॥ हरि ॐ ॥
ॐ रामप्राण श्रीहनुमंताय नम: । "राम" शद्ब आपण किती वेळा म्हणीत, वाक्प्रचारात वापरतो जीवनात. "जीवनात राम नाही", "त्याने राम म्हटला", "आता राम म्हणण्याची वेळ आली, त्याने राम राम केला, " "रामभरोसे" "रामबाण उपाय"- राम म्हणजे अगदी perfect म्हणजे होणारच. राम हे नाम खात्रीचं सर्वांसाठी. भारताच्या जनमानसात हा राम किती खात्रीचा झालेला आहे. इतर कुठल्याही देवीचं, परमात्म्याचं दुसरं कुठलंही नाव म्हणी-वाक्प्रचारात वापरलं जात नाही. सगळ्या म्हणी-वाक्प्रचार फक्त रामानामाशी निगडित आहे. हे कसं घडतं? हे आपोआप घडत नाही वा मुद्दामहून घडवलं जात नाही कारण भारतीय संस्कृतीचं जे नातं जुळलंय रामाशी, रामानामाशी. पिढ्यानंपिढ्या रामनामाचा जो प्रभाव मानवी मनावर घडत आलाय त्यातून हे घडत आलंय. ही मानवाची नाही, तर रामनामाची क्रिया आहे.
पूर्वी उठण्यासाठी अलार्म करण्यासाठी घड्याळे असायची. ती जुनी घड्याळं खास गजराची एकदाच वाजायची पण जोरात वाजायची, आणि ती आपोआप बंद व्हायची. आता मोबाईलमध्ये अलार्म दर ४-५ मिनिटाने वाजत राहतो. पूर्वी भिंतींवर लांब लोलक असलेली घड्याळे असायची. दर तासाला जेवढे वाजायचे तेवढे ठोके होत. मी ज्याठिकाणी वाढलो परळ लालबागला, तिथे ठराविक तासानंतर भोंगे व्हायचे. सर्व लालबागमधले जीवन त्या भोंग्याच्या आवाजाशी जोडले गेले होते. प्रत्येकाने आपापली जीवनशैली त्या आवाजाशी जोडली होती त्यामुळे शिस्त होती. माणसाचं जागणं हे ध्वनीशी निगडित आहे. मनुष्याचं जागेपणाचं आणि ध्वनीचं उत्कट नातं आहे. मनुष्य जागा असताना बोलतो, त्याचप्रमाणे झोपेतही प्रत्येकजण बोलत असतो. दिवसाचं बोलणं आणि रात्रीचं बोलणं ह्यात फरक असतो. घोरण्याचा ध्वनी हा श्वाच्छोश्वासामध्ये येणार्या अडथळ्यामुळे निर्माण होतो. प्रत्येक घोरणार्या माणसाला वाटतं आपण घोरतंच नाही. कुत्रेपण घोरतात. आपण स्वप्नातही बोलत असतो. जो म्हणतो मला स्वप्न पडत नाही, त्याला पडलेली स्वप्न आठवत नसतात. पाच तासाच्या झोपेत अडीच तास स्वप्नं पडतच असतात. म्हणजे झोपेतही माणूस बोलतच असतो. काही माणसे मितभाषी असतात. पण तोंड बंद असलं तरी मन-बुद्धी बोलतच असतात. मनुष्य जेव्हा वाचेने बोलतो तेव्हा ध्वनी उत्पन्न होतो, मनात बोलतो तेव्हा विचारस्पंदनं तयार होतात. विचारस्पंदनं व ध्वनीस्पंदनं एकच आहेत. मात्र यात थोडा फरक आहे."मला आजपासून शिस्तीत जगायचे आहे"
हे तोंडाने बोलतो तेव्हा १०० ग्रॅम स्पंदनं तयार होतात.
हे मनातल्या मनात ओठ न हलवता हा विचार दृढपणे व्यक्त करतो तेव्हा १००० ग्रॅम स्पंदनं तयार होतात.
भगवंतासमोर उभं राहून त्याला प्रार्थना करून हा निश्चय व्यक्त करतो त्याची किती स्पंदनं मिळतील. ही शिवस्वरूप स्पंदनं. ‘शिवस्वरज्ञशास्त्र’ सांगते, भगवंताला पूर्ण शरण जाऊन मनापासून मनातल्या मनात ओठ न हलवता निश्चय देवासमोर व्यक्त करता तेव्हा इथे स्पंदनं तुमच्या निश्चयाला अनुकूल ठरतील तेवढीच तयार होतात. परमेश्वराशी बोलायचं असतं. मनातल्या मनात जे भगवंताशी बोलता त्यात किती ताकद आहे. निश्चयाला अनुकूल आणि प्रतिकूल अशी स्पंदनं जेवढी आवश्यक तेवढीच निर्माण करण्याची ताकद आहे. हीच खरी गोम आहे. तुम्ही जे मागत आहात तो निश्चय पार पडू नये अशी स्पंदनही तयार करतात. हे केव्हा होतं? जेव्हा तुमचा तुमच्या भगवंतावर पूर्ण विश्वास असेल तेव्हाच.
एक व्यक्ती भक्त नव्हती. त्यांना सांगितले की तुमच्या मुलाला नववीतच ठेवा, दहावीत नका घालू. पण तरीही त्यांनी न ऐकता त्याला दहावीत घातले. परीक्षा जवळ असताना त्याचे आजोबा गेले. घरात गोंधळ. दहावीला पास झाला, पण कमी मार्क्स मिळाले. कॉलेजची दैना झाली, पुढे चुकीची संगत लागली. आयुष्याला चुकीचे वळण लागले. त्या एका वर्षात आख्खं आयुष्य वाचवायची ताकद होती.
पण इथे भक्त असेल तर तो म्हणेल, भगवंताने जर माझं एक वर्ष खराब केलं तर चांगलंच आहे. भगवंत अशा भक्तासाठी अशी स्थिती तयार करतो की ते वर्ष तो तिथे थांबलाच पाहिजे. समजण्याची सगळ्यात मोठी शक्ती माणसाच्या डोळ्यांत आहे, पण तीसुद्धा मर्यादित आहे ना. पृथ्वीवर बघताना आम्ही किती लहानसा भाग बघतो. ठराविक अंतरापर्यंतच दिसतं ना! म्हणून परमात्मा तुमच्या निश्चयाला प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतो कारण त्याला सगळं माहीत असतं. आम्हाला वाटतं एवढी भक्ती करूनही माझ्या निश्चयासाठी प्रतिकूल परिस्थिती मिळाली. अशा वेळी प्रार्थना करताना म्हणायचं - "जे तुझ्या मनात आहे आणि माझ्यासाठी जे हितकारक आहे ते तू कर." त्याला तुमचं हित कशात आहे हे माहीत असतं.
तोंडाने उच्चारतो तेव्हा तेवढीच स्पंदनं फिरतात त्यांना विशिष्ट नियम आहे. Quantum Physics नुसार एका विशिष्ट वेळेनुसारच स्पंदने निर्माण होतात. एक विशि़ष्ट नियम आहे, आर्ततेचा हिशोब, कर्माचा हिशोब. तिथे तुमच्या पाप-पुण्याचा, मनाच्या त्यावेळच्या शांती-अशांतीचा, तुमच्या भल्या-बुर्या वागण्याचा हिशोब आहे. पण जेव्हा मनातल्या मनात चण्डिकेच्या, परमात्म्याच्या चरणांशी विचार केंद्रित करून प्रार्थना करता, तेव्हा त्याची स्पंदनं किती व कुठली बनवायची ह्याला कुठलाही हिशोब धरला जात नाही, तेव्हा तुमच्यासाठी उचित तेच घडतं हा चण्डिकाकुलाचा न्याय आहे.
भौतिक स्पंदनात भौतिकतेच्यापलीकडे राम आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची आपली ताकद नसते. ग्रंथामधून आपल्याला माहीत आहे की प्रत्येक मनुष्याचं मन हे परमेश्वरी मनाशी जोडलेलं आहे. तोंडाने बोलणं आणि मनाने बोलणं यात फरक काय? तुमच्या कोणत्याही भौतिक क्रियेमध्ये मनात शिरण्याची ताकद नसते. आपल्या मनात लाखो विचारतरंग येतात. मुखाने केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत पोहचण्यासाठी ती मनात शिरली पाहिजे. आपल्याला इथे कळलं पाहिजे भौतिक क्रियेद्वारे भगवंताशी जोडून घेण्याची आपली capacity नाही. परमेश्वरी मनाशी आमचं मन जोडलेलं असतं म्हणून ते सहजतेने घडतं.
इथे विश्वास मी explain करणार आहे. पूर्ण विश्वास म्हणजे काय? म्हणजे एकच गोष्ट, साधीसुधी गोष्ट - "जमेल त्या ज्या त्या क्षणाला जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त विश्वास." मग प्रत्येकाचा विश्वास वेगळाच असणार. मनामध्ये तुमच्या जेवढा विश्वास आहे तो पूर्ण असतो. काल १०० ग्रॅम होता, आज ३० ग्रॅम झाला असेल तरी मोजत बसू नका. तुमचा विश्वास ती आदिमाताही मोजत नाही. जास्तीत-जास्त विश्वास ठेवण्याचे प्रयास करा. कारण तुम्ही सामान्य मानव आहात. त्यामुळे तुमचा १०८% विश्वास असू शकत नाही. माझा पूर्ण विश्वास असू शकत नाही कारण ती आदिमाता पूर्ण विश्वासापैकी तुमचा विश्वास किती ह्याला मार्क देत नाही.
पूर्ण विश्वास म्हणजे आदिमातेच्या पुत्रांचा तिच्यावर असणारा विश्वास. जसा परमात्मा तिचं बाळ आहे, त्याचप्रमाणे तुम्ही परमात्म्याची बाळं आहात. म्हणून तुम्ही तिचीही बाळं आहात. ती तुम्हाला परमात्म्याचे नियम लावत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा फोटोतून मला ह्यापुढे ऐकायचे नाही की आमचा विश्वास कमी पडतो. सगळेजण फक्त स्वत:ला दोष देतात. तुम्हांला माहिती आहे की, हा अनिरुद्ध तुम्हाला depression मधून बाहेर काढायला बसला आहे. इथे हरिगुरुग्राममध्ये आदिमाता बसली आहे. इथे येताना निराशेचे विचार घेऊन का येता? चुकलात तर आदिमातेला एकदाच सांगा की, मी चुकलो मला क्षमा कर. दहावेळा क्षमा मागायची गरज नाही. जर या अनिरुद्धावर थोडाजरी विश्वास असेल तर आठवा जरूर की काय-काय करायचं राहीलं? एवढंच आठवा गेल्या आठवड्यात बापूने सांगितलेलं काय काय करायचं राहीलं? पण त्यासाठी दु:खी होऊ नका. मोकळे व्हा. मला सुतकी चेहरे बघायला आवडत नाहीत.
बहिणाबाई चौधरींचं एक चांगलं गाणं आहे. त्या माहेराला जात असताना रस्त्यात ठेच लागते, तेव्हा त्या म्हणतात ‘त्यात काय झालं माहेरचाच दगड आहे.’ स्त्रियांनी माहेरी आल्यासारखं या. माहेरी मुलगी बिन्धास्त असते. लाड असतात तिचे. तसं रहा. गुरुवारी येताना तसं आलं पाहिजे. माझ्या माय-बापाला भेटायला आले. ‘माझे माहेर पंढरी’. आणि पुरुषांनी विचार करा ‘मी सात दिवस हॉस्टेलवर होतो, आज माझ्या माय-बापाला भेटायला जातोय.’ रिलॅक्स या. जेव्हा मी येताना दिसतो तेव्हा म्हणा, "बापूराया माझ्या डोक्यावर जे काही ओझं आहे ते तुला देतोय." मोकळेपणाने बसा, कारण ह्या मोकळेपणाशिवाय शांतता प्राप्त होऊ शकत नाही. शांतीशिवाय मनातल्या चांगल्या वृत्ती वाढू शकत नाहीत. अशांतीमुळे वाईट वृत्ती वाढतात आणि शांतीमुळे चांगल्या वृत्ती वाढतात. आपण जेव्हा चांगल्या कारणासाठी अशांत होतो तेव्हा वाईट वृत्तींनाच वाढवतो. ह्याला काही कारण नाही हे असंच होतं, असंच असणार.
राम म्हणजे परमात्मा - प्रथम ध्वनी, त्याचा प्राण असणारा शुभ्र प्रकाश म्हणजे दिगंबर दत्तात्रय म्हणजे हनुमंत. ध्वनीचा प्राण असणारा प्रकाश म्हणजे दत्तात्रेयरूपी हनुमंत. ध्वनी उत्पन्न होतो तो काहीतरी कार्य करतो. ध्वनीचं कार्य करण्याचं सामर्थ्य म्हणजे त्याचा प्राण. तुमचा प्राण म्हणजे तुमचं जीवन चालविण्याचं सामर्थ्य. ध्वनीचा प्राण असणारा प्रकाश म्हणजे हनुमंत. ध्वनीच्या कार्याला प्रकाशाची अत्यंत आवश्यकता म्हणजेच ॐ काराची प्रणवाची जी ताकद आहे ती हनुमंत आहे ती प्रकाशमय आहे. रामप्राण हनुमंत म्हणजे आमच्या मनातला प्रकाश. कारण मन कायम बोलतच असतं, तुम्ही जागे असा वा झोपलेले.
हनुमंत कसा आहे? - सदैव रामनाम घेणारा, रामाचा मोठा भाऊ असूनही रामाचा दास बनण्याची तयारी आहे, तो सतत रामनाम घेतोय. रामप्राण कोण? तर हनुमंत. म्हणजेच जे रामाचं सामर्थ्य आहे तेच रामनाम उच्चारते. जेव्हा रामनामाची वही लिहितो, हनुमान चलिसा म्हणतो तेव्हा मनात प्रकाश पडू लागतो.
इतर दिवसांपेक्षा, अमावास्येच्या दिवशी चंद्र नसतो तेव्हा लाखो चांदण्या दिसतात हे त्या परमात्म्याचे अकारण कारुण्य आहे.
आपण कितीदा खोटं बोलतो, खोटं वागतो, विसरलेलो असतो, चुकीचं समजतो हा सारा अंधार आहे. मनाचा अंध:कारमय भाग मोठा आहे. मनाच्या अधिष्ठानाने जो कार्य करतो तो मानव. मग ह्यासाठी आपल्या मनात प्रखर टॉर्च हवा, जो कधीच विझणार नाही. हे रामनाम हनुमंत नाम म्हणजे मनाचा टॉर्च. इतर वेळी हनुमंताचं नाव घेतो आणि गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणताना हनुमंताचं नाव घेतो यात फरक आहे. जेव्हा गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणताना हनुमंताचं नाव घेतो त्यावेळी मनातली टॉर्च एवढी चार्ज होते की ती बंद पडली तरी काम करते. कारण ती बॅटरी तुमच्या कृतीने चार्ज करीत नसता, तर तुमच्या कृतीने भुलून तो हनुमंत चार्ज करत असतो.
हा गुरुक्षेत्रम् मंत्र मोठ्याने उच्चारा, मनातल्या मनात म्हणा, लिहून काढा, मनापासून ऐका, तरी हा तुमच्या उच्चारानुसार किंवा भावानुसार स्पंदनं देत नाही, कार्य करत नाही तर हा स्कंद पूर्णच्या पूर्ण मंत्रात असल्याकारणाने तुमचं direct connection स्पंदन परमात्म्याशी जोडलेले असणार आणि तो तर कायम त्याच्या आईशी जोडलेला असतो म्हणजे तुम्ही आपोआपच तिच्याशीदेखील जोडले जाता. म्हणून गुरुक्षेत्रम् मंत्र मोठ्याने म्हणालात तरी तो मनातल्या मनात म्हटल्यासारखाच आहे.
एखाद्या पाप्याकडून जर कुणी हा गुरुक्षेत्रम् म्हणवून घेतला तर, त्या पाप्याला फायदा होईल व जो म्हणवून घेतो त्याला दसपट फायदा होईल. गुरुक्षेत्रम् मंत्र मनापासून म्हणणारा प्रत्येकजण हा त्या आदिमातेसाठी बाळ असतं. गुरुक्षेत्रम् मंत्र मनापासून म्हणणार्यासाठी हनुमंत सदैव त्या सूर्याकडे झेप घेणारा बाल हनुमंत असतो जो तुमचं connection थेट परमात्म्याशी जोडतं. त्या अनंताशी जे नातं तुम्ही जोडू शकत नाही ते जोडण्यासाठी.
अशक्य ते शक्य करीता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।
हा अभ्यास म्हणजेच गुरुक्षेत्रम् मंत्र.
॥ हरि ॐ ॥