॥ हरि ॐ॥
ॐ मंत्राय नम: श्रीगुरुक्षेत्रम् मंत्राच्या अंकुरमंत्राचा पहिला पार्ट ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम: बीजमंत्र झाला, अंकुरमंत्र चालू आहे. पुढे उन्मीलन मंत्र आहेच. बापू एकेक ग्रंथ लिहितच राहिलेत, आम्ही नक्की काय-काय करायचं? बापूला म्हणजे काही काम नाही, असे वाटत असेल तुम्हांला म्हणून सांगतो, मातृवात्सल्यविन्दानम् आईची ओळख करून देणारा आहे, तर मातृवात्सल्य उपनिषद् आईच्या जवळ नेणारे आहे.
पण एवढे सगळं का करायचे? साधी-सुधी भक्ती केली तर नाही का चालणार? नक्कीच चालेल पण त्यासाठी आम्ही साधे-सुधे आहोत का? ह्याचा विचार करा. तुकारामाचा एक अभंग आहे. माझी बायको किती साधी. बायको म्हणते, तुमची आई सकाळी लवकर उठून उगाचच अंगण झाडते, देवाचे नाव घेत बसते. सकाळची माझी झोप मोडते. मी उठून बसते, सासूला बोलवून माझा घसा सुकतो. तरीही ती येत नाही. मला थंड पाणी देते, माझं तोंड धुवून येईपर्यंत फक्त भाकर्या भाजते. तुकाराम म्हणतात, बाई ग भोळी ग भोळी. ह्यात सांगतात कसा माणूस सत्य-असत्याचा विपर्यास करतो पण म्हणून स्वत:ला दोष देत बसू नका.
जो मनुष्य maximum देवाच्या मार्गाने चालायला बघतो, त्याचेच खरे भले होते. काहीतरी हेतूशिवाय मी(परमपूज्य बापू) कुठलीच गोष्ट करत नाही. जगात सगळ्यात पापी, खोटारडा, मनुष्य कोण असेल तर मी(परमपूज्य बापू).गेल्या १५ दिवसांत आपण बघतोय की ह्या सार्वभौम, लोकशाहीच्या देशात एका स्त्रीची किती दैना घडते. तुमचे पित्त खवळलेले मी बघितले, तुमच्या मुठी आवळल्या गेल्या मला आनंद वाटला. पण एक सांगतो जरी स्त्री-पुरुष भेद असेल, तरी त्यांच्या नशिबात भेद नाही. अन्याय करणारा व शोषण होणारा ह्या दोनच जाती मी मानतो.
जिला प्राण गमवावे लागले तिचे काय? त्याला शिक्षा होईल तेव्हा होईल पण तिचे काय? दिवसा-ढवळ्या चालू बसमधे जर इतके भयानक प्रकार घडतात तर कुठेही काहीही घडू शकतं.
आज प्रत्येकाच्या मनात भीती आहे, आमची मुलगी परत सुखरूप येईल नां? त्यासाठी आम्ही काय करायचं? तर इथे एक सांगतो.
कलम १) :
जो शोषित आहे. जी बलात्कारित स्त्री किंवा पुरुष आहे त्याने जर -अनिरुद्ध चलिसा दररोज १०८ वेळा अकरा दिवस म्हटली तर हे कृत्य करणारा नपुंसक होईलच होईल. एवढेच नाही तर त्याची नपुंसकता जगाला कळेल व त्याची सर्वत्र छी: थू होईल.
कलम २) :
जी स्त्री व जो पुरुष गुरुक्षेत्रम् मंत्र रोज पाच वेळा म्हणेल त्याच्यावर कोणीही बलात्कार करू शकणार नाही.
कलम ३) :
ज्यांना भीती वाटत असेल की आपल्यावर बलात्कार होऊ शकतो त्याने उपनिषद् मधील शिवगंगागौरीचे दोन अध्याय एकदा तरी वाचा त्यामुळे भीतीचे कारण दूर होईल आणि भीती उरणारच नाही. भय ताबडतोब नाहीसे होईल.
कलम ४) :
ज्यांना लिहितावाचता येत नसेल, मंत्र म्हणता येत नसेल त्यांनी मनातल्या मनात फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हणा, ते सर्व गोष्टींची काळजी घेईल.
कलम ५) :
अहिल्यासंघातून तुम्हांला असं training दिलं जाईल की तुम्हाला त्रास देणार्या व्यक्तीला तुम्ही पाच सेकंदात गारद कराल. अवघ्या पाच सेकंदात जागच्या जागी कायमचा छक्का बनवू शकाल. तुम्ही तीस किलो वजनाच्या असाल, तापातून उठला असाल, अंगात त्राण नसले, दोन पावलं चालायची ताकद नसेल तरीही हे करू शकता. आम्ही बापूंच्या लेकी आहोत, आम्हाला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. फक्त माझ्याकडे खोटं बोलायचं नाही, खोटं बोललात तर ह्यातलं काहीही होणार नाही.
माझा शद्ब आणि तुमचा भाव पुरेसा आहे कुणालाही कापून काढायला. समजलं पाच कलमं लक्षात ठेवा आणि कोणाच्याही बापाला न भिता पुढे जा. जे काही करायचंय ते शांतपणे करायचे त्यासाठी मोठ्या गर्जना करायची, बंदूक घ्यायची आवश्यकता नाही. भीतीचा बाऊ करू नका. सुखाने, मोकळेपणाने श्वास घ्या.
ॐ रामप्राण श्री हनुमन्ताय नम:
राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. सर्व मर्यादा पाळणारा, घालून देणारा आणि मर्यादा पालन करून घेणारा. अशा रामाचा प्राण हनुमंत आहे म्हणजे काय तर हनुमंत म्हणजे मर्यादा पाळण्याची ताकद देणारा आहे.
रामप्राण : मर्यादा पुरूषोत्तमाचा प्राण. पावित्र्य हेच प्रमाण.
आमच्या पावित्र्यावर जो कोणी हल्ला करत असेल, तर तो माझं रक्षण करणारच आहे. त्यासाठी लढण्याची ताकद हनुमंत पुरवतो तुम्हाला जे काही चांगलं करायचं त्यासाठी लागणारी ताकद हनुमंत पुरवतो. मर्यादा पालनाची ताकद, वृत्ती देणारा हनुमंत.
समजा आपल्या अंगात आळस भरलेला आहे. आळशीपणा दूर व्हावा ह्या इच्छेने जरी गुरुमंत्र म्हटला तरी ते घडेल. जे जे कौशल्य हवे असे तुम्हांला वाटते त्या बीजांना अंकुर फोडण्याचे काम हा अंकुरमंत्र करतो. ज्याने गुरुक्षेत्रम् मंत्राला आपलेसे केले त्याच्या भाजून जळलेल्या बीजालाही हा मंत्र अंकुर फोडण्याचे काम करेल.
परमेश्वर कळायला विद्न्यानाचा प्रवास किती झाला? १९०० सालात जे सिद्धांत मांडलेत ते १९५० साली मोडले गेलेत, सायन्स अधिक प्रगत होत गेले. सायन्स आजच्या स्पीडमध्ये प्रगत होत गेले तर त्यांना देव कधी समजेल? न्यूटन लॉ ते आतापर्यंतची प्रगती किंवा प्रकाशाचा वेग ते गॉड्स पार्टिकल्स ही सायन्सची प्रगती फक्त दहा फुटा इतकीच आहे आणि परमेश्वर दोन मैल दूर आहे. आमच्या नशिबातली बीजं जळलेली असतील तरी त्यांना जिवंत करता येतं, पण त्यासाठी विश्वास असायला हवा, विश्वासाशिवाय काहीही शक्य नाही.स्वामी समर्थांच्या बखरीत एक गोष्ट येते, विहीरीला पाणी नव्हते तिथे स्वामींनी लघुशंका केल्यावर ती विहीर पाण्याने भरली, साईबाबांनी बिब्बे टाकून डोळे बरे केलेत - सद्गुरुतत्त्वाची ताकद आहेच, पण तुमचा विश्वास असायला हवा. मीराबाई, सखुबाई, नामदेवांसारखी भक्ती तुमच्या जवळ असायला हवी अशी माझी(परमपूज्य बापू) इच्छा नाही. मी तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा करत नाही, मी कोणाकडूनही काहीही अपेक्षा ठेवत नाही. पण माझी इच्छा मात्र आहे, तुम्ही सुखी व्हावं. काल तुम्ही होता त्यापेक्षा आज कणभर जरी सुधारलात तरी भरपूर आहे. तुम्हाला वाल्याचा वाल्मिकी ऋषी बनायचं नाही. चांगलं वागण्यात, भक्ती करण्यात आम्ही मागे पडत नाहीत ना? हे बघा, तुम्ही मागे सरकत-सरकत तुमचा कडेलोट होत असला तरी तुमचा बाप तुम्हाला सांभाळेल. आमचा बाप आमचा कडेलोट होऊ देणार नाही - हा विश्वास बाळगा. काहीही झालं तरी तो मला टाकणार नाही, ही गोष्ट म्हणजे विश्वास. हा गुरुक्षेत्रम् मंत्र जिवी धरुन ठेवा. ज्यांना येत नाही त्यांनी अनिरुद्ध अनिरुद्ध म्हटलं तरी चालेल. पण लिहिता-वाचता येत असेल तर बाकीच्या गोष्टीही कराव्याच लागतात.
तुमचा बाप राजा आहे म्हणून तुम्ही राजकुमार आणि राजकुमारी आहात. त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील पण त्याच बरोबर युवराज आणि युवराज्ञी म्हणून तुमच्या जबाबदार्याही आहेत.
तुमचा बाप स्मशानभूमीचा राजा आहे जिथे प्रत्येक वाईट गोष्टीला जाळलं जातं मग तो देश असो, राज्य असो काहीही असो, एका क्षणात तो देशाचं, राज्याचं स्मशान करु शकतो ही माझी प्रतिज्ञा आहे. अनंत वर्षापूर्वी माझ्या आईच्या चरणी केलेली आहे. म्हणून सांगतो लेकिंनो घाबरु नका, मी सदैव तुमच्याबरोबर आहे.
॥ हरि ॐ॥