॥ हरि ॐ॥
॥ ॐ मंत्राय नम: ॥
॥ ॐ रामात्मा श्री दतात्रेयाय नम: ॥
अंकुर मंत्राचे प्रथम पाद चालू आहे. आपण रामभरोसे शब्द वापरतो. रामभरोसे हा शब्द केव्हा वापरला जातो? ज्याचा जराही आगा पिछा माहीत नाही तरीही अधिक विचार न करता विश्वास ठेवून पुढे जाणे म्हणजे म्हणजे रामभरोसे. कुठेतरी भारतीय संस्कृतीला माहिती आहे की रामावर विश्वास ठेवला की सगळं सुरळीत होतं, मार्ग सुकर होतो.
कुठलीही भाषा असली तरी जेव्हा माणूस मृत्यू पावतो. तेव्हा "राम" उच्चारले जाते. भूत/तत्सम काही भयावह दिसलं की राम राम राम राम म्हटलं जातं. म्हणजेच काय जेव्हा भीती वाटते तेव्हा रामानाम उच्चारले जाते. खरं सांगतो जो रामभरोसे जगतो तोच खरा जगतो.
राम : ह्या विश्वातील पुरुषार्थ करण्याचा मूळ स्त्रोत म्हणजे राम. (येथे पुरुष म्हणजे आत्मा) रामभरोसे पुरुषार्थ करण्यासाठी जे सामर्थ्य लागते, त्या सामर्थ्याचा मूळ स्त्रोत म्हणजे राम. एखादा जीव स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला आल्यावर त्याला त्याच्या जीवनात ध्येय गाठण्यासाठी जे प्रयास करावे लागतात त्यासाठी जे साधन लागते, अक्कल लागते ते सारं मिळून होतो तो पुरुषार्थ व ह्या सामर्थ्याचा स्त्रोतच राम आहे.
असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी ही म्हण पूर्णत: खोटी आहे. असा ज्याचा विचार असेल त्याच्यासाठी हरि काहीही करणार नाही. रामाला आपण काय म्हणतो? मर्यादा पुरुषोत्तम!
मर्यादापुरुषोत्तम म्हणजे काय? तर जे जे उचित ते ते करणारा. जेवढे उचित तेवढेच करणारा. हे खरं रामाचं सामर्थ्य आहे.
प्रत्येकाच्या शरीरात अन्न खाल्ल्यानंतर आयुर्वेद काय सांगतो. अन्नापासून रसादि सप्त धातू रस - रक्त - मांस - मेद - मज्जा - अस्थी - शुक्र क्रमाने बनतात. ह्यातील शेवटच्या शुक्र धातूला कार्याविन्त करणारा ओज हा दिसत नाही. ओज म्हणजे DNA चे Energy coatil हे ओज फक्त रामाच्या माध्यमातूनच मिळते. (परमात्म्याच्या कृपेनेच प्राप्त होते) शुक्राचे सर्वच्या सर्व कार्य नीट चालावे यासाठी ओज आवश्यक असते. परमात्मा ठरवतो, कोणाला किती ओज द्यायचे ते. ते परमात्मा तीन गोष्टींवर ठरवतो.
१) मनुष्य किती मनुष्याप्रमाणे वागतो / प्राण्यासारखा वागतो. त्याप्रमाणात ओज परमात्म्याकडून मिळते. ज्याप्रमाणात माणुसकी, त्या प्रमाणात ओज.
२) तुम्ही तुमच्या कार्यासाठी प्रयास किती करता?
३) तुमची चण्डिका कुलावर व पावित्र्यावर किती श्रद्धा आहे त्यानुसार ओज प्राप्त होते. In this world you are not judged by your performance but by your faith.
आदिमातेकडून तुमची पारख केली जाते. ती तुमच्या performance वरून होत नाही तर श्रद्धेवर ठरत असते.
शाळेमध्ये/ बाह्य जगात तुम्हांला तुमच्या performance वर judge केले जाते. प्रत्येक मनुष्य दुसर्याला पारखत असतो, judge करत असतो. लग्नातसुद्धा बघा आपण दुसर्यांना पारखत असतो. हल्लीच्या लग्नाच्या वेळी सकाळी नवरा मुलगा व मुलगी सोबत मोजकी घरची मंडळी असतात. नंतर इतर कुटुंबातील मंडळी फक्त अक्षता टाकायच्या वेळी येतात. का? कारण आमच्यातील प्रेम कमी झाले. जेवढं modern जग बनलं तेवढी जिव्हाळा, आपुलकी कमी झाली.
बरेच जण म्हणतात, आम्ही कर्तव्यात चुकलो नाही, अशांना कानाखाली वाजवावीशी वाटते. प्रत्येक गोष्ट का करायची? वाहवा मिळवण्यासाठी, आम्हांला कुणी दोष देऊ नये म्हणून, आमच्यात कुणी खोट काढू नये म्हणून. कशासाठी? चांगले काम करताना, लोक तुम्हाला काय म्हणतील ह्याचाच विचार असतो. हेच मनुष्य हल्ली पारखतो. एकमेकांना पारखताना तो स्वत:ला मात्र पारखायला विसरतो. आपल्या capacities मर्यादित असतात. आपण आपल्या क्षमतेनुसार पारख करायची पण हे लक्षात ठेवायचे की जगसुद्धा आपल्याला पारखत असतं. जसं आपण इतरांबद्दल मत बनवतो तसंच तुमच्याबद्दल इतर मत बनवत असतात. मला उचित काय आहे ते कळलं पाहिजे. लोकांनी चांगले म्हणावे म्हणून जीवनात काही करु नका. चुका होऊ शकतात. जोपर्यंत तुम्ही चांगल्याला चांगले म्हणता व वाईटाला वाईट म्हणता, चुकीला चूक म्हणता तोपर्यंत तुम्हांला क्षमा मिळू शकते. जेव्हा मी वाईट वागतच नाही असा विचार करता तेव्हा तुम्ही क्षमेच्या प्रांतातून नियमांच्या प्रांतात येता. आम्ही फेसबुक वर connected राहतो. पण लग्नसमारंभात एकत्र आल्यावर आम्ही interact होत नाही, एकमेकांमध्ये मिसळत नाही, जल्लोष नाही. नाती-गोती, प्रेमाची बंधनं श्रद्धा ह्या गोष्टी व्यवहाराच्या मापदंडातून पारखायच्या नसतात. आपले आई-वडील जवळची नाती ह्यांच्याशी वागताना तराजू घेऊन बसू नका.
कोण चुकत नाही? प्रत्येकजण कधीतरी चुकतच असतो. आपण चुकतोच ना? मग समोरच्याला धोपटतच रहायचं हा कोणता नियम. एकमेकांच्या चुका झोडपत राहण्यापेक्षा समजून घेण्यात आनंद असतो. कुणी बोललं तर त्या गोष्टी धरुन ठेवायच्या नसतात. अशावेळी साध्या-सुध्या गोष्टी रामभरोसे सोडून द्यायच्या. एकमेकांवर उत्कटतेने प्रेम करण्यासाठी सुद्धा ओज लागते. प्रेम म्हणजे वासना नाही. ज्याच्याकडे ओज नाही त्याला प्रेम करता येत नाही. प्रेम नाही तेथे ओज नाही. त्या परमात्म्यावर प्रेम करा. चण्डिकाकुलावर प्रेम करा.
तुम्ही जे काही त्याच्याशी फोटोसमोर वा मूर्तीसमोर बोलाल त्याला ती मूर्ती काहीच करणार नाही, तुम्हांला मारणार नाही, की तुम्ही ज्याच्याबद्दल बोललात त्याला जाऊन सांगणार नाही.
पण तिथे आम्ही काय करतो - देवा जर माझी मुलगी पास झाली तर तुला, एक किलो साखर देईन. देवाशी कसला व्यवहार करता? इथे जर-तर नको. समजा मुलगी fail झाली तरी देवासमोर जाऊन सांगता आले पाहिजे, की देवा तू नक्कीच काहीतरी चुकीचे दुरुस्त करत आहेस. हा विश्वास हवा, तसे रामभरोसे असायला हवं.
बरेच जण गुरुवारी ब्रोच लावतात एरव्ही लावत नाहीत. मला प्रश्न विचारला असे का करतात? पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, ब्रोच लावला आणि मनामध्ये तो नाही तर काय उपयोग? ब्रोच लोकांना दाखवायाला लावत असाल तर लावू नका, ती शोभेची गोष्ट नाहीये. उदी, लॉकेट, मंगळसूत्र हया शोभेच्या गोष्टी नाहीत. त्यांच्यामागे भाव हवा. मंगळसूत्र समजा एखाद दिवस काढून ठेवले म्हणजे नवरा बाजूला ठेवला असे होत नाही. मंगळसूत्राचे पावित्र्य स्त्रीला जपता आले पाहिजे. तुम्ही काय करता आणि तुमच्या देवाला काय आवडतं ते महत्वाचं.
ब्रोच बद्दल अनेकांनी सूचना पेटीतून प्रश्न विचारले, म्हणून लक्षात ठेवा, दुसरा काय करतो त्याचा तुमचा काय संबंध? कुणी खोटा वागतो, ह्याचा तुम्ही विचार करू नका, जे चुकीच्या गोष्टी करतात, त्यांना इथे स्थान नाही. तुम्ही फक्त गुरुवारी दाखविण्यापुरते ब्रोच लावून आलात, तर अशा ब्रोचकडे मी बघत नाही. मी तुमच्याकडे कधीच बघत नाही, जे पवित्र संकेत आहेत, त्यांच्याकडे मी बघतो. तुमचं प्रेमाने घातलेलं लॉकेट तुमच्या कपड्याच्या आत, तुमच्या पाकिटात जरी असले तरी मी त्याच्याकडे बघतो आणि जे द्यायचे त्याला ते देतो. ब्रोच जर बाहेर लावत नसाल तर नुसतं गुरुवारी लावून येऊ नका.
मी खडूस आहे, हे सांगायला मला जराही लाज वाटत नाही. तुम्हांला आवडेल असं वागायला मी इथे बसलो नाही. अख्खं जगं जरी माझ्या विरोधात गेले तरी मला काही फरक पडत नाही. अगदी सगली भूतं-पिशाचं जरी सगळी शस्त्रे घेऊन एकत्र आले आणि त्यांनी मला लढायला बोलावले. तर त्यांना बघायला माझ्याशिवाय अन्य कुणी नसेल.त्या चण्डिकेला जसं आवडेल असं माझ्या बाळांनी वागावे, ह्यासाठी मी इथे बसलो आहे. म्हणून गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणा. कलियुगात तुमच्या प्रत्येक जन्माचे दैवत ह्या गुरुक्षेत्रम मंत्रात आहे. भूतकाळदेखील बदलण्याची क्षमता फक्त गुरुक्षेत्रम् मंत्रात आहे.
जो त्रिगुणात आला तो दत्तात्रेय त्रिमितीच्या पलीकडे येऊन तसेच त्रिगुणात राहून सहाय्य करणारा दत्तगुरु, रामाचा आत्मा आमच्या सोबत आहे. मग तुम्हाला काय कमी आहे. तुम्ही म्हणता आम्ही नवस करतो पण जेव्हा ही सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा तुम्ही काय form घेऊन गेला होता? तुमचा जन्म तुमच्या कर्माने झाला असेल पण तो होतो ते तिच्या इच्छेनेच. तिच्या इच्छेनेच सर्व विश्वपसारा उत्पन्न झाला. ती व तिचे तीन पुत्र ह्याशिवाय अन्य कुणाला ही हे विश्व कसे चालते हे समजू शकत नाही.
एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा।
सूचना पेटीत एक प्रश्न गेले तीन महिने वारंवार आला की,२१ डिसेंबरला जगबुडी होणार का? तर २१डिसेंबर ला जगबुडी होणार नाही. साधी गोष्ट आहे. बापूंनी सांगितले आहे. २०२५ ला काहीतरी होणार आहे. अगदी त्सुनामी ची लाट आली तरी तुम्हाला काहीही न करता ती परत जाईल, कारण जो महाप्रलय करणार आहे त्याने २१ डिसेंबरला जगबुडी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
॥ हरि ॐ॥