आहेत. १३ हा शुभ अंक आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा रामदासांनी सिद्ध केलेला, हनुमंताने प्रत्यक्ष उच्चारलेला मंत्र १३ अंकीच आहे. जसं विश्व तिच्या इच्छेनुसार घडलं तसाच हा मंत्र तिच्या नियमानुसार तयार झालेला आहे. कुठल्याही बीजाच्या पाच अवस्था असतात.
१) फळात नेहमी बीज सुरक्षित असतं.
२) त्याला फळापासून किंवा कणसापासून वेगळं केलं जातं.
३) वेगळं केलेलं बीज जमिनीत पेरलं जातं म्हणजे जमिनीत किंवा जमिनीवर रोवलं जातं.
४) जमिनीत किंवा जमिनीवर पडल्यावर काहीतरी घडतं ज्याच्यामुळे बीजाची पुढची अवस्था घडते, त्यात बदल व्हायला सुरुवात होते. विकास सुरू होतो. स्थिती ह्या अवस्थेतून गती ह्या अवस्थेमध्ये बीज येते. बीज गतिकारक बनते.
५) बीज गतिकारक बनल्यावर ते पूर्व तयारीला लागतं. बीजामध्ये आतून स्थित्यंतरं येऊ लागतात, अंतर्गत बदल व्हायला सुरुवात होते. आत बदल झाले की अंकुर फुटायला सुरुवात होते.
आपल्या जीवनात ह्या अवस्था कशा आहेत ते पाहूया -
१) बारावी पास झालो हे फळ आहे, ह्या फळाला डॉक्टर होणं, C.A. होणं, इंजिनिअर होणं, किंवा नुसतंच बारावी पास होणं इतकी बीजं असू शकतात. पण इथे फळ आहे - परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं आणि बीज आहे - पुढचा विकास, पुढची शैक्षणिक पात्रता मिळवणं. जसं फळ तसं बीज आणि त्यातून पुढे निघणारा वृक्ष.
२) बीज कणसातून किंवा फळातून बाहेर पडणं म्हणजे
अ) अभ्यास सोडून दुसरीकडे लक्ष देणं म्हणजे बीज तव्यावर भाजणं.
ब) आपला आवडता विषय नसला तरी इतरांचे ऐकून न आवडणारा विषय निवडणं म्हणजे चांगलं बीज खडकावर पेरण्यासारखं आहे.
क) मेडिकल आवडतं म्हणून मेडिकलला अॅडमिशन घेणं, म्हणजे चांगलं बीज योग्य त्या जमिनीत पेरणं.
३) बीजाचं जमिनीत रुजणं म्हणजे जसा बारावीपर्यंत sincerely अभ्यास केला तसाच मेडिकलसाठी करत रहायला हवा.
४) मग आपोआप त्या विषयाविषयी प्रीती, अनुकूलता वाटू लागते, त्या विषयाच्या आकलनासाठी मन तयार होते.
५) अंतर्गत बदल - वैद्यकीय शिक्षण घेता-घेता M.B.B.S. पास होण्यापर्यंतचा सगळा प्रवास तयार होतो.
वरील पाच गोष्टीत दुसरी व फार फार तिसरीच गोष्ट आमच्या हातात आहे. मातीत जाऊन रोवणं आणि बीज जिथे पिकतं त्या मातीत रुजवणं. बाकीच्या तीन stages आपल्यावर अवलंबून असतातही आणि नसतातही. ह्यासाठी परमेश्वराचा भक्कम आधार असावा लागतो. बीज मातीत लावलं आणि किड्याने ते खाल्लं तर, कोणी त्यावर सिमेंटचा थर लावला तर, पाऊस पडला नाही तर, ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात. जे आपल्या हातात नाही त्याची काळजी जो घेतो तो परमात्मा. आमच्या बीजासाठी जे जे आवश्यक आहे त्याची सगळ्या जीवनात काळजी घेण्याची, selection करण्याची ताकद बीजमंत्रामध्ये आहे.द्विदल धान्यांमध्ये दोन दलं असतात, त्याच्या दोन दलांमधून अंकुर बाहेर येताना दिसतो. पण वडाच्या बीमधून येताना दिसत नाही. जेव्हा कोंब फुटतो त्यावेळी त्याचा रंग पांढराच असतो. चणा पिवळा असला तरी त्याचा कोंब पांढरा असतो, पावटा हिरवा असला तरी त्याचा कोंब पांढरा असतो, मूग हिरवा असला तरी त्याला येणारा कोंब पांढरा असतो. बीज कुठल्याही रंगाचं असो, त्यातून बाहेर येणारा कोंब पांढर्या रंगाचाच असतो, तो जसा वाढायला लागतो तसा त्याचा रंग बदलत जातो.
अंकुर मंत्राच्या चार steps आहेत -
१) बीजातून कोंब बाहेर पडताना पांढरा आहे म्हणजे जसा आहे तसा, जसा निघाला तसा.
२) वाढता वाढता रंग बदलायला लागतो
३) एका अंकुरातून दुसरा अंकुर फुटण्यास सुरुवात होते म्हणजे पानाचे कोंब फुटायला लागतात, विस्तार व्हायला लागतो.
४) पान येईपर्यंत प्रकाशाची दिशा धरत नाही, आता तो प्रकाशाच्या दिशेने वळायला लागतो.
आता ह्या stages डॉक्टरचेच उदाहरण घेऊन बघूया -
१) डॉक्टर झाला, फ्रेश डॉक्टर. डिग्री घेऊन बाहेर पडलाय, जे तो शिकलाय तसाच्या तसा आहे, textbook मधून निघाला तसा, त्याच्याजवळ स्वत:चा अनुभव नाही.
२) डिग्री मिळवल्यावर लक्षात येतं नोकरी मिळवायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. सुरक्षित जगातून बाहेरच्या वातावरणात आलाय, बाहेरच्या वातावरणासाठी अनुकूल असं वागायला लागतो. पेंशट मिळविण्यासाठी आलेल्या प्रत्येक पेशंटला खूश करायचं असतं तो टिकला पाहिजे म्हणून थेअरी knowledge बाजूला ठेवून पेशंटच्या कलाने घेतो, त्याचा विश्वास संपादन करतो.
३) रंग बदलल्यामुळे वाढ व्हायला लागते म्हणजे पेशंट यायला लागतात, अनुभवाने तो व्यवस्थित diagnosis करू शकतो.
४) प्रकाशाच्या दिशेने वाढ होते - तज्ञ डॉक्टर बनतो.
वरील stages मध्ये माणसाच्या हातात फक्त पहिली stage च असते. जो पहिला पेशंट आला त्याने जर इतरांना जाऊन सांगितले नाही की हा डॉक्टर चांगला आहे, तर मग इतर पेशंट कसे येतील? आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीचं इतर कोणाशी चांगलं नसेल तर हा चांगला डॉक्टर आहे हे इतरांना कसं कळणार? इथे मनुष्याच्या हातात काहीही नसतं. म्हणूण इकडे आधार महाप्राण देतो. तो अजीव व सजीव दोन्हींत आहे. अजीवात त्यांचा अणू जसा आहे, तसा सुरक्षित ठेवण्याचं कार्य करतो. तर सजीवात प्रगती, विकास करण्याचं कार्य करतो.बीजात मदत करतो तो - परमात्मा आणि अंकुरात मदत करतो तो हनुमंत - दत्तात्रेय.
आता उन्मीलन मंत्र बघूया. उन्मीलन म्हणजे पूर्णपणे संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होणे. फळं, पानं, फुलं येणं. बीपासून परत बी तयार होणं. ह्यातही चार stages आहेत.
१) प्रकाशाच्या दिशेने वाढ सुरु झालेली आहे. उभा व आडवा विस्तार सुरू होतो.
२) मुळांकडून योग्य कार्य झाले पाहिजे, मूळे नीट जमिनीत पसरली पाहिजेत आणि पाने वरती नीट पसरली पाहिजेत. प्रकाश हे मुख्य ध्येय कायम राखून स्वत:च्या विकासासाठी अनुकूल दिशा पकडतात, वार्यालाही प्रतिकूल होऊ देत नाहीत. इथे फक्त संख्यात्मक वृद्धी आहे.
३) फुल ही गुणात्मक प्रगती आहे. भुंग्यांना आकर्षित करण्याची capacity असते. ही अवस्था म्हणजे परागकण उधळण्याची अवस्था.
४) चौथी स्थिती म्हणजे फळण्याची अवस्था. ती फळे आपल्यासाठी नाहीत हे झाडाला मान्य असावं लागतं. झाडाला लागलेली फळं झाडाने स्वत:च टाकून दिलीत म्हणजे कुठल्याही पक्ष्याला, पाखराला, माणसांना तोडताच येणार नाही अशी अवस्था केली तर फळ झाडाला चिकटून बीज खराब होईल. प्रत्येक लागलेलं फळ सहतेने अलग होईल असाच त्याचा देठ चिकटलेला असला पाहिजे.
ह्या stages डॉक्टरच्या उदाहरणावरून पाहूया -
१) तज्ञ डॉक्टर झाल्यावर पैसे, बंगला, गाडी सगळं मिळतं.
२) प्रकाशाच्या दिशेने वाढ - आपल्याकडे येणार्या पेशंटला आपल्या अनुभवाचा फायदा करून द्यायला पाहिजे. पेशंट जर केस गळताहेत म्हणून आला असला आणि पेशंटचं वाढलेलं वजन लक्षात आलं तर त्या पेशंटला जाडेपणामुळे होणार्या विकारांबद्दलही कुठलीही extra fee न आकारता मार्गदर्शन करणे. अनुभवाने आलेल्या शहाणपणामुळे पुढे जाडेपणामुळे काय-काय complications होऊ शकतात हे पेशंटच्या लक्षात आणून देणे. ही फुलण्याची अवस्था.
३) ह्या फुलाच्या सुगंधाने, ह्यातून परागकण उधळल्याने अनेक फुलपाखरं आकर्षित होतात म्हणजे नवीन शिकाऊ डॉक्टर्स मार्गदर्शनासाठी येतात.
४) नवीन शिकाऊ डॉक्टर्स प्रॅक्टिससाठी येऊ लागतात म्हणजेच ह्या अनुभवातून नवीन डॉक्टर्स तयार होऊ लागतात.
इथे सगळ्याच गोष्टी आमच्याच हातात आहेत. आणि हाच मोठा गोचा आहे. जे सगळंच्या सगळं आमच्या हातात आहे तेच most dangerous असतं, आणि जे कमी प्रमाणात आपल्या हातात आहे ते less dangerous असत. जिथे सगळ्या गोष्टी आमच्या हातात असतात, त्या सगळ्या आंम्हाला सोप्या वाटत असतात, सोप्या दिसत असतात आणि इथेच मोठा problem येतो. इथे स्वामी सद्गुरुतत्त्व आहे.
जो परमात्मा म्हणून कार्य करतो तोच सद्गुरु आहे. पहिल्या बीज मंत्रात ज्या गोष्टी मनुष्याच्या आकलना बाहेरच्या आहेत, तिथे तो भर्गलोकातून कार्य करु शकतो. दुसर्या अंकुर मंत्रात महाप्राण कार्यरत असतो, त्याला जेवढं पोषण द्याल तसं निसर्गनियमानुसार घडणारं. तुम्ही बोलल्याशिवाय तो लंका जाळणार नाही. परमात्म्याला मनुष्याचं कर्मस्वातंत्र्य मान्य असल्यामुळे ज्या गोष्टी मनुष्याच्या स्वत:च्या हातात आहेत त्या गोष्टींमध्ये तो भर्गलोकातून त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. जिथे हनुमंत आड येत नाही, परमात्मा भर्गलोकातून काहीही ढवळाढवळ करू शकत नाही, तिथे आम्ही म्हणतो हे आम्हांला easily जमण्यासारखं आहे. इथे हेमाडपंतांचा प्रश्न आमच्या लक्षात यायला हवा - गुरुची आवश्यकता काय?
आंम्हाला वाटत असतं आंम्हाला वाटतं तेच ९९ वेळा करणार आणि त्यातून जे १०० घोटाळे निर्माण होतात ते त्याने निस्तरावेत. परमात्मा भर्गलोकातून interfere करू शकत नाही, आणि त्याला जेव्हा आपल्या जीवनात interfere करावासा वाटतो तेव्हा तो सद्गुरु बनून येतो. आम्हांला प्रश्न पडतो बाबा शिरडीत आहेत मी तिथपर्यंत कसा पोहचणार, मला कसं कळणारं काय चूक, काय बरोबर? तर ज्या प्रमाणात तुमचा सद्गुरु चरणांवर विश्वास त्या प्रमाणात तुम्हांला उत्तर आपोआप मिळतं काय चूक आणि काय बरोबर आहे त्याचं, जेथे असाल तेथे.
ह्या १३ अवस्था आपण पाहिल्या. मंत्राची पदं तीन आहेत, मध्यभागी दत्तात्रेय आहेत. दत्तात्रेयांची तीन मुखं म्हणजेच गुरुक्षेत्रम् मंत्राची तीन पदं. तीनही मुखं एकाचीच आहेत, त्यांची कामं ते जाणतात, त्यांना नाव देण्याची आवश्यकता नाही. मंत्राची तीन पदं हीच दत्तात्रेयांची तीन मुखं आहेत हे लक्षात घ्या. दत्तगुरु म्हणून आजोबा असताना व दत्तात्रेय म्हणून नातू असताना ह्याचा तीन अंकाशी जवळचा संबंध आहे.
दत्तगुरु म्हणजे निर्गुण(गुण नाही असा), निराकार(आकार नाही असा), निरावयव(अवयव नाही असा).
दत्तगुरुतच आहे पण तरी वेगळी अशा रुपात आदिमाता म्हणजे अदिती ती अप्रगटरूपात दत्तगुरुंमध्येच असते. दत्तगुरु आहेत, त्यात अदितिआहे मग तिसरी गोष्ट काय आहे? हनुमंत, परमात्मा आहेच पण ती वेगळी गोष्ट. मग तीसरी गोष्ट कोणती? ती गोष्ट आहे परब्रह्म. जे परब्रह्म तोच दत्तगुरु तीच अदिति. प्रोटॉन - न्युट्रॉन - इलेक्ट्रॉन अवस्था. अदितिची प्रगट रूपं गायत्री, महिषासूरमर्दिनी, अनसूया
दत्तगुरुच नातू म्हणून अनसूयेच्या पोटी दत्तात्रेय म्हणून आणि अंजनामातेच्या पोटी हनुमंत म्हणून जन्माला येतात. Vertical direction मध्ये तीन अवस्था आहेत.
गायत्रीबरोबर प्रकटला तोच ॐकार आहे. : अ + ऊ + म
ह्यात अक्षरे तीन आहेत पण मात्रा साडेतीन आहेत. ॐ - तीन आकडा नंतर वर अर्धचन्द्र व नंतर काढले जाते ते ब्रह्म पुच्छ आहे. ह्या आकृतीवरून आपण स्वत:ची क्षमता प्रकट करत असतो.
हे पुच्छ जेव्हा वरच्या दिशेला वळलेलं असतं तेव्हा धारणा असते - देवा मी तुझ्याकडे येतो, तेव्हा सगळी जबाबदारी आपली असते.
जेव्हा हे पुच्छ खालच्या दिशेला असतं तेव्हा धारणा असते - देवा, तुझ्यापर्यंत येण्याची माझी capacity नाहीए, तू माझ्याकडे ये, तू माझ्याकडे आलेला आहेसच.
ब्रह्मपुच्छ उर्ध्व(वरच्या) दिशेला फक्त चण्डिकाकुलातील सदस्यच काढू शकतात. जे चण्डिकाकुलाच्या समोर असतात ते अध:(खालच्या)दिशेला ब्रह्मपुच्छ काढतात.
देवा मी स्वत:च्या प्रयासाने वरपर्यंत जाऊ शकत नाही, पण मला माहीत आहे, तू माझ्यासाठी खाली येतोस, खाली आलेला आहेसच ही भावना म्हणजे शारण्य. हीच शारण्याची पहिली पायरी आहे. अंकुरमंत्र शारण्याला अंकुर फोडतो, म्हणून कमीत कमी अंकुरमंत्र १०८ वेळा केला तरी चालतो. ह्या अंकुरमंत्रात राम आहे, रामात्मा दत्तात्रेय आहे, रामप्राण हनुमंत आहे, रामवरदायिनी महिषासुरमर्दिनी आहे ही सगळी चण्डिकाकुलातील चढत्याक्रमाने शारण्य स्वीकारलेली मंडळी आहेत.
ॐ रामनामतनु श्रीअनिरुद्धाय नम: - अनिरुद्ध म्हणजे त्या आदिमातेच्या चरणाशी पूर्ण शारण्य, एकरूपता. जो तिचा चरण, पद, पदन्यास झाला तो अनिरुद्ध.
सद्गुरुतत्त्वाला शरण जाणे जे नुसतं पुस्तकं वाचून जमत नाही, आमच्या हातून अनेक चुका होतच असतात. म्हणून त्या सद्गुरुतत्त्वाला शरण जाण्यासाठी हा अंकुरमंत्र महत्त्वाचा आहे.
आणखी एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. आपण सगळे गुरुक्षेत्रम्मध्ये अत्यंत प्रेमाने येतो. तिथे महिषासुरमर्दिनीला, दत्तात्रेयाला, त्रिविक्रमाला, धर्मासनाला बघतो, चण्डिकाकुलाला बघतो त्यांना वंदन करतो. ह्या गुरुक्षेत्रम्मध्ये उदी आहे, हरिद्रा आहे सगळं काही आहे. पण त्याच्याही पलीकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथे कॅमेरा आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय बापू आम्हांला ते दिसतच आहेत. पण जे दिसताहेत ते कॅमेरे engineers नी लावलेले आहेत. आणि हा कॅमेरा डॉक्टरने लावलेला आहे. जेव्हा तुम्हाला तुमची identity prove करायची असते तेव्हा, फोटो काढण्याची आवश्यकता भासते.
हा कॅमेरा जो कोणी गुरुक्षेत्रम्मध्ये येतो आणि त्या धर्मासनावर डोकं टेकताना, वाकून नमस्कार करताना त्याचा फोटो काढतो, पण जेवढ्या प्रमाणात धर्मासनावर बसणार्यावर प्रेम तेवढ्या प्रमाणात फोटो काढला जातो.हा फोटो तुमच्यामध्ये "काय आहे?" ह्याची तुम्हांला ओळख पटवून देतो. मनुष्याला नेहमी आपल्यात "काय नाही आहे" ह्याची ओळख चांगली असते, पण आपल्यात "काय आहे" ह्याची ओळख कधीच नसते. हा कॅमेरा प्रत्येक माणसाला स्वत:मध्ये काय आहे ह्याची ओळख पटवून देतो. ज्याक्षणी तुम्ही धर्मासनासमोर वाकता व त्यावर डोकं ठेवता त्याक्षणी तुमच्यात काय आहे ह्यांचा फोटो काढला जातो, आणि तो फोटो fix होतो तुमच्या मनात, अंत:करणात आणि बुद्धीत.
हा फोटो तुमचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, अभावाचं रूपांतर भावात करणारा आहे.
अंकुरमंत्र तुमचा आत्मविश्वास वाढवतो. शारण्याच्या बरोबर आत्मविश्वासाचा अंकुर अंकुरमंत्र फोडतो. गुरुक्षेत्रम् मंत्र कुठेही म्हणा हा कॅमेरा काम करणार. गुरुक्षेत्रम्मध्ये येऊन धर्मासनासमोर म्हटला तर जास्त चांगलं. मग मुंबई बाहेरची लोकं म्हणतील आम्हांला रोज गुरुक्षेत्रम्मला यायला कसं जमणार? तर मी (परमपूज्य बापू) फक्त मुंबईचा नाहीए. मी (परमपूज्य बापू) गोव्याचाही आहे, अफगाणचाही आहे, इराणचाही आहे, अमेरिकेचाही आहे मी सगळ्यांचा आहे आणि सगळे माझे आहेत आणि हे जेव्हा हळूवारपणे होताना दिसेल तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका. कुठेही असा धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र, गुरुक्षेत्र ह्यांतला फरक टाळायचा असेल तर गुरुक्षेत्र धरा तुमच्या चित्रातलं धर्मासनही हे काम करतं.
बर्याच वेळा सूचनापेट्यांद्वारे प्रश्न असतो, बापू आम्ही बाहेरगावी असल्यामुळे पूजन करता येत नाही. अशा वेळी एक कागद, पेन/पेन्सिल घ्या त्याने कागदावर त्रिविक्रमाचे चित्र काढा त्या चित्राखाली "माझा अनिरुद्ध" "My Aniruddha" असं लिहा, पाहिजे ती पूजा करा त्या देवापर्यंत पूजा पोहचवायचं काम मी करीन. "माझा अनिरुद्ध" असं लिहिलं की सगळी जबाबदारी माझी. मी कुरीअरचं काम करेन. पूजन झालं की तो कागद दुसर्या दिवशी विसर्जन करा. जिथे कुठे मूर्ती available नसते, तेव्हा अशी पूजा करायची. तुमची पूजा जिथे पोहचवायची आहे तिथे पोहचविण्याचे काम मी १०८ टक्के करेन, प्रेमाने.
॥ हरि ॐ ॥