॥ हरि ॐ॥
आज आपण अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम चा अहवाल पाहणार आहोत.
As on 15/01/2013 पर्यंत नोंद
A/c opened - १लाख, ५२ हजार, ८४४
एकूण रामनाम वह्या - २६ लाख, ७९ हजार, ६१४
एकूण अंजनामाता वह्या - २५ हजार, ५३१
रामनाम वही जप संख्या
१)राम नामाचा जप - ३१ अब्ज २५ कोटी, ५० लाख, १७ हजार, ६९६
२)श्री राम जय राम......- २ अब्ज २ कोटी, ५७ लाख, ८८ हजार, १८४
३)कृष्ण - ८ अब्ज १० कोटी, ३१ लाख, ५२ हजार, ७३६
४)दत्तगुरु - ४ अब्ज ५ कोटी, १५ लाख, ७६ हजार, ३६८
जय जय अनिरुद्ध हरि - २ अब्ज २ कोटी, ५७ लाख, ८८ हजार, १८४
एकूण जप संख्या :- ४७ अब्ज ४६ कोटी, १३ लाख, २३ हजार, १६८
अंजनामाता वही जप संख्या
ॐ श्रीपंचमुखहनुमन्ताय आंजनेयाय नमो नम:। - २ कोटी, २० लाख, ५८ हजार, ७८४
ॐ हरिमर्कटाय स्वाहा । - ९ कोटी, ९२ लाख, ६४ हजार, ५२८
श्रीमहाकुंडलिनी अंजनामाता विजयते। - २ कोटी, २० लाख, ५८ हजार, ७८४
ॐ अंजनीसुताय महावीर्यप्रमथनाय स्वाहा । - ३कोटी, ३० लाख, ८८ हजार, १७६
ॐ श्रीरामदूताय हनुमन्ताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:। - १ कोटी, ६५ लाख, ४४ हजार, ८८
एकूण जप संख्या :- १९ कोटी, ३० लाख, १४ हजार, ३६०
१५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : ३१७५
२५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : ७०५
३५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : २१६
४५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : ९४
५५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : ४२
६५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : २२
७५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : १०
८५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : ४
९५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : १
१०५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : १
११५१ वह्या लिहून पूर्ण करणार्या भक्तांची संख्या : १
आपला नंबर ह्यात कुठे आहे, ह्याचा प्रत्येकाने विचार करा. ॐ रामप्राण श्रीहनुमंताय नम: । हनुमंत हा सर्व भारतीय मनाला अतिशय आवडणारी गोष्ट. लहान मुलांना हनुमंताच्या गोष्टी ऐकायला आवडतात. सिनेमा पहायला आवडतो. साडेसातीला भिऊन का होईना हनुमंताचे दर्शन घेतले जाते. हा हनुमंत कसा आहे? हा जन्मत:च सूर्याकडे झेप घेणारा कशासाठी तर सूर्याला गिळण्यासाठी, रामेश्वर ते लंकेपर्यंतचा प्रवास एकाच उडीत पूर्ण करतो. द्रोणागिरी पर्वत अख्खा उचलून आणतो. एकटा सगळी लंका जाळतो.
साडेसातीमध्ये ह्याचे दर्शन का घेतले जाते? शनी सगळ्यांच्या पाठी लागतो. इतर देवांना छळायला गेला तर देव लपतात. जेव्हा महाविष्णूकडे जातो, तेव्हा महाविष्णू सांगतो, तू हनुमंताच्या मागे लागू नकोस, हा माझा भक्त चिडला, तर काही खरं नाही. शनि विचार करतो. शनि हनुमंताला सगळ्या प्रकारे त्रास देतो, पण त्याने हनुमंताला काहीही फरक पडत नाही. शनि विचार करतो हा रामनाम घेतो आहे, तेव्हा त्याच्या जिभेवर काटा/ सुई टोचूया. हनुमंताला ह्या विचाराने राग येतो. तो लहानग्या मर्कटाचे रूप घेऊन आपल्या शेपटीच्या टोकाला शनिला गुंडाळतो आणि झाडांवर दगडांवर उड्या मारतो. शनि सारखा वेगवेगळ्या ठिकाणी, दगडांवर आपटत राहतो. आपटल्यामुळे शनिचा चेहरा दर क्षणाला बदलू लागतो. शनि काकुळतीला येऊन हनुमंताला विनंती करतो. त्यावर हनुमंताने शनिला सांगितले, "जो कोणी माझा भक्त असेल, रामाचा भक्त असेल त्याच्या मागे तू लागणार नाहीस, त्याला तू अजिबात त्रास देणार नाहीस." शनिलासुद्धा सरळ करणारा हा हनुमंतच.
आयुष्यात कधी सुख-दु:ख, कंटाळा-उत्साह, यश-अपयशाचे प्रसंग बघावे लागतात. रामायणात आपण बघतो, हनुमंताच्या entry नंतर प्रत्येक प्रसंग हनुमंताच्या साक्षीने घडतो, प्रत्येक प्रसंगातून योग्य प्रकारे सुटका होते. हनुमंत रामायणाला सौंदर्य देणारा आहे म्हणून त्याचं चरित्र ज्याभागात येतं त्याला सुंदरकाण्ड नावं दिल गेलं आहे.
हा भक्ताला देवापर्यंत पोहोचवायचं काम करतो व देवाला भक्ताकडे घेऊन जायचं काम करतो. रावणाच्या राज्यात जाऊन हा हनुमंत बिभीषणाला गुरु उपदेश देतो, रामनामाची दीक्षा देऊन त्याचं जीवन बदलतो. बिभीषणाने आधी रामाला बघितलेले नसते, हनुमंताला बघितलेले नसते, हनुमंताला चिठ्ठी पाठवलेली नसते. तरीही त्याने बिभीषणाला दलदलीतून बाहेर काढले. केवळ तो रामनाम घेतो म्हणून. हनुमंत त्या राक्षसकुळातील बिभीषणाचा उद्धार करण्यासाठी स्वत:हून येतो. मग असा हनुमंत आमच्या उद्धारासाठी येणार नाही का? आम्ही रामाचं, हनुमंताचं दोघांचही स्मरण करतो. मग हनुमंत आमच्या मदतीला येणार नाही का? पण कधी राक्षसांच्या राज्यात राहून आम्ही रामनाम घेतो तेव्हा. राक्षसांचं राज्य म्हणजे काय - तर प्रत्येक मनुष्य जे पाप करतो ते, प्रत्येक मनुष्याच्या वाईट वृत्तीतून निर्माण होणार पाप म्हणजे राक्षस. त्यानेच निर्माण केललं पाप त्याच्यापेक्षा मोठं असतं. निर्माण करणार्यापेक्षा निर्माण होणारी गोष्ट मोठी असते. आज सारं विज्ञान काय सांगतं? universe expand होतंय, प्रसरण पावतंय.
आपण बघतो, मानवी आईच्या गर्भात बाळ किती झपाट्याने वाढतं. आपण अंजिठ्याच्या लेण्या बघतो. शेकडो वर्षे गेली तरी, त्या लेण्याचे सौंदर्य टिकून आहेच नं. तुम्ही देवाला direct बघू शकता का? पण तुम्ही उच्चारलेला शद्ब देव ऐकतो, तुमची कृती देवापर्यंत पोहोचू शकते. कारण निर्माण केलेली कृती निर्माण करणार्यापेक्षा मोठी असते.
आपणच केलेली पापं राक्षस बनून आपल्या जीवनात थैमान घालतात. मनुष्याला त्याने केलेलं पाप नेहमीच भारी पडतं. आपण ग्रंथराजात वाचतो ज्याला अन्न आणि विष्टा ह्यातला फरक कळतो, त्याला पाप-पुण्यातला फरक कळतो. आम्हांला समजले पाहिजे, ती बघते, त्या आदिमातेपासून काहीही लपत नाही. मनोमन मी चुकलो ही अपराधाची जाणीव हवी. आम्हाला वाटतं आम्ही सगळं लपवू शकतो. मानवी कायद्यापासून लपवाल, पण देवापासून लपवाल का? मनुष्याला लोभ, मत्सर, मोह असतो त्यातून पाप घडू शकते. मनुष्य ज्या चुका करतो, जेव्हा मनोमन ती चूक, पाप मान्य असेल तर त्याला क्षमा आहे. पाप्याला क्षमा करायला तो आलेला असतो. पण केव्हा, आपण मनापासून क्षमा मागतो तेव्हा. एक चूक लपविण्यासाठी आणखी दहा पापं करू नका. स्वत:वरचा दोष टाळण्यासाठी, स्वत:च्या चुका झाकण्यासाठी दुसर्यावर दोष लादणं, चुका लादणं सगळ्यात मोठं पाप. निर्दोष मनुष्यावर आरोप करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. आपल्या हातून असं काही घडत नाही ना ते बघा. असं जर झालंच असेल तर चण्डिकाकुलासमोर क्षमा मागा, चुकीच्या गोष्टीने जे घडतंय ते पुसण्याचा प्रयास करा. जमल्यास त्या व्यक्तीची क्षमा मागा.
चुकीबद्दल दु:ख हवं, अपराधीपणाची भावना पाहिजे. आपल्याला दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. पाप-पुण्याचं decision त्याच्यावर सोडा. चण्डिकाकुलासमोर शांत उभे रहा क्षमा मागा, ते जे देईल ते स्वीकारा.
पण एकीकडे वाईट वागणं चालूच ठेवायचं, आणि रोज क्षमा मागायची हे मात्र चालणार नाही. ती किती क्षमाशील आहे ते आपण बघतो, पण तिची क्षमाशीलता किती वेळा challenge करायची? तिलाही संतुलन ठेवायचं आहे. दर एक मिनिटाला क्षमा मागितली तर तो चांगल्या माणसांवर अन्याय होईल. पापी माणसाला सजा ही होणारच, पण त्याने पाप करायचं सोडलं, तर नक्कीच क्षमा मिळते. तुमची प्रार्थना त्या परमात्म्यापर्यंत पोहचण्याच्या आड तुमच्या चुका येतात. पण जेव्हा तुम्ही तू आई व मी बाळ आहे ह्या भावनेने क्षमा मागता, तेव्हा तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहचतेच. तिची क्षमा तुमच्यापर्यंत येण्यासाठी कोणी आड येणार नाही.
उपनिषद् वाचणार्यांना खात्री पटली की आम्हांला सगळ्या गोष्टींतून बाहेर पडण्याचा राजमार्ग मिळाला आहे. उपनिषद् हे ‘त्याच्या’ जन्माबरोबरच सिद्ध आहे. ह्या उपनिषदाचा संपूर्ण शद्ब नि शद्ब, भाव नि भाव आदिमाता चण्डिकेच्या चरणी स्थिरावला आहे. म्हणून वाचताना तुमचा जो भाव निर्माण होईल तो चण्डिकेच्या चरणी अर्पण होणार आहे. आपण बघतो ह्यात, कशी सुंदर यात्रा सुरू होते. हा जो हनुमंत आहे त्याने खूप छान गोष्ट केलीय आणि काहीतरी घडून आलंय आणि त्या घडण्यातून ह्या उपनिषदाच्या गर्भातून खूप सुंदर गोष्ट बाहेर आलीय.
ती म्हणजे - ‘स्वस्तिक्षेम विद्या’ ह्या विद्येचे practical आपल्याला करायचं आहे इथे आजपासून दर गुरुवारी प्रवचनाआधी. आपल्याला इथे चण्डिकाकुलाशी संवाद साधायचा आहे. जीवनात यश प्राप्त करून घेण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ह्या गुरुवारपासून प्रवचनाआधी ‘स्वस्तिक्षेमसंवाद’ इथे होईल.
प्रथम मी ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंब्यकेगौरी नारायणी नमोस्तुते ।’ हा जप म्हणेन, नंतर प्रत्येकाने डोळे बंद करून आपण खरोखरच चण्डिकाकुलासमोर बसलो आहोत, अशा प्रकारे चण्डिकाकुलाच्या कुठल्याही सदस्याशी, आदिमातेशी, चण्डिकाकुलाशी संवाद साधायचा आहे. पाच मिनिटं हा संवाद साधायचा आहे. नंतर पाच मिनिटांनी मी ‘नम: सर्वशुभंकरे । नम: ब्रह्मत्रिपुरसुंदरि । शरण्ये चण्डिके दुर्गे प्रसीद परमेश्वरि ॥’ हा जप म्हटल्यावर डोळे उघडायचेत.
पाच मिनिटं चण्डिकाकुलाशी बोलायचं आहे. हे बोलणं काहीही असू शकतं. अगदी साध्यासुध्या गप्पा मारा - ‘आई आज हे नाटक पाहिलंय’ ‘आई मुलाला परिक्षेत चांगले मार्क्स मिळालेत’ काहीही गप्पा मारा. संवाद साधा, मन मोकळं करा. तुमचा संवाद त्यांच्यापर्यंत पोहचणारच आहे आणि त्यांची स्पंदनही तुम्हांला पाच मिनिटं continuous मिळत राहतील. इथे तुमच्या पाप-पुण्याचा हिशोब केला जाणार नाही. इथे फक्त ती पाच मिनिटं तुमची आणि त्या चण्डिकाकुलाचीच असू द्या. हे चण्डिकाकुल माझा परिवार, माझी family आहे, हे अख्खच्या अख्खं कुटुंब माझ्या मदतीसाठी तयार आहे, असं म्हणा. काहीही बोलायचं नसेल, शांतीने बसावसं वाटत असेल तर शांतपणे बसा.
केंद्रांवरही सी.डी. सुरू व्हायच्या आधी हा ‘स्वस्तिक्षेमसंवाद’ होईल आणि इथे दर गुरुवारी प्रवचनाआधी होईल.
हा संवाद जिथे जिथे होईल तिथे माझा संकल्प असेल, तिथे तिथे हनुमंत स्वत: जातीने उभा असेल त्यामुळे काळजी करायचं काहीही कारण नाही.
॥ हरि ॐ॥